Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलं बटाट्यासारखी गोलमटोल झाली म्हणून टेंशन आलं, ‘एवढं’ करा - डाएटची शिस्त न पाळूनही होतील फिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 17:48 IST

how to reduce obesity in children naturally : effective ways to reduce child obesity : how to help kids lose weight safely : मुलांचं वाढतं वजन नैसर्गिक, घरगुती पद्धतीने कसं नियंत्रणात आणता येईल, पाहा खास टिप्स...

वाढत्या वयात मुलांचं आरोग्य चांगलं असणं ही प्रत्येक पालकांची पहिली जबाबदारी असते. सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये मुलांची बदललेली लाईफस्टाईल, मैदानी खेळांचा अभाव आणि जंक फूड खाण्याचे वाढते प्रमाण यामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढत आहे. जेव्हा आपलं मूल वयापेक्षा जास्त वजनाचं दिसू लागतं, तेव्हा पालक म्हणून साहजिकच मनात भीती आणि टेन्शन तर आपसूकच येतं...आजकाल लहान वयातच मुलांचं वजन झपाट्याने वाढताना दिसतं आणि हे अनेक पालकांसाठी चिंतेचं कारण ठरत आहे(how to reduce obesity in children naturally).

मुलांचं वाढतं वजन केवळ त्यांच्या दिसण्यावरच परिणाम करत नाही, तर त्यांच्या आरोग्यावरही अत्यंत वाईट परिणाम करू शकतं. लहान वयातच येणारा हा लठ्ठपणा भविष्यात गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतो. अशावेळी पालकांना नेमकं काय करावं हे समजत नाही - डाएट करायला सांगावं का, की मुलांना काही खास पदार्थ खायला द्यावेत? मात्र मुलांच्या बाबतीत कठोर डाएटपेक्षा योग्य आहार आणि काही सोपे घरगुती उपाय अधिक फायदेशीर ठरु शकतात. डाएटिंग किंवा कडक निर्बंध न घालता, मुलांच्या रोजच्या आहारात आणि दिनचर्येत काही घरगुती बदल करून आपण त्यांचं वजन (effective ways to reduce child obesity) सुस्थितीत आणू शकतो. ते नेमके उपाय कोणते? मुलांचं वाढतं वजन नैसर्गिक आणि घरगुती पद्धतीने कसं नियंत्रणात (how to help kids lose weight safely) आणता येईल, जे सुरक्षित असून मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.

मुलांचं वाढतं वजन नैसर्गिक, घरगुती पद्धतीने कसं नियंत्रणात ठेवता येईल ? 

१. मुलांना ॲक्टिव्ह राहण्यासाठी मदत करा :- आजकल मुले आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम्समध्ये घालवतात. यामुळे त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. मुलांना रोज किमान ४५ ते ६० मिनिटे मैदानी खेळ खेळण्यासाठी आवर्जून पाठवा. धावणे, सायकल चालवणे किंवा खेळल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास मदत होते.

उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होतेय? शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी खा १० पदार्थ - उन्हाळा होईल सुखकर... 

२. जंक फूडऐवजी हेल्दी डाएट द्या :- पिझ्झा, बर्गर, चिप्स आणि कोल्ड ड्रिंक्स यांसारखे जंक फूड मुलांचे वजन वाढण्याचे मुख्य कारण ठरतात. मुलांच्या आहारात फळे, पालेभाज्या, दही, डाळी आणि घरगुती अन्नपदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या आरोग्यासाठी सकस आणि संतुलित आहार अत्यंत आवश्यक आहे.

३. कोल्ड ड्रिंक्स व गोड पेयांचे प्रमाण कमी करा :- अनेक मुले कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस आणि चॉकलेट ड्रिंक्स जास्त प्रमाणांत पितात. यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकते. याऐवजी मुलांना शहाळ्याचे पाणी, ताज्या फळांचा रस किंवा साधे पाणी पिण्याची सवय लावा.

आई झाल्यावर आलिया भटने ३ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, तिनं केल्या फक्त ६ गोष्टी-वाचा कोणत्या...

४. स्क्रीन टाइम मर्यादित वेळेसाठी ठेवा :- मोबाईल, टीव्ही आणि टॅबलेटचा जास्त वापर मुलांच्या शारीरिक हालचाली कमी करतो. मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित वेळेसाठी असायला हवा. मुले आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ खेळणे, वाचन करणे किंवा इतर कामांमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक ॲक्टिव्हिटी करण्यात घालवतील, असा प्रयत्न करा.

५. पुरेशी झोपही आहे आवश्यक :- पुरेशी झोप न मिळाल्यामुळे देखील मुलांचे वजन वाढू शकते. जेव्हा मुले पूर्ण झोप घेत नाहीत, तेव्हा शरीराच्या  पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच, मुलांना रोज वेळेवर झोपण्याची आणि किमान ८ ते १० तासांची शांत झोप घेण्याची सवय लावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Worried about chubby kids? Simple tips for healthy weight management.

Web Summary : Childhood obesity is rising. Encourage activity, limit junk food and sugary drinks, and reduce screen time. Ensure adequate sleep. These simple changes promote healthy weight naturally.
टॅग्स :पालकत्वलहान मुलंवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स