Lokmat Sakhi >Social Viral > नवरीला वरमाला घालताच नवरदेवाने जे केलं ते पाहून बावरली नवरी, बघा नेमकं काय झालं....

नवरीला वरमाला घालताच नवरदेवाने जे केलं ते पाहून बावरली नवरी, बघा नेमकं काय झालं....

Funny Video of Bride and Groom: लग्न समारंभ म्हटले की काही मजेशीर किस्से होतच असतात. आता सध्या सोशल मिडियावर गाजणारा किस्साही त्यातलाच आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 06:26 PM2022-12-21T18:26:12+5:302022-12-21T18:28:53+5:30

Funny Video of Bride and Groom: लग्न समारंभ म्हटले की काही मजेशीर किस्से होतच असतात. आता सध्या सोशल मिडियावर गाजणारा किस्साही त्यातलाच आहे..

Groom did funny thing after varmala ceremony, Must watch this funny video of bride and groom | नवरीला वरमाला घालताच नवरदेवाने जे केलं ते पाहून बावरली नवरी, बघा नेमकं काय झालं....

नवरीला वरमाला घालताच नवरदेवाने जे केलं ते पाहून बावरली नवरी, बघा नेमकं काय झालं....

Highlights बघा उत्साहाच्या भरात त्याने नेमकं काय केलं..नवरीच्या गळ्यात वरमाला घातली आणि तो ही चक्क.....

सध्या सगळीकडे लग्नसराई जोरात सुरू आहे. आता लग्न म्हटलं की सगळ्या वऱ्हाडींचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला असतो. नवरा- नवरी जेवढे आनंदात असतात, तेवढेच ते बावरून, गोंधळूनही गेलेले असतात. कारण आता इथून पुढे त्यांचं आयुष्य पुर्णपणे बदलणार असतं. काही नवरा- नवरी अतिउत्साहात असतात. या उत्साहाच्या भरात काय करू आणि काय नको, असं त्यांना होऊन जातं. इथे या नवरदेवाचंही असंच काहीसं झालं आहे (Groom did funny thing after varmala ceremony).. बघा उत्साहाच्या भरात त्याने नेमकं काय केलं..(Funny Viral Video of Bride and Groom)

सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या bhutni_ke_memes या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मुळ व्हिडिओ शेवटी एडिट करून त्याला वेगवेगळे मिम्स जोडण्यात आले आहेत.

कुकरमध्येही करता येतो अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक.. पाहा ख्रिसमस स्पेशल रेसिपी

मुळ व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की नुकतंच लग्न लागत असून नवरीने नवरदेवाला वरमाला घातली आणि प्रथेप्रमाणे ती त्याच्या पाया पडली. यानंतर नवऱ्याची पाळी होती. त्यानेही मग नवरीच्या गळ्यात वरमाला घातली आणि तो ही चक्क तिच्या पाया पडला. नवऱ्याने अचानकपणे हे असं काही केलेलं पाहून नवरी चांगलीच गोंधळून गेली होती.

 

नवरी-  नवऱ्याच्या पाया पडते तर नवरा नवरीच्या पाया का नाही पडू शकत, त्यात एवढं ते काय? असे प्रश्न त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारले जात आहेत. नवराच नेहमी श्रेष्ठ का, असा एक मुद्दाही उपस्थित होत आहे.

चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार

पण आपल्याकडच्या परंपरेनुसार वयाने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडल्या जातात. आता काही अपवाद वगळता जवळपास सर्वच भारतीय लग्नांमध्ये नवरा मुलगा हा नवरीपेक्षा वयाने मोठाच असतो. त्यामुळे त्याच्या वयाचा मान राखून नवरी प्रथेनुसार पाया पडली तर त्याला वेगळे काही स्वरूप देण्यापेक्षा हा मजेशीर प्रसंग एन्जॉय करणे अधिक चांगले.. नाही का?

 

Web Title: Groom did funny thing after varmala ceremony, Must watch this funny video of bride and groom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.