lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > शाळेसाठी मुलांना लवकर उठवणं चूक की बरोबर? डॉक्टर सांगतात, मुलांची झोप होत नाही कारण..

शाळेसाठी मुलांना लवकर उठवणं चूक की बरोबर? डॉक्टर सांगतात, मुलांची झोप होत नाही कारण..

Governor Ramesh Bais Statement on school timings and students sleep, Doctor says how to deal with children sleep pattern : मुलांच्या शाळा सकाळी लवकर असतात त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही हे कितपत खरं?

By सायली जोशी-पटवर्धन | Published: December 7, 2023 03:28 PM2023-12-07T15:28:00+5:302023-12-07T15:30:51+5:30

Governor Ramesh Bais Statement on school timings and students sleep, Doctor says how to deal with children sleep pattern : मुलांच्या शाळा सकाळी लवकर असतात त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही हे कितपत खरं?

Governor Ramesh Bais Statement on school timings and students sleep, Doctor says how to deal with children sleep pattern : Is it wrong or right to wake up children early for school? Doctors say, children do not sleep because.. | शाळेसाठी मुलांना लवकर उठवणं चूक की बरोबर? डॉक्टर सांगतात, मुलांची झोप होत नाही कारण..

शाळेसाठी मुलांना लवकर उठवणं चूक की बरोबर? डॉक्टर सांगतात, मुलांची झोप होत नाही कारण..

सायली जोशी-पटवर्धन

मुलांची झोप पूर्ण व्हावी आणि सध्या ती होत नाही म्हणून शाळांनी आपल्या वेळा बदलायला हव्यात असं विधान नुकतंच राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. सकाळची शाळा असणाऱ्या पालकांचे आणि मुलांचे झोप या विषयातील बरेच प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आले. मुलांनी रात्री उशीरा झोपणं, त्यामुळे त्यांची पुरेशी झोप न होणं, त्यांनी सकाळी उठायला त्रास देणं, शाळेला उशीर, तासाला मुलांना झोप येणे आणि अपुऱ्या झोपेचा त्यांच्या आरोग्यावर परीणाम होणे अशा बऱ्याच गोष्टींबाबत त्यामुळे पालक, शिक्षक गटांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. मुलांची झोप हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण म्हणून त्यासाठी शाळांच्या वेळा बदलणं कितपत योग्य आहे असा प्रश्न बालरोगतज्ज्ञांनी उपस्थित केला. सकाळच्या वेळात मुलांची आकलन क्षमता चांगली असल्याने सकाळच्या वेळेत मुलांनी शाळेत जाणे योग्य आहे. पण मग मुलांच्या झोपेचं काय (Governor Ramesh Bais Statement on school timings and students sleep, Doctor says how to deal with children sleep pattern) ? 

लहान मुलांना सर्दी झाल्यावर केळं द्यावं की नाही? डॉक्टर सांगतात नेमकं काय बरोबर...

बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग म्हणतात...

१. मुलांना साधारण ७ ते ८ तास इतकी पुरेशी झोप आवश्यक असते. हे लक्षात घेऊन मुलांच्या झोपेचं योग्य ते नियोजन पालकांनी करायला हवं. तसंच ही झोप सलग होणे आवश्यक असते. त्यामुळे सकाळची शाळा असेल तर मुलांना जास्तीत जास्त मुलांना १० वाजता झोपवायला हवे म्हणजे ते ६ वाजता सहज उठू शकतात. 

(Image : Google)
(Image : Google)

२. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि पुरेशी झोप झाल्यावर आपण फ्रेश असतं. आपलं मन, बुद्धी, शरीर झोपेत आराम मिळाल्याने ताजेतवाने झालेले असते. अशावेळी सकाळी ६ ते १०-११ या वेळात मुलांची आकलनशक्तीही चांगली असते. त्यावेळी त्यांनी शाळेत किंवा घरीही अभ्यास केला तर त्यांना तो जास्त नीट पद्धतीने समजण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी शाळेचे तास असणे झोपून राहण्यापेक्षा केव्हाही जास्त चांगले. 

३. बरेचदा मुलांना दटावून दुपारी झोपवलं जातं. ५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी दुपारची झोप ठिक आहे, पण ६ वर्षापुढील मुलं दुपारी मुलं २ ते ३ तास झोपली तर ती रात्री लवकर झोपत नाहीत आणि मग सकाळी उठायलाही त्रास देतात आणि त्यांची सलग झोप कमी होते. दुपारी झोप आली तर अर्धा ते पाऊण तास, जास्तीत जास्त १ तास झोपणे ठिक आहे. पण त्याहून जास्त दुपारी झोपू नये, कारण त्याचा रात्रीच्या झोपेवर परीणाम होतो. 

रणबीर कपूरने राहासाठी सोडल्या ३ गोष्टी, पालक झाल्यावर स्वतः त काही बदल करावे असे तो म्हणतो कारण..

४. सुर्योदयासोबत उठावं आणि सूर्यास्त झाला की झोपावं असं आयुर्वेदातही सांगितलं आहे. रात्री साधापण ९ ते १ हा मुलांचा मेंदू आणि शरीर विकसित होण्यासाठी उत्तम काळ असतो. या काळात ग्रोथ हॉर्मोनची निर्मिती होत असल्याने ही वेळ झोपेसाठी सर्वात योग्य आहे. ४ ते १२ या वयातील मुलांची या वयात वाढ होते, त्यामुळे सकाळची शाळा असेल तर रात्री ९ ते जास्तीत जास्त १० वाजता प्रत्येकानेच झोपायला हवे. पण मुलांची योग्य वाढ व्हायची असेल तर मुलांनी तरी या वेळात झोपायलाच हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

५. मुलांनी वेळेत झोपावं यासाठी पालकांनीही स्वत:ला तशी सवय लावून घ्यावी. घरात टिव्ही चालू असेल, पालक मोबाइलवर सोशल मीडियावर असतील तर मुलंही तेच करणार आहेत हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं. मुलांनी रात्री अकारण जागणं योग्य नाही हे लक्षात घेऊन पालकांनी मुलांच्या झोपेचं योग्य ते नियोजन करायला हवं. 

६. नियमितपणे रात्री उशीरा झोपणे, त्यामुळे झोप अपुरी होणे आणि मग शाळेत तासाला झोप येणे असे होत असेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. तसेच शैक्षणिकदृष्ट्याही यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. 
 

Web Title: Governor Ramesh Bais Statement on school timings and students sleep, Doctor says how to deal with children sleep pattern : Is it wrong or right to wake up children early for school? Doctors say, children do not sleep because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.