Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनासाठी पांढऱ्या-ऑफव्हाईट साड्या; सोबत १० कलरफुल ब्लाऊज- लूक दिसेल स्पेशल
Updated:January 22, 2026 18:36 IST2026-01-22T16:46:28+5:302026-01-22T18:36:00+5:30
White Saree Design For Republic Day 2026: निळ्या रंगाचे किंवा मल्टीकलर मिरर वर्क निळ्या रंगाचे किंवा मल्टीकलर मिरर वर्क असलेले ब्लाऊज पांढऱ्या साडीवर उठून दिसतात.

प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2026) पांढऱ्या साडीवर फक्त पांढरं ब्लाऊज न घालता तुम्ही काही कलरफुल पर्यायचांचा विचार करून तुमचा लूक अधिक उठावदार बनवू शकता. (White Saree For Republic Day)
जर तुमची साडी साधी असेल तर त्यावर कलमकारी प्रिंट किंवा राजस्थानी बांधणीचे रंगेबीरंगी ब्लाऊज ट्राय करा. यामुळे तुम्हाला १ इंडो वेस्टर्न लूक येईल. (White Saree With Colourful Blouse For Republic Day)
निळ्या रंगाचे किंवा मल्टीकलर मिरर वर्क निळ्या रंगाचे किंवा मल्टीकलर मिरर वर्क असलेले ब्लाऊज पांढऱ्या साडीवर उठून दिसतात.
या दिवशी तु्म्ही चंदेरी सिल्क, कोरा कॉटन, किंवा लिननची पांढरी साडी निवडू शकता. काठाल जर सोनेरी किंवा तिरंगा बॉर्डर असेल तर ती अधिक शोभून दिसते.
या लूकवर ऑक्सिडाईज दागिने किंवा तिरंगा रंगाच्या बांगड्या घालून तुम्ही तुमचा पेहराव पूर्ण करू शकता.
ब्लाऊजवर कोल्हापूरी किंवा कच्छी वर्कचे रंगेबिरंगी जॅकेट घातल्यास एक हटके आणि पॉवरफुल लूक तयार होतो.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पांढऱ्या साडीवर भडक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचे खादी सिल्क ब्लाऊज वापरल्यानं पेहरावात साधेपणा आणि तेज दोन्ही येते.
जर तुमची साडी प्लेन पांढरी असेल तर त्यावर कलरफुल फुलांची डिझाईन्स असलेले ब्लाऊज फ्रेश आणि मॉडर्न लूक देईल.
तुम्हाला साधा पण आकर्षक लूक हवा असेल तर तुम्ही खादी कॉटनची साडी आणि प्रिंटेड ब्लाऊज निवडू शकता.
लाल रंगाचे वर्क असलेले ब्लाऊज ऑफ व्हाईट साडीवर घातल्यास तुमचा लूक खुलून येईल.