lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ओटी पोट लटकतंय-कंबर जाड दिसते? जेवणात 'या' ५ डाळी खा; फॅट लॉस होईल झटपट

ओटी पोट लटकतंय-कंबर जाड दिसते? जेवणात 'या' ५ डाळी खा; फॅट लॉस होईल झटपट

5 High Protein Lentils For Weight Loss : व्हेजिटेरिन लोकांसाठी प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 12:06 PM2024-03-31T12:06:14+5:302024-04-01T16:10:11+5:30

5 High Protein Lentils For Weight Loss : व्हेजिटेरिन लोकांसाठी प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत आहे.

5 High Protein Lentils For Weight Loss : Weight Loss Tips Top High Protein Lentils For Weight Loss | ओटी पोट लटकतंय-कंबर जाड दिसते? जेवणात 'या' ५ डाळी खा; फॅट लॉस होईल झटपट

ओटी पोट लटकतंय-कंबर जाड दिसते? जेवणात 'या' ५ डाळी खा; फॅट लॉस होईल झटपट

वजन कमी करणं हे सध्याच्या स्थितीत खूप मोठं चॅलेन्ज बनलं आहे. वजन कमी करण्यासााठी प्रोटीन हा खूप महत्वाचा घटक आहे.(Quick Weight Loss Tips) हाय प्रोटीन पदार्थांसाठी बरेचसे लोक नॉनव्हेज खातात पण रिसर्चनुसार डॉक्टरांचे म्हणणे आहे की जितकं प्रोटीन तुम्हाला नॉनव्हेजमधून मिळते. (High Protein Lentils For Weight Loss)

तितके किंवा त्यापेक्षा जास्त प्रोटीन तुम्हाला डाळीतून मिळू शकते. व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीनचा सगळ्यात चांगला सोर्स आहे.  सर्वात जास्त प्रोटीन मिक्स डाळींमध्ये असते. व्हेजिटेरिन लोकांसाठी प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. (Weight Loss Tips Top High Protein Lentils For Weight Loss)

नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार हाय प्रोटीन्सयुक्त डाळी वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. या डाळींमध्ये प्रोटीन्सबरोबरच फायबर्स, व्हिटामीन आणि मिनरल्सही असतात. डाळीत महत्वाची पोषक तत्व असतात. डाळींचे प्रकारही वेगवेगळे असतात. वजन कमी करण्यासाठी कोणकोणत्या डाळींचा आहारात समावेश करायचा ते समजून घेऊया. 

1) हिरवी मुगाची डाळ

एक कप हिरव्या मुगाच्या डाळीत हाय प्रोटी, लो कार्ब्स, फायबर्स, फॉलेट, मॅग्ननीज, मॅग्नेशियन, व्हिटामीन बी१२, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, सेलेनियम यांसारखी पोषक तत्व अससतात. यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी ही मुगाची डाळ उत्तम ठरते. एक कप किंवा एक वाटी मूगाच्या डाळीचे सेवन केल्यास  दीर्घकाळ तुमचं पोट भरल्यासारखं राहतं.  याशिवाय दिवसभरात ओव्हर इंटींगही होत नाही.

लादी पुसताना पाण्यात 'हा' पदार्थ घाला; घरात एकही डास-किटक येणार नाही; चमकदार दिसेल घर 

2) चण्याची डाळ

हाय प्रोटीन डाळींमध्ये चण्याची डाळ हा उत्तम घटक आहे. यात प्रोटीन्स व्यतिरिक्त कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटामीन ए, आयर्न असते.  शरीराला फिट ठेवण्यासाठी जिंक आणि फोलेटची आवश्यकता असते.  जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर या डाळींचे सेवन करा यात प्रोटीन्स कमीत कमी प्रमाणात असतात.

३) मसूरची डाळ

मसूर डाळीमुळे वजन कमी करण्याबरोबरच शरीराला अनेक फायदे मिळतात. यात लो फॅट, लो फायबर्स असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, फायबर्स  खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यास मदत करतात. ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सही कंट्रोलमध्ये राहतो. डाळीत प्रोटीन्ससशिवाय फायबर्सस, फॉलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटामीन बी, व्हिटामीन सी असते. 

चपाती खाता पण भाताशिवाय पोटच भरत नाही? वेट लॉससाठी भात की चपाती काय उत्तम-पाहा

४) उडीदाची डाळ

उडीदाची डाळ दक्षिण भारतात लोकप्रिय आहे. ही डाळ डोसा, इडली, वडा यासांरखे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते.  वजन कमी करण्यासाठी तुम्ही उडीदाची डाळीची खिचडी खाऊ शकता. फक्त यात जास्त तेल घालू नका ही या डाळीत प्रोटीन्स व्यवतिरिक्त  कार्बोहायड्रेट्, डायटरी फायबर्स आणि व्हिटामीन, कॅल्शियम असते. 

Web Title: 5 High Protein Lentils For Weight Loss : Weight Loss Tips Top High Protein Lentils For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.