Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > अगं तो गं...त्याचं नाव काय...शी बाई...आठवतच नाहीये, आपला मेंदू आपल्यासोबत खेळतो खेळ; पाहा कसा

अगं तो गं...त्याचं नाव काय...शी बाई...आठवतच नाहीये, आपला मेंदू आपल्यासोबत खेळतो खेळ; पाहा कसा

Why We Forgot Names : चेहरा ओळखीचा तर वाटतो, त्याना कधी, कुठे भेटलो हेही लक्षात असतं. पण नावच आठवत नाही. अनेकांसोबत असं घडतं. पण असं का होतं? स्मरणशक्ती कमी झाल्याने असं होतं की याला अजून काही कारण असतं. हेच आज आपण समजून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 10:00 IST2026-05-01T09:57:36+5:302026-05-01T10:00:00+5:30

Why We Forgot Names : चेहरा ओळखीचा तर वाटतो, त्याना कधी, कुठे भेटलो हेही लक्षात असतं. पण नावच आठवत नाही. अनेकांसोबत असं घडतं. पण असं का होतं? स्मरणशक्ती कमी झाल्याने असं होतं की याला अजून काही कारण असतं. हेच आज आपण समजून घेणार आहोत.

Why we remember face but forget names, know the reason behind it | अगं तो गं...त्याचं नाव काय...शी बाई...आठवतच नाहीये, आपला मेंदू आपल्यासोबत खेळतो खेळ; पाहा कसा

अगं तो गं...त्याचं नाव काय...शी बाई...आठवतच नाहीये, आपला मेंदू आपल्यासोबत खेळतो खेळ; पाहा कसा

Why We Forgot Names : अगं तो गं...तो काय त्याचं नाव...तो नाही का उंच, गोरा, बॉडी बिल्डर...शी बाई त्याचं नावच तोंडातच आहे पण आठवत नाहीये...असं अनेकदा अनेकांसोबत होतं. म्हणजे बघा ना...सकाळी झोपेतून उठल्यापासून आपल्याला इतके वेगवेगळे अनुभव येत असतात की, त्यांकडे आपण फारसं लक्षही देत नाहीत. त्यापैकीच हा एक अनुभव. म्हणजे चेहरा ओळखीचा तर वाटतो, त्याना कधी, कुठे भेटलो हेही लक्षात असतं. पण नावच आठवत नाही. अनेकांसोबत असं घडतं. पण असं का होतं? स्मरणशक्ती कमी झाल्याने असं होतं की याला अजून काही कारण असतं. हेच आज आपण समजून घेणार आहोत.

चेहरा ओळखणारा मेंदूचा भाग

आपल्या मेंदूमध्ये चेहऱ्या ओळख लक्षात ठेवणारा एक वेगळा असा कप्पा असतो, ज्याला फ्यूसीफॉर्म फेस एरिया असं म्हटलं जातं. हा कप्पा केवळ चेहऱ्यांना लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांची ओळख पटवण्यासाठी बनला आहे. जेव्हा कधी आपण कुणाचा चेहरा बघतो, तेव्हा आपला मेंदू त्या चेहऱ्याचं मॅपिंग एकत्र प्रोसेस करतो. चेहरा हा एक व्हिज्युअल डेटा आहे आणि मानवांचा मेंदू शब्दांच्या तुलनेत फोटोंना जास्त लक्षात ठेवतो.

नाव केवळ एक लेबल

गंमत अशी आहे की, चेहऱ्याच्या उलट नाव केवळ एक अब्स्ट्रॅक माहिती आहे. कुणाचं काहीही नाव असेल तरी ते त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत काहीच सांगत नाही. नाव केवळ हे नाममात्र असतं. ज्याचा व्यक्तीच्या चेहऱ्यासोबत काहीमात्र संबंध नसतो.

समजा जर आपण कुणाला भेटलात आणि ती व्यक्ती म्हणाली की, ती एक बेकर आहे किंवा शेफ आहे, तर ही बाब स्मरणात जास्त राहू शकते. कारण आपण लगेच डोक्यात ब्रेड, केक किंवा वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो तयार करतो. पण जर त्या व्यक्तीचं नाव मिस्टर बेकर असेल तर मेंदूकडे त्याचा संबंध जोडण्यासाठी कोणतेही व्हिज्युअल रेफरन्स नसतात.

बेकर पॅराडॉक्स

सायकॉलॉजीमध्ये याला बेकर-बेकर पॅराडॉक्स म्हटलं जातं. ही थेअरी सांगते की, आपला मेंदू मीनिंगफूल माहितीला नावांच्या तुलनेत जास्त सहजपणे लक्षात ठेवतो.चेहरा एक व्हिज्युअल डेटा आहे, तर नाव केवळ एक डेटा पॉइंट आहे.

इव्होल्यूशनशी संबंधित कनेक्शन

लाखो वर्षांआधी आदिमानवांना जीव वाचवण्यासाठी हे ओळखणं गरजेचं होतं की, समोरची व्यक्ती मित्र आहे की दुश्मन. ही ओळख चेहऱ्याचे हावभाव आणि बांध्यावरून केली जात होती. नावावरून नाही. आपला विकास असा झालाय की, आपण व्हिज्युअल संकेतांना लगेच ओळखतो. नाव ठेवण्याची परंपरा तर मानवी संस्कृतीमध्ये फार नंतर आली आहे.

Web Title : हम नाम क्यों भूल जाते हैं: मस्तिष्क का मेमोरी गेम समझाया गया।

Web Summary : नाम भूलना आम बात है क्योंकि मस्तिष्क अमूर्त लेबल (नाम) की तुलना में दृश्य डेटा (चेहरों) को प्राथमिकता देता है। 'बेकर-बेकर विरोधाभास' बताता है कि सार्थक जानकारी को मनमाने नामों की तुलना में याद रखना आसान है। नामकरण की तुलना में चेहरा पहचान पहले विकसित हुआ, जिससे दृश्य संकेत अधिक अंतर्निहित हो गए।

Web Title : Why we forget names: The brain's memory game explained.

Web Summary : Forgetting names is common because the brain prioritizes visual data (faces) over abstract labels (names). The 'Baker-Baker Paradox' explains that meaningful information is easier to recall than arbitrary names. Face recognition evolved earlier than naming, making visual cues more ingrained.