lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भारतात ५ पदार्थांवर बंदी, तरीही सर्रास होते विक्री! FSSAI सांगतत कॅन्सरचा धोका अधिक आणि..

भारतात ५ पदार्थांवर बंदी, तरीही सर्रास होते विक्री! FSSAI सांगतत कॅन्सरचा धोका अधिक आणि..

FSSAI banned 5 foods in India, Check out list : FSSAI ने आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे, तरीही आपण खातो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 01:28 PM2024-05-09T13:28:32+5:302024-05-09T15:39:54+5:30

FSSAI banned 5 foods in India, Check out list : FSSAI ने आरोग्यास हानी पोहोचवणाऱ्या खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे, तरीही आपण खातो..

FSSAI banned 5 foods in India, Check out list | भारतात ५ पदार्थांवर बंदी, तरीही सर्रास होते विक्री! FSSAI सांगतत कॅन्सरचा धोका अधिक आणि..

भारतात ५ पदार्थांवर बंदी, तरीही सर्रास होते विक्री! FSSAI सांगतत कॅन्सरचा धोका अधिक आणि..

अन्नातून शरीराला उर्जा, पौष्टीक घटक यासह दिवसभर काम करण्याची ताकद मिळते (Health Tips). कडधान्य, पालेभाज्या, तांदूळ आणि फळांचे सेवन करायलाच हवे (FSSAI List). भारतातील अनेक धान्य बऱ्याच देशात निर्यात होतात. शिवाय अनेक गोष्टी आयात होतात. पण आयात केलेले असे अनेक फुड्स आणि प्रॉडक्ट्स आहेत, जे खाल्ल्याने तब्येत बिघडू शकते, जे सर्रास बाजारात विकले जातात.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया(FSSAI) यांनी असे अनेक पदार्थ शेअर केले आहेत, जे भारतात बॅन करण्यात आले आहे. जे खाल्ल्याने गंभीर आजारांचा धोका वाढतो. मात्र, यातील काही उत्पादनांमध्ये बदल करून त्यांची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे कोणते आहेत ते पदार्थ? हे पदार्थ खरंच आरोग्यासाठी घातक ठरतात का?(FSSAI banned 5 foods in India, Check out list).

चीनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, '२००८ पासून चीनी दूध आणि त्याच्या उत्पादनांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. FSSAI ला या चीनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये मेलामाईन नावाचे विषारी रसायन सापडले होते. यातील घटक प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे तब्येत बिघडू शकते. भारतात याची आयात आणि विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. 

अस्सल साऊथ इंडियन इडलीची ही घ्या रेसिपी, फक्त ६ स्टेप्स - इडली होईल कापसासारखी हलकी

फळांना कृत्रिमरित्या पिकवणारे एजंट

फळांचा पुरवठा वाढवण्यासाठी ते कृत्रिमरीत्या पिकवले जातात. फळांना लवकर पिकवण्यासाठी त्यात कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीन गॅसचा वापर होतो. पण या दोन्ही घटकांमुळे कॅन्सर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कृत्रिमरित्या पिकवलेली फळे त्यांचा वापर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

चीनी लसूण

चीनमधून लसूण आयात केला जातो. त्यात उच्च पातळीचे कीटकनाशक आढळून आले आहे. ज्यामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. या कारणास्तव २०१९ मध्ये त्यावर बंदी घालण्यात आली होती.

एनर्जी ड्रिंक

भारतात अनेक एनर्जी ड्रिंक्स विकली जातात. त्यामध्ये कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. FSSAIने अशा अनेक पेयांवर बंदी घातली आहे. परंतु, त्यातील काही साहित्य बदलून, पुन्हा विक्री करण्यात आली आहे. ज्याचा थेट दुष्परिणाम आरोग्याला सहन करावा लागतो. ज्यामुळे कर्करोग आणि मधुमेह देखील होऊ शकतो.

२ मिनिटांत तयार होणारे नूडल्स खाता की दवाखान्यात भरती व्हायची तयारी करताय? वाचा, नक्की होतं काय..

ससाफ्रास तेल

काही प्रकारचे तेल आरोग्यासाठी घातक ठरतात. त्यापैकी एक म्हणजे, ससाफ्रास तेल. FSSAI ने २००३ मध्येच त्यावर बंदी घातली होती. कारण त्यात जास्त प्रमाणात युरिकिक ऍसिड होते. ज्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता जास्त होती. 

Web Title: FSSAI banned 5 foods in India, Check out list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.