lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > मुलांची वाढेल उंची-शरीरही राहील सुदृढ, पाहा ३ प्रकारचे भन्नाट व्यायाम; उंची वाढवण्याचा सोपा मार्ग

मुलांची वाढेल उंची-शरीरही राहील सुदृढ, पाहा ३ प्रकारचे भन्नाट व्यायाम; उंची वाढवण्याचा सोपा मार्ग

3 exercises to increase your kid's height : मुलांच्या उंचीची वाढ पालकांच्या उंचीवर अवलंबून असते, असे अनेक पालकांचे म्हणणे आहे; हे खरं की खोटं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2024 03:41 PM2024-01-18T15:41:11+5:302024-01-18T15:46:51+5:30

3 exercises to increase your kid's height : मुलांच्या उंचीची वाढ पालकांच्या उंचीवर अवलंबून असते, असे अनेक पालकांचे म्हणणे आहे; हे खरं की खोटं?

3 exercises to increase your kid's height | मुलांची वाढेल उंची-शरीरही राहील सुदृढ, पाहा ३ प्रकारचे भन्नाट व्यायाम; उंची वाढवण्याचा सोपा मार्ग

मुलांची वाढेल उंची-शरीरही राहील सुदृढ, पाहा ३ प्रकारचे भन्नाट व्यायाम; उंची वाढवण्याचा सोपा मार्ग

उंच व्यक्तीची नकळतच चांगली छाप पडते. त्यामुळे आपली मुलं छान उंच व्हावी असे प्रत्येक पालकांना वाटते. पण आपली उंची आपल्या हातात नसून, आपल्या आई-वडिलांच्या उंचीवर अवलंबून असते. असा अनेकांचा समज आहे. पण मुलांची उंची वाढावी यासाठी काय करावे? असा प्रश्न पालकांना हमखास पडतो. काही पालक त्यांना विविध प्रकारचे पदार्थ खाऊ घालतात.

तर, काही पालक मुलांची उंची वाढावी यासाठी विविध प्रकारचे एक्सरसाईज करायला शिकवतात (Parenting Tips). जर मुलांची उंची नैसर्गिकरित्या वाढावी असे वाटत असेल तर, ३ प्रकारचे व्यायाम शिकवा. या व्यायामामुळे मुलांची उंची वाढेलच शिवाय, आरोग्य आणि शरीर सुदृढ राहील(3 exercises to increase your kid's height).

कोब्रा पोझ

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, कोब्रा पोझ ज्याला काही जण भुजंगासन देखील म्हणतात. ही पोझ आपण मुलांना शिकवू शकता. यामुळे शरीराचा वरचा भाग मजबूत होतो, शिवाय पेशी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. नियमित हा व्यायाम केल्याने पोट आणि कंबरेची आजूबाजूची चरबी देखील कमी होते. शिवाय या योगासनामुळे पाठीच्या कण्याची लांबी वाढू शकते.

फाडफाड इंग्रजी बोलण्यासाठी खास ४ ट्रिक्स, मनातून भीती जाईल-मुलेही बोलू लागतील पटकन

रोप स्किपिंग

स्पॉट जंप आणि रोप स्किपिंग अशा व्यायामांमुळे शरीराचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे आपण त्यांना नियमित रोप स्किपिंग करायला शिकवू शकता. दोरी उड्या मारल्याने शरीर तर सुदृढ राहतेच, यासह स्टॅमिना देखील बुस्ट होतो . नियमित १५ ते २० मिनिटं दोरी उड्या मारल्याने उंची वाढवण्यास मदत होते.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

स्विमिंग

पोहणे हा जगातील सर्वात प्रभावी व्यायामाचा प्रकार आहे. या व्यायामामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला फायदा होतो. आपण पोहताना गुरुत्वाकर्षणाविरुद्ध हालचाल करत असतो. सतत हात-पाय मारल्यामुळे शरीर मजबूत होते. पोहताना शरीराच्या प्रत्येक स्नायूवर अधिक दबाव पडतो. या दबावामुळे पाठीचा कणा ताठ होतो. पोहण्याचा सराव केल्यामुळे उंची वाढवता येते. 

Web Title: 3 exercises to increase your kid's height

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.