वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

Published:November 29, 2023 05:10 PM2023-11-29T17:10:31+5:302023-11-29T17:18:00+5:30

23 years old Shahrukh's daughter is a millionaire! know some interesting facts about suhana : कपड्यांच्या पुन:वापराविषयीच्या कमेण्टवरुन सुहाना ट्रोल होत असली तरी तिची कारकिर्द कधीच सुरु झाली आहे.

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची लेक सुहाना फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. ती वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत या इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. तिचा आगामी चित्रपट 'द आर्चीज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ती व्यस्त असून, सोबत अॅड फिल्म्सही करत आहे. तिचे इंडस्ट्रीमधील प्रत्येक कलाकारांसोबत चांगले संबंध आहेत. पण सध्या ती आलिया भटचं कौतुक केल्याप्रकरणी सोशल मीडियात ट्रोल होत आहे. सुहाना आलियाला रोल मॉडेल मानते. पण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल का केलं? आलीयासाठी सुहानाने केलेली ती कमेंट व्हायरल का होत आहे? पाहूयात(23 years old Shahrukh's daughter is a millionaire! know some interesting facts about suhana).

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

शाहरुखची लेक सुहाना सर्वांनाच ठाऊक आहे. ती अनेकदा वडिलांसोबत आयपीएल क्रिकेट मॅच पाहण्यासाठी स्टेडीअमवरही यायची. त्यानंतर सुहाना आता लवकरच नेटफ्लिक्सच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचे इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांसोबत चांगले संबंध आहेत. खरंतर, आलिया भटच्या कामाने ती खूप प्रभावित झाली आहे. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, आलियाचा उल्लेख करताना, तिने तिची खूप प्रशंसा केली. सुहाना आलियाला रोल मॉडेल मानत असल्याचं ती म्हणाली. पण आलियाबद्दल केलेलं कौतुक नेटकऱ्यांच्या पचनी न पडल्याचे दिसून येत आहे.

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

आलीयाचं कौतुक करताना सुहाना म्हणते, 'नॅशनल अवॉर्ड घेण्यासाठी आलियाने तिच्या लग्नाची साडी रिपीट केली होती. अशा मोठ्या व्यासपीठावर जाताना साडी रिपीट करणं हे कौतुकास्पद आहे. जर आलिया तिचे कपडे रिपीट करू शकते, तर आपण का करू शकत नाही? आम्ही पण पार्टीसाठी तोच आउटफिट रिपीट करू शकतो. आम्हाला पण नवीन कपडे विकत घेण्याची गरज नाही.'

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

ती पुढे म्हणते, 'नवीन कपडे तयार करण्यात खूप कष्ट घ्यावा लागतो. शिवाय अनेक गोष्टी वायाही जातात. ज्यामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होते. जर तुम्ही आपले कपडे रिपीट करत असाल तर, त्यात काही गैर नाही.' खरंतर सुहाना काहीच चुकीचं बोललेली नाही, पण नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. काहींनी तिच्यावर या वक्तव्यावरून ट्रोल केलं आहे.

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

एकाने ट्रोल करत लिहिले, 'व्वा, किती विचित्र असतात श्रीमंतांचे स्ट्रगल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, स्टार्स कपडे रिपीट करत आहे.' तर, आणखी एका नेटकऱ्याने, ''आमच्याकडे कपडे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. जर त्यांनी कपडे रिपीट केले नाही, तर असे वाटते जग संपून जाईल.' तर काही नेटकऱ्यांनी तिच्या या वक्तव्याचं कौतुक केलं आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, 'सुहाना काहीच चुकीचं बोलली नाही. लोकांनी तिच्या बोलण्यावर लक्ष द्यायला हवे.'

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

सुहानाचा आगामी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेच. शिवाय ती एका प्रॉडक्टची ब्रॅण्ड अॅम्बेसॅडर देखील झाली आहे. न्यूयॉर्क बेस्ड ब्यूटी ब्रॅण्ड मेबेलिन या प्रॉडक्टचा ती चेहरा बनली असून, तिचे अनेक अॅड्स सोशल मीडियात व्हायरल होतात.

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

कमी वयात सुहानाने खूप काही साध्य केलंय. चित्रपटात पदार्पण, नामांकित प्रॉडक्टचा चेहरा, याशिवाय तिचं आणखी एक कौशल्य लोकांसमोर येणार आहे. सुहाना डेब्यू करत असलेल्या 'द आर्चीज' या चित्रपटात ती फक्त अभिनयाचं कौशल्य दाखवणार नसून, गायनाचं कौशल्यही लोकांसमोर सादर करणार आहे. सुहानाने स्वतः गायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं असल्याची माहिती सोशल मीडियात शेअर केली आहे. 'जब तुम ना थी' या गाण्याचं पोस्टर रिलीज झालं असून, तिचे याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

वय वर्षे फक्त २३ पण शाहरुखची लेक आहे कोट्यधीश! सुहाना खान आता अभिनेत्रीही होणार

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी सुहाना कोट्यवधींची मालकीण बनली आहे. शिवाय तिची ओळख महाराष्ट्राची शेतकरी म्हणूनही केली जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, सुहाना खानने अलिबागमधील थाल गावातील दीड एकर जमीन शेतीसाठी विकत घेतली आहे. तिने ही जमीन १ जून २०२३ रोजी विकत घेतली असून, नोंदणीच्या कागदपत्रांमध्ये तिने स्वत:ला शेतकरी असल्याचं सांगितलं आहे. शिवाय या जागेची किंमत एकूण १२. ९१ कोटी इतकी आहे.