lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > डाग लागलेली केळी खायची की फेकून द्यायची? डॉक्टर सांगतात तब्येतीसाठी कोणती केळी उत्तम...

डाग लागलेली केळी खायची की फेकून द्यायची? डॉक्टर सांगतात तब्येतीसाठी कोणती केळी उत्तम...

Eating Bananas With Black Spots Safe Or Not Know From Experts : केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 08:04 PM2024-03-26T20:04:17+5:302024-03-26T20:16:55+5:30

Eating Bananas With Black Spots Safe Or Not Know From Experts : केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात.

Eating Bananas With Black Spots Safe Or Not Know From Experts : Is Eating Banana With Black Spots Safe | डाग लागलेली केळी खायची की फेकून द्यायची? डॉक्टर सांगतात तब्येतीसाठी कोणती केळी उत्तम...

डाग लागलेली केळी खायची की फेकून द्यायची? डॉक्टर सांगतात तब्येतीसाठी कोणती केळी उत्तम...

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी डॉक्टर फळं खाण्याचा सल्ला देतात. फळांच्या सेवनाने शरीराला एनर्जी मिळते. यातील फायबर्स पोटाशी संबंधित समस्या टाळण्यास फायदेशीर ठरतात. पौष्टीक आणि स्वादीष्ट फळांमध्ये केळ्याचा समावेश होतो.  केळी खाल्ल्याने शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते. प्रत्येक  सिजनमध्ये मिळणारं फळ म्हणजे केळी. (Eating Bananas With Black Spots Safe Or Not Know From Experts)

केळी फक्त चवीला चांगले असेल नसतात तर  यातून अनेक पोषक तत्व शरीराला मिळतात. केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. (Signs Your Bananas Are Too Ripe to Safely Eat) अनेकजण  अशी केळी निरूपयोगी समजून फेकून देतात. आयुर्वेदीत डॉक्टर श्रेय शर्मा यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.  

काळे डाग लागलेले केळी खाण्यायोग्य असतात का? It is Good To Eat Ripe Banana

डॉक्टर सागंतात केळी हे असं फळ आहे  ज्यामुळे फक्त शरीराला पोषण मिळत नाही तर आरोग्य देखील चांगले राहते. घरात ठेवलेल्या केळ्यांवर काळे डाग आले असतील  तर अशी केळी खाल्ल्याने काही नुकसान होत नाही. हलके डाग असलेली केळी जास्त पौष्टीक असतात. त्यात व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असते यातून भरपूर पोषण मिळते. डॉक्टरांच्या म्हणणयानुसार तुम्ही निश्चिंतपणे अशा केळींचे सेवन करू शकता ज्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळतात आणि आरोग्यही चांगले राहते. 

आयब्रोजचे केस विरळ-आकारही धड नाही? रात्री झोपताना 'हे' तेल लावा; दाट होतील भुवया

काळे डाग लागलेली केळी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Ripe Banana)

१) डाग लागलेल्या केळीमध्ये फायबर्सचे प्रमाण  चांगले असते. यात व्हिटामीन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन बी-६ असते. यातील पोषक तत्व शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम ठरतात.

२) पिकलेल्या केळ्यातील फायबर्स खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास फायदेशीर ठरतात. ज्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात.

३) पिकलेली केळी हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरतात. यातील पोटॅशियम हार्ट हेल्थ चांगली ठेवण्यास फायदेशीर टरते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४) केळ्यात नॅच्युरल साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीराला इंस्टंट एनर्जी मिळते. थकवा कमी होतो.

५) केळ्यातील फायबर्समुळे तुमच पोट जास्तवेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते तुम्हाला ओव्हर इटींग होत नाही.

Web Title: Eating Bananas With Black Spots Safe Or Not Know From Experts : Is Eating Banana With Black Spots Safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.