१ चमचा दह्याचा मस्त उपाय, पिगमेंटेशन जाऊन चेहरा इतका उजळतो की महागडे फेसपॅक पडतात फिके
Updated:January 23, 2026 18:01 IST2026-01-23T16:57:21+5:302026-01-23T18:01:28+5:30

त्वचेसाठी हल्ली बाजारात कित्येक वेगवेगळे प्रकारचे फेसवॉश मिळत आहेत. पण ते सगळे आपल्या त्वचेला सहन होतीलच असे नाही. शिवाय त्यांच्या किमतीही खूप असल्याने बऱ्याचदा ते परवडतही नाहीत.(how to use curd for face cleaning?)
म्हणूनच आता त्वचेवरचे पिंगमेंटेशन, डाग कमी करण्यासाठी चमचाभर दही घेऊन हा एक अगदी सोपा उपाय करून पाहा.(how to get glowing skin using curd?)
दह्यामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड त्वचेसाठी खूप पोषक ठरते. त्यामुळे त्वचेवर छान ग्लो येतो. त्वचा चमकदार होण्यास मदत होते.(simple skin care tips using curd)
हा उपाय करण्यासाठी काही दिवस दररोज फक्त दही वापरून चेहरा धुवून पाहा. जसं आपण फेसवॉश हातावर घेतो, त्याच पद्धतीने दही हातावर घेऊन चेहऱ्यावर चोळून चेहरा धुवा. पाहा. काही दिवसांतच तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
दही आणि लिंबाचा रस हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर चोळून लावा. दही अणि लिंबू यांच्यातले काही घटक त्वचेवरचं टॅनिंग कमी करण्यासाठी एकत्रितपणे मदत करतात. यामुळे चेहऱ्याचा काळवंडलेपणा कमी होऊन त्वचेवर छान चकाकी येते.
दही, हळद आणि बेसन हे तिन्ही पदार्थ एकत्र करून लावल्यास त्वचेवरचं पिगमेंटेशन, टॅनिंग खूप कमी होतं. त्वचा लगेच फ्रेश दिसू लागते.