lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Social Viral : देव आनंदाच्या आईच्या भूमिकेत हॉलीवूडची अभिनेत्री, प्रेक्षक म्हणाले हे तर 'अव्वल नंबर' काम!

Social Viral : देव आनंदाच्या आईच्या भूमिकेत हॉलीवूडची अभिनेत्री, प्रेक्षक म्हणाले हे तर 'अव्वल नंबर' काम!

Social Viral : अनेकांना याची कल्पना नाही पण अमेरिकन मॉडेल-अभिनेत्री सिंडी क्रॉफर्ड या चित्रपटात देव आनंदच्या मृत सावत्र आईच्या भूमिकेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 12:45 PM2021-09-01T12:45:47+5:302021-09-01T13:01:26+5:30

Social Viral : अनेकांना याची कल्पना नाही पण अमेरिकन मॉडेल-अभिनेत्री सिंडी क्रॉफर्ड या चित्रपटात देव आनंदच्या मृत सावत्र आईच्या भूमिकेत आहे.

Social Viral : Dev anand awwal number cindy crawford aamir khan 1990 film | Social Viral : देव आनंदाच्या आईच्या भूमिकेत हॉलीवूडची अभिनेत्री, प्रेक्षक म्हणाले हे तर 'अव्वल नंबर' काम!

Social Viral : देव आनंदाच्या आईच्या भूमिकेत हॉलीवूडची अभिनेत्री, प्रेक्षक म्हणाले हे तर 'अव्वल नंबर' काम!

Highlightsसगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे, जर तुम्ही सिंडी क्रॉफर्डच्या विकिपीडिया पेजवर गेलात तर अव्वल नंबर या चित्रपटात तिनं काम केल्याचं म्हटलंय.

अव्वल नंबर हा १९९० मध्ये फार गाजलेला स्पोर्ट्स अॅक्शन थ्रिलर  सिनेमा . या चित्रपटात देव आनंद, आमिर खान आणि आदित्य पांचोली हे मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन बप्पी लाहिरी यांनी केले होते. खासकरून या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

 १९९० दरम्यान हळू हळू लोकांनी टेलिव्हजन, मोबाईल्स फोन्सचा वापर पहिल्यांदाच सुरू केला होता. त्यामुळे या चित्रपटाची गाणी टेलिव्हिजनवरून तुफान ऐकली जायची. या चित्रपटातील दृश्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. आजही हा चित्रपट लोकांच्या आठवणींचा एक भाग आहे. या चित्रपटातील एका सीनमध्ये देव आनंदच्या बाजूला त्याच्या आईचा फोटो लावला आहे. अनेकांना याची कल्पना नाही पण अमेरिकन मॉडेल-अभिनेत्री सिंडी क्रॉफर्ड या चित्रपटात देव आनंदच्या मृत सावत्र आईच्या भूमिकेत आहे.

 आज या चित्रपटाला इतकी वर्ष झाली तरीही ही या फोटोतील बाई नक्की कोण आहे हेचं लोकांना माहीत नव्हतं.  अव्वल नंबरमध्ये  देव आनंदने डीआयजी विक्रम सिंगची भूमिका साकारली तर आदित्य पांचोली पात्र रणवीर सिंगचा सावत्र भाऊ आहे. 

या सीनमधील हा फोटो सिंडी क्रॉफर्डचा आहे आणि जेव्हा रणवीर विक्रमला त्याच्या आईची पुण्यतिथी आहे हे कळवतो. देव आनंद विक्रमला सांगतो की, ''मी तिची आवडती ब्ल्यू रिबिन फोटोला लावली आहे. मला आठवतं ती निळ्या रंगाची रिबिन तिच्या केसांना लावायची.'' एका चाहत्यानं या दृश्याचा स्क्रिनशॉट  शेअर करत करत देव आनंदची आई मॉडेल सिंडी क्रॉफर्ड असल्याचं सांगितलं आहे. काही चाहत्यांनी या फोटोवर गमतीदार  रिअॅक्शही दिल्या आहे. 

एका युजरनं लिहिले, “सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे, जर तुम्ही सिंडी क्रॉफर्डच्या विकिपीडिया पेजवर गेलात तर अव्वल नंबर या चित्रपटात तिनं काम केल्याचं म्हटलंय. (डीआयजी विक्रम सिंह यांची सावत्र आई ) खूप मजेदार !! मला शंका आहे की तिला या 'भूमिकेची' जाणीव आहे. " या पोस्ट वर सोशल मीडिया युजरर्सनं गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. 

Web Title: Social Viral : Dev anand awwal number cindy crawford aamir khan 1990 film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.