lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > रणबीर कपूरने राहासाठी सोडल्या ३ गोष्टी, पालक झाल्यावर स्वतः त काही बदल करावे असे तो म्हणतो कारण..

रणबीर कपूरने राहासाठी सोडल्या ३ गोष्टी, पालक झाल्यावर स्वतः त काही बदल करावे असे तो म्हणतो कारण..

Ranbir Kapoor Quit Nonveg, Smoking and drinking for his daughter Raha Parenting : रामायण चित्रपटासाठी नाही तर राहा आणि स्वत:साठी सोडल्या या सवयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2023 12:04 PM2023-12-04T12:04:50+5:302023-12-04T12:12:24+5:30

Ranbir Kapoor Quit Nonveg, Smoking and drinking for his daughter Raha Parenting : रामायण चित्रपटासाठी नाही तर राहा आणि स्वत:साठी सोडल्या या सवयी...

Ranbir Kapoor Quit Nonveg, Smoking and drinking for his daughter Raha Parenting : 3 things Ranbir Kapoor gave up for Raha, he says he has to make some changes after becoming a parent because.. | रणबीर कपूरने राहासाठी सोडल्या ३ गोष्टी, पालक झाल्यावर स्वतः त काही बदल करावे असे तो म्हणतो कारण..

रणबीर कपूरने राहासाठी सोडल्या ३ गोष्टी, पालक झाल्यावर स्वतः त काही बदल करावे असे तो म्हणतो कारण..

मूल होणं ही आईसाठी जितकी खास आणि जबाबदारीची बाब असते तितकीच ती वडिलांसाठीही असते. वडिलांकडे पाहून अनेकदा आपल्याला वाटत नसलं तरी आपल्या मुलांना वाढवण्याचं, त्यांना आवश्यक त्या गोष्टी योग्य वेळेला मिळतील याचं आणि एकूणच पालक म्हणून वडिलांनाही जबाबदारीचा ताण आलेलाच असतो. इतके दिवस केवळ जोडीदारासोबत राहणारे आपण पालक म्हणून नवीन भूमिकेत जातो तेव्हा माणूस म्हणून आणि पालक म्हणून आपल्याला स्वत:मध्ये काही बदल आवर्जून करावे लागतात. जन्माला येणारं मूल हे आपल्याकडे पाहून गोष्टी शिकणार असल्याने, लहान-मोठ्या गोष्टीत आपल्याला फॉलो करणार असल्याने आपली जबाबदारी खूप वाढलेली असते. प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी वर्षभरापूर्वी एका गोंडस परीला जन्म दिला असून तिच्या जन्मानंतर या सेलिब्रिटी कपलचंही आयुष्य बरंच बदललं (Ranbir Kapoor Quit Nonveg, Smoking and drinking for his daughter Raha Parenting).

(Image : Instagram)
(Image : Instagram)

रणबीरने राहाच्या जन्मानंतर काही महिने मनोरंजन सृष्टीतून ब्रेक घेतला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याशिवायही राहासोबत खेळताना, तिला घेऊन बसलेले रणबीरचे काही फोटोही आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. सध्या रणबीर अॅनिमल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याचे दिसते. याशिवाय लवकरच तो नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. रामायणासारख्या पवित्र गोष्टीवरील चित्रपटात भूमिका करत असल्याने रणबीरने मांसाहार आणि दारु पिणे सोडल्याचे अनेकांचे म्हणणे होते. मात्र रणबीरने स्वत: एका मुलाखतीत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 

आपला फोकस आता आपली मुलगी आहे, त्यासाठी आपण जीवनशैलीमध्ये बरेच बदल केल्याचे रणबीर सांगतो. चित्रपटासाठी नाही तर राहा या आपल्या मुलीसाठी सिगारेट ओढणे, दारु पिणे आणि मांसाहार या सवयी सोडत असल्याचे खुद्द रणबीरने सांगितले. इतकेच नाही तर आपण योगा आणि ध्यानही करत असल्याचे तो म्हणाला. आता मी वयाच्या चाळीशीत असल्याने मला माझ्या मुलीसाठी आणि स्वत:साठी आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे असंही तो म्हणाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटीझन्सनी त्याच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी एक वडील म्हणून हा अतिशय उत्तम निर्णय असल्याचे म्हटले आहे तर काहींनी त्याची खिल्ली उडवली आहे.  

Web Title: Ranbir Kapoor Quit Nonveg, Smoking and drinking for his daughter Raha Parenting : 3 things Ranbir Kapoor gave up for Raha, he says he has to make some changes after becoming a parent because..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.