Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > AC चा कंप्रेसर खिडकीजवळ ठेवावा की बाल्कनीत? 'ही' छोटीशी चूक वाढवू शकते तुमचं हजारो रुपयांचं वीज बिल!

AC चा कंप्रेसर खिडकीजवळ ठेवावा की बाल्कनीत? 'ही' छोटीशी चूक वाढवू शकते तुमचं हजारो रुपयांचं वीज बिल!

Window AC vs Split AC outdoor unit placement: Save money on electricity bills with smart AC placement: आपल्यालाही उन्हाळ्यात घर कूल आणि वीज बिल कमी ठेवायचं असेल तर कंप्रेसरसाठी बाल्कनी योग्य की खिडकी, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 17:22 IST2026-04-28T17:21:46+5:302026-04-28T17:22:16+5:30

Window AC vs Split AC outdoor unit placement: Save money on electricity bills with smart AC placement: आपल्यालाही उन्हाळ्यात घर कूल आणि वीज बिल कमी ठेवायचं असेल तर कंप्रेसरसाठी बाल्कनी योग्य की खिडकी, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Best place to install AC outdoor unit balcony or window AC compressor installation mistakes that increase electricity bill How to reduce AC power consumption in summer | AC चा कंप्रेसर खिडकीजवळ ठेवावा की बाल्कनीत? 'ही' छोटीशी चूक वाढवू शकते तुमचं हजारो रुपयांचं वीज बिल!

AC चा कंप्रेसर खिडकीजवळ ठेवावा की बाल्कनीत? 'ही' छोटीशी चूक वाढवू शकते तुमचं हजारो रुपयांचं वीज बिल!

कडाक्याच्या उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी एसी ही सध्या गरजेची वस्तू न राहता गरज बनली आहे. एसी बसवताना आपण घरातील इतर गोष्टींचा विचार करतो पण काही गोष्टी विसरतो. अनेकजण जागेच्या अभावामुळे किंवा सोयीनुसार कंप्रेसर बाल्कनीत किंवा थेट गच्चीवर उन्हात ठेवतात.(Window AC vs Split AC outdoor unit placement) पण एसीच्या कंप्रेसरचे मुख्य कारण घरातील उष्णता बाहेर फेकणे असते. हा कंप्रेसर चुकीच्या जागी ठेवल्यास हवा थंड होण्याऐवजी अधिक गरम फेकू लागते. (Save money on electricity bills with smart AC placement)

या चुकांमुळे फक्त विजेचा वापर वाढत नाही तर कॉम्प्रेसरवर ताण येऊन तो लवकर खराब होण्याची शक्यता असते. चुकीच्या जागेमुळे आपले वीज बिल ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकते.(Best place to install AC outdoor unit balcony or window) आपल्यालाही उन्हाळ्यात घर कूल आणि वीज बिल कमी ठेवायचं असेल तर कंप्रेसरसाठी बाल्कनी योग्य की खिडकी, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

जिममध्ये जाऊनही पोटावरची- मांड्यांवरची चरबी कमी होत नाही? १५ मिनिटे करा 'हा' स्मार्ट वर्कआउट, कॅलरी बर्न होतील वेगानं

जर आपली बाल्कनी हवेशीर असेल आणि तिथे ऊन येत नसेल तर बाल्कनी हा चांगला पर्याय आहे. बाल्कनीत कंप्रेसर लावल्याने तो पावसापासून आणि दुपारच्या प्रखर उन्हापासून वाचतो. बाल्कनी जर चारही बाजूने बंद असेल तर कंप्रेसरमधून बाहेर पडणारी गरमा हवा तिथेच साचून राहते. यामुळे एसीला कुलिंग करण्यासाठी जास्त वीज लागते आणि बाल्कनीतील तापमानही प्रचंड वाढतं. 

अनेकांकडे बाल्कनी नसल्यामुळे गच्चीवर कंप्रेसर ठेवला जातो. गच्चीवर हवा खेळती असते हा मोठा फायदा आहे. पण त्या ठिकाणी दिवसभर सूर्यप्रकाश असतो. जेव्हा कंप्रेसरवर सतत ऊन पडते, तेव्हा त्याची उष्णता बाहेर टाकण्याची क्षमता कमी होत जाते. अशावेळी खोली थंड व्हायला वेळ लागतो आणि वीज बिल हजारो रुपयांनी वाढते. 

एसीचा कंप्रेसर जितका जास्त तापेल, तितका जास्त अँपिअर अर्थात करंट तो जास्त खेचतो. जर आपण गच्चीवर कंप्रेसर ठेवला असेल आणि त्यावर सावली नसेल तर आपल्या एसीची कमीत कमी २०-३०% जास्त वीज खातो. यामुळे वीज बिल अधिक पटीने जास्त येतो. 

इनडोअर युनिट आणि आऊटडोअर युनिटमधील अंतर जेवढे कमी असेल, तेवढेच एसीचे कूलिंग चांगले मिळते. जर गच्ची खूप उंचावर असेल आणि पाइपची लांबी जास्त वाढली, तर गॅसचे प्रेशर कमी होते आणि कॉम्पेसरवर ताण येतो, ज्यामुळे वीज बिल भरपूर येते. 

एसी कंप्रेसरसाठी अशी जागा निवडा जिथे सावली असेल आणि हवा खेळती राहिल. जर गच्चीवर ठेवायचे असेल तर त्याच्यावर एक लहान शेड बनवा, ज्यामुळे त्याच्यावर ऊन पडणार नाही. आणि कुलिंगही नीट व्यवस्थित होईल. 

Web Title : एसी कंप्रेसर की जगह बिजली बिल पर असर: बालकनी या खिड़की?

Web Summary : एसी कंप्रेसर की सही जगह - बालकनी या खिड़की - ऊर्जा दक्षता के लिए महत्वपूर्ण है। गलत जगह बिजली बिल और कंप्रेसर पर तनाव बढ़ाती है। पैसे बचाने और कूलिंग में सुधार के लिए छाया और वेंटिलेशन सुनिश्चित करें।

Web Title : AC compressor placement impacts electricity bills: Balcony or window?

Web Summary : Proper AC compressor placement—balcony or window—is crucial for energy efficiency. Incorrect placement increases electricity bills and compressor strain. Ensure shade and ventilation to save money and improve cooling.