Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार 

चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार 

Home Remedies for wrinkle free skin: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तसेच चमकदार त्वचेसाठी एकही रुपया खर्च न करता हा एक घरगुती उपाय करून बघा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2022 05:45 PM2022-12-21T17:45:08+5:302022-12-21T17:45:47+5:30

Home Remedies for wrinkle free skin: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तसेच चमकदार त्वचेसाठी एकही रुपया खर्च न करता हा एक घरगुती उपाय करून बघा. 

5 Anti aging points on face that helps to reduce wrinkles at early age and makes your skin glowing | चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार 

चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स! खास पद्धतीने करा मसाज,  सुरकुत्या गायब- त्वचा चमकदार 

Highlightsचेहऱ्याची त्वचा सैलसर पडून सुरकुतू नये, यासाठी त्वचेवरचे हे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स ओळखा आणि त्यांना नियमितपणे मसाज करा.

त्वचेची पुरेशी काळजी घेतली गेली नाही तर त्वचेचा पोत खराब होऊ लागतो. त्यामुळे मग कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या येण्याचं प्रमाण वाढतं. त्वचा निस्तेज दिसू लागते. फिट राहण्यासाठी आपण जसा रोज शारिरीक व्यायाम करतो, तशीच व्यायामाची गरज चेहऱ्याच्या त्वचेलाही असते. चेहऱ्याची त्वचा सैलसर पडून सुरकुतू नये ( wrinkles), यासाठी त्वचेवरचे हे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स (5 anti aging points on skin) ओळखा आणि त्यांना नियमितपणे मसाज करा. यामुळे त्वचा चमकदार (glowing skin) होण्यासही निश्चितच मदत होईल. 

चेहऱ्यावरचे ५ ॲण्टीएजिंग पॉईंट्स
हा उपाय इन्स्टाग्रामच्या face._sculpting या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये चेहऱ्यावरचे ५ असे पॉईंट्स सांगण्यात आले आहेत, जेथून त्वचेवर सुरकुत्या दिसायला सुरुवात होते. त्यामुळे या पॉईंट्सवर जर अचूक पद्धतीने नियमितपणे मालिश केली तर नक्कीच त्वचा अधिककाळ तरुण राहण्यास मदत होईल.

 

१. पहिला पॉईंट म्हणजे दोन्ही ओठांच्या गालाजवळच्या टोकाचा पॉईंट. या पॉईंटवर सगळ्यात आधी ३ ते ४ वेळा क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज पद्धतीने गोलाकार मसाज करा. त्यानंतर त्या पॉईंटपासून कानापर्यंत अशा पद्धतीने ५ वेळा बोटाच्या टोकाने मालिश करा.

 

 

थंडीमुळे घसा खवखवणे, सर्दी- खोकला, श्वसनाचा त्रास वाढला? पूजा माखिजा सांगतात १ सोपा उपाय

२. दुसरा पॉईंट म्हणजे दोन्ही नाकपुड्यांच्या जवळ गालाच्या दिशेने असणारा पॉईंट वरीलप्रमाणे या पॉईंटवरही मसाज करावी. त्यानंतर त्या पॉईंटपासून ते कानापर्यंत अशा पद्धतीने ५ वेळा मालिश करा. 

 

३. तिसरा पॉईंट दोन्ही डोळ्यांच्या खालचा भाग. ते पॉईंट प्रेस करून झाले की त्या पॉईंटपासून डोळ्याच्या खालच्या भागापर्यंत मसाज करा. यामुळे डोळ्यांच्या आसपास असणाऱ्या सुरकुत्या कमी होतात.

कुकरमध्येही करता येतो अगदी विकतसारखा चोको लाव्हा केक.. पाहा ख्रिसमस स्पेशल रेसिपी

४. चौथा पॉईंट म्हणजे दोन्ही भुवयांची कपाळावरची सुरुवातीची टोके. तिथून भुवईच्या शेवटपर्यंत ५ वेळा मसाज करा.

५. पाचवा पॉईंट म्हणजे चाैथ्या पॉईंटच्या बरोबर वर असणारे कपाळावरचे पॉईंट. त्याने कपाळावर मसाज करा. त्यामुळे कपाळावरील सुरकुत्या कमी होतात. 

 

Web Title: 5 Anti aging points on face that helps to reduce wrinkles at early age and makes your skin glowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.