मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

Published:December 24, 2023 04:22 PM2023-12-24T16:22:40+5:302023-12-24T16:31:49+5:30

7 ways to break smartphone addiction in children : लहान मुलांना जडलेलं मोबाईल फोनचं व्यसन सोडवण्यासाठी फॉलो करा ७ टिप्स, स्वतः मोबाईल फोन वापरणं सोडतील..

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

गेल्या काही वर्षांपासून मोबाईल हे उपकरण प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलशिवाय सध्या अनेकांचं पानही हलत नाही. सध्या प्रत्येकाचं काम मोबाईलवरच होते. मोबाईल फोनचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत. मोबाईल फोनची मुख्य सवय लहान मुलांना लागते. लहान मुलांना जडलेलं मोबाईल फोनचं व्यसन सोडवण्यासाठी पालक अनेक उपाययोजना आखतात. पण मोबाईल फोनचं व्यसन सोडवताना पालकांच्या नाकीनऊ येतात(7 ways to break smartphone addiction in children).

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

लहान मुलं खाता-पिता, उठता-झोपता, मोबाईल फोनचा वापर करतात. जे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. शिवाय स्क्रीन टायमिंग वाढत असल्यामुळे डोळ्यांवरही ताण पडतो. ज्यामुळे कमी वयात चष्मा लागतो. जर लहान मुलांची मोबाईल फोनची सवय सोडवायची असेल तर, ७ टिप्स वापरून पाहा.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

मुलांची क्रिएटिव्हिटी बाहेर आणण्यासाठी त्यांना आर्ट अँड क्राफ्टमध्ये गुंतुवून ठेवा. त्यांना नवनवीन गोष्टी तयार करण्यासाठी सांगा. ड्रॉइंग, पेंटिंग, क्ले आर्ट, पेपर क्राफ्ट, शिवणकाम, फ्रूट व्हेजिटेबल आर्ट, मॉडर्न आर्ट इत्यादी अनेक गोष्टी शिकवा.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

मुलांना शैक्षणिक पुस्तकेच द्यावीत असे नाही, तर कथांचे पुस्तक देऊन त्यांच्यात पुस्तक वाचनाची गोडी लावा. यामुळे मुलांमध्ये वाचनाची सवय तर विकसित होईलच, शिवाय त्यांची कल्पनाशक्तीही वाढेल.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

मुलांना सगळ्या गोष्टी हातात आणून देऊ नका. भाजी चिरण्यापासून ते बाजारातून सामान आणण्यापर्यंतच्या घरातील छोट्या-छोट्या कामांमध्ये त्यांची मदत घ्या. शिवाय आपण साफसफाईसाठी त्यांची मदत घेऊ शकता. यामुळे मुलं घरतील कामात व्यग्र होतील. मोबाईल फोनला विसरतील.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

मुलांची विचारसरणी वाढवण्यासाठी आपण त्यांना जिगसॉ पझल, रुबिक्स क्यूब, ब्रेन गेम्स, वर्ड गेम्स, क्रॉसवर्ड पझल, लॉजिकल पझल आणि सुडोकूसारखे गेम खेळायला देऊ शकता. यामुळे त्यांच्या मेंदूचा व्यायाम होतो आणि त्यांची विचारसरणी वाढते.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

बुद्धिबळाच्या खेळांपासून ते कॅरम बोर्डापर्यंत त्यांना गेम्स शिकवा. मुलांना बुद्धीला चालना देणाऱ्या गेम्समध्ये गुंतवून ठेवा.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

मुलांना त्यांच्या छंदात गुंतवून ठेवा. तुम्ही त्याला गाणे, नृत्य, पोहणे, चित्रकला यासारख्या छंदांमध्ये गुंतवू शकता. त्याचे क्लासेस लावून देऊ शकता.

मोबाईल फोन नाही दिला तर मुले रडतात, दंगा करतात? ७ टिप्स, सुटेल मोबाईलची सवय

संगीत ही मूड फ्रेश करणारी थेरपी आहे. हे केवळ मोठ्यांसाठी नसून तर लहान मुलांसाठीही फायदेशीर ठरते. त्यांना आपण सिंगिंगचा क्लास लावून देऊ शकता.