उन्हाळ्याच्या दिवसांत जवळपास प्रत्येक घरात कूलर वापरला जातो. वातावरणातील तापमानात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. एप्रिल महिना संपायला आला असून आता मे महिन्यातील उष्णतेनं सर्वांचेच हाल होणार आहेत. वाढत्या उष्णतेमुळे घरात फक्त पंखा सुरू ठेवून चालत नाही तर बरेच लोक एसी आणि कूलरचा पर्याय निवडतात. काहीजण कूलरच्या पाण्यात तुरटीसुद्धा घालतात. कूलरच्या पाण्यात तुरटी घालण्याचं कारण काय समजून घेऊ. (Why Should Alum Be Added To Cooler Water Cooler)
कूलरच्या पाण्यात तुरटी ठेवण्याचं कारण काय?
. जेव्हा तुम्ही कूलरमध्ये तुरटी घालता तेव्हा पाण्यातील धूळ, माती आणि बारीक कण एकमेकांना चिकटतात. ज्यामुळे कूलरच्या टाकीत खाली तळाला घाण जमा होते आणि वरील पाणी स्वच्छ होतं.
बॅक्टेरिया आणि दुर्गंध दूर होतो
उन्हाळ्याच्या दिवसांत कूलरच्या पाण्यात बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पाण्यातून खराब वास येतो. तुरटीमुळे पाण्याची पीएच लेव्हल प्रभावित होते आणि बॅक्टेरिया मरतात. ज्यामुळे बराचवेळ पाणी ताजं राहतं आणि दुर्गंध येत नाही.
खाऱ्या पाण्याचा परिणाम
जर तुमच्या परिसरात खारं पाणी येत असेल तर हे पाणी कूलरमध्ये घातल्यानंतर कूलरमधील गवत आणि पंख्यावर पांढरा थर तयार होतो. तुरटीचं पाणी खारटपणा पूर्णपणे घालवत नाही. पण मीठ खाली बसण्यास मदत करते. ज्यामुळे कूलरचे पॅड्स लवकर खराब होत नाहीत.
डासांपासून सुटका
तुरटीच्या पाण्यामुळे डासांचा शिरकाव होत नाही. अशा स्थितीत डासांपासून बचावासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. कूलरच्या हवेचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छतेनंतर टाकीत ताज्या पाण्यासोबत दोन-तीन तुरटीचे खडे किंवा कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब घालावेत. यामुळे पाण्यात डास होत नाहीत आणि हवेतील जंतूंचा नाश होतो. जर कुलर लोखंडी असेल, तर गंज टाळण्यासाठी तळाला ऑईल पेंटचा एक थर किंवा 'रस्ट प्रुफ' स्प्रे मारणे हा दीर्घकालीन फायद्याचा ठरेल. पंख्याच्या पात्यांवर साचलेली धूळ ओल्या कापडाने पुसून काढल्यास मोटरवरचा ताण कमी होतो आणि आवाजही येत नाही.
