तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

Updated:January 29, 2026 19:04 IST2026-01-29T15:07:32+5:302026-01-29T19:04:43+5:30

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

साधारण तिशीनंतर बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसायला सुरुवात होते. यामुळे मग त्वचा काही ठिकाणी काळसर होऊन जाते आणि मग त्वचेवर पॅचेस दिसायला लागतात.(how to remove pigmentation from skin?)

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

यामुळे साहजिकतच सौंदर्य कमी होते. म्हणूनच त्वचेची ही समस्या सोडवायची असेल तर पुढे सांगितलेला एक अगदी सोपा घरगुती उपाय करून पाहा..(home made rice powder soap for glowing skin)

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये ४ चमचे तांदळाचं पीठ घ्या (how to make soap at home?). डेड स्किन काढून टाकून त्वचा उजळ करण्यासाठी तांदळाचं पीठ खूप उपयुक्त ठरतं.(home hacks to remove pigmentation)

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

आता या पिठामध्ये ४ चमचा पिठीसाखर घाला. पिठीसाखर देखील टॅनिंग आणि डेडस्किन काढून टाकण्यासाठी तसेच त्वचेवर ग्लो येण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. लिंबाच्या रसामध्ये असणारे व्हिटॅमिन सी त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. शिवाय लिंबामुळेही त्वचा चमकदार होते.

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

या मिश्रणामध्ये आपल्याला २ ते ३ चमचे खोबरेल तेल घालायचे आहे. खोबरेल तेलामुळे त्वचा कोरडी होत नाही. ती छान मॉईश्चराईज आणि हायड्रेटेड राहाते.

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

यानंतर यामध्ये २ ते ३ चमचे गुलाबपाणी घाला. गुलाबपाणी देखील त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरते. सगळ्यात शेवटी या मिश्रणात तुम्ही रोज वापरत असणारी कोणतीही साबण थोडीशी बारीक करून घाला. तुम्ही जर एखादी बेबी सोप वापरली तर आणखी चांगले.

तांदळाच्या पिठाचा ‘असा’ साबण करा घरीच-चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन जाऊन चेहरा दिसेल उजळ

आता हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि त्याची साबण तयार करा. ही साबण तुम्ही चेहऱ्यासाठी काही दिवस वापरून पाहा. पिगमेंटेशन कमी होण्यास नक्कीच खूप मदत होईल. ट्राय करून पाहा. हा उपाय rohitsachdeva1 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.