Lokmat Sakhi >Parenting > लहान बाळांना पावडर लावत असाल तर लगेच थांबवा! डॉक्टर सांगतात अतिशय घातक, कारण.... 

लहान बाळांना पावडर लावत असाल तर लगेच थांबवा! डॉक्टर सांगतात अतिशय घातक, कारण.... 

Parenting Tips About Applying Powder To Your Baby: तुमच्या लहान बाळांना तुम्ही दररोज आंघोळ झाल्यानंतर पावडर लावत असाल तर तसं करणं बघा तुमच्या बाळासाठी किती धोकादायक ठरू शकतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 17:07 IST2025-04-05T17:04:31+5:302025-04-05T17:07:10+5:30

Parenting Tips About Applying Powder To Your Baby: तुमच्या लहान बाळांना तुम्ही दररोज आंघोळ झाल्यानंतर पावडर लावत असाल तर तसं करणं बघा तुमच्या बाळासाठी किती धोकादायक ठरू शकतं..

is it okay to apply powder on babies face and body? is it safe to apply powder to baby? | लहान बाळांना पावडर लावत असाल तर लगेच थांबवा! डॉक्टर सांगतात अतिशय घातक, कारण.... 

लहान बाळांना पावडर लावत असाल तर लगेच थांबवा! डॉक्टर सांगतात अतिशय घातक, कारण.... 

Highlightsआंघोळ झाल्यानंतर तुम्हीही बाळाला रोज पावडर लावत असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या काही गोष्टी एकदा बघाच...

लहानसं बाळ घरी असलं की सगळं घर आनंदून जातं. त्या बाळाच्या बाललीला पाहण्यात आणि त्यांचं सगळं करण्यात आईचा अख्खा दिवस निघून जातो. बाळाला रोजच्या रोज आंघोळ घालणं, अंग पुसून, कपडे घालून तयार करणं हे काम प्रत्येक आईला जवळपास रोजच करावं लागतं. असं सगळं करून बाळाला आवरून देताना त्या माऊलीला मनातून खूप आनंदही होत असतो. पण असं सगळं करत असताना, आपलं आधीच गोड असणारं बाळ आणखी गाेंडस दिसावं म्हणून त्याला जास्त छान पद्धतीने तयार करताना तुमच्याकडून काही चुका तर होत नाहीत ना हे एकदा तपासून पाहा.. आंघोळ झाल्यानंतर तुम्हीही बाळाला रोज पावडर लावत असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या काही गोष्टी एकदा बघाच...(Is it okay to apply powder on babies face and body?)

 

लहान बाळाला पावडर लावणं योग्य आहे का?

बाळाला फ्रेश वाटावं म्हणून किंवा आपलं बाळ अधिक गोरं दिसावं म्हणून अनेक घरांंमध्ये बाळांना रोजच्या रोज दिवसातून अगदी दोन वेळा पावडर लावली जाते.

Lakme Fashion Week: जान्हवी कपूरपेक्षाही जास्त भाव खाऊन गेलेली तमन्ना कटोच नेमकी कोण?

पण असं करणं खरंच कितपत योग्य आहे, याविषयी डॉ. वाणी अग्रवाल यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की बाळाच्या चेहऱ्याला किंवा शरीराला पावडर लावत असताना पावडरचे अतिशय सुक्ष्म असतात बाळाच्या नाकातोंडात जाऊ शकतात. त्यामुळे बाळाला श्वास घ्यायलाही त्रास होऊ शकतो. 

 

पावडरचा अतिरेक होत असेल तर बाळाला खोकला, दमा किंवा अस्थमा सारखा त्रासही सुरू होऊ शकतो.

राम नवमी २०२५: रामाला दाखवा धने पंजिरीचा नैवेद्य- घ्या सगळ्यात सोपी, झटपट होणारी रेसिपी

कारण बाळाची त्वचा  आणि त्याचे अवयव अतिशय नाजूक असतात. तसेच अनेकदा पावडरमध्ये असणारे केमिकल्स सहन न झाल्याने बाळांच्या त्वचेलाही वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे बाळ साधारण वर्षाचे होईपर्यंत तरी त्याला पावडर लावणे पुर्णपणे टाळायला हवे. त्यानंतरही खरंतर बाळांना पावडर लावण्याची काहीही आवश्यकता नसते. 
 

Web Title: is it okay to apply powder on babies face and body? is it safe to apply powder to baby?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.