सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

Published:May 8, 2024 12:24 PM2024-05-08T12:24:14+5:302024-05-08T12:39:05+5:30

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

सोन्याचे भाव सध्या अक्षरश: गगनाला भिडले आहेत. पण तरीही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीयेचा सण शुक्रवारी साजरा होत आहे. त्यामुळे हे मुहूर्त गाठून सोनं खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

पण सध्या सोन्याचे भाव वाढलेले असल्याने खूप जास्त नाही, पण मुहूर्तावर करायची म्हणून छोटीशी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही पुढील पर्यायांच्या माध्यमातून सोन्याची थोडीफार खरेदी करू शकता. यामुळे खिशाला झळ बसणार नाही. शिवाय मुहूर्तावर सोने खरेदी केल्याचा आनंदही होईल.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

अर्धा ग्रॅम, १ ग्रॅम किंवा यापेक्षाही जास्त तुम्हाला जशी परवडेल तशी सोन्याची वेढणी घेऊन ठेवा. पुढे दागिना करण्यासाठी किंवा सध्या गुंतवणूक, बचत म्हणून ती उपयोगात येऊ शकते.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

दागिनाच घ्यायचा असेल तर एखादी १८ कॅरेटची १ ग्रॅम नथही घेऊ शकता. २२ कॅरेट, २४ कॅरेटपेक्षा तिचा भाव कमी असतो. शिवाय एक छानसा दागिनाही होऊन जातो.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

१ ग्रॅम किंवा दिड ग्रॅम पर्यंत छानसे नाजूक कानातले येतात. तुमच्यासाठी किंवा लेकीसाठी ती खरेदी करू शकता.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

कानातल्यांप्रमाणेच दिड ते दोन ग्रॅम पर्यंत अंगठीही चांगली मिळू शकते. यातही १८ कॅरेटची घेतली तर किंमत बरीच कमी असते.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

१ ग्रॅमचे मणीही घेऊन ठेवू शकता. पुढे मागे एखादं गळ्यातलं करण्यासाठी ते उपयोगी येतील.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

मंगळसूत्र किंवा सोन्याच्या साखळीसाठी एखादे नाजूकसे पेंडंटही घेऊन ठेवू शकता. दिड ते दोन ग्रॅम पर्यंत चांगले नाजूक पेंडंट येतात.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

नाकातली मोरणी देखील घेऊ शकता. थोडं बजेट जास्त असेल तर सोन्यात मढवलेली हिऱ्याची मोरणी घ्या.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

सोन्याची पॉलिश असणारे मोत्याचे दागिनेही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घेता येतील. यामुळे सोन्यासोबत मोत्यांचीही खरेदी होईल आणि छानसा दागिनाही होऊन जाईल.

सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

३ ते ४ ग्रॅम एवढं बजेट असेल तर ठुशीची खरेदीही करू शकता. लाखेचे मणी असणाऱ्या ठुशी कमी वजनात मिळतात.