Lokmat Sakhi >Mental Health > जोडीदार न सांगता, खोटं बोलून पैसे वापरतो, हे आर्थिक 'अफेअर' ही महागात पडू शकतं...

जोडीदार न सांगता, खोटं बोलून पैसे वापरतो, हे आर्थिक 'अफेअर' ही महागात पडू शकतं...

What is Financial infidelity? : . घरातील एकच व्यक्ती कमावती असल्यामुळ पैसे मागणं किवा नकळतपणे घेणं, त्याच्या किंवा तिच्या कार्डवरून शॉपिंग या प्रकारांमध्ये वाढ झाली. त्यामुळे आर्थिक व्याभिचार म्हणजे नक्की काय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 01:14 PM2021-05-25T13:14:36+5:302021-05-25T13:27:21+5:30

What is Financial infidelity? : . घरातील एकच व्यक्ती कमावती असल्यामुळ पैसे मागणं किवा नकळतपणे घेणं, त्याच्या किंवा तिच्या कार्डवरून शॉपिंग या प्रकारांमध्ये वाढ झाली. त्यामुळे आर्थिक व्याभिचार म्हणजे नक्की काय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. 

What is Financial infidelity? : Financial infidelity is as harmful as sexual infidelity as per the study | जोडीदार न सांगता, खोटं बोलून पैसे वापरतो, हे आर्थिक 'अफेअर' ही महागात पडू शकतं...

जोडीदार न सांगता, खोटं बोलून पैसे वापरतो, हे आर्थिक 'अफेअर' ही महागात पडू शकतं...

Highlightsअनेकदा पैश्यांच्या बाबतीत अनेक घरांमध्ये खोटं बोललं जातं किंवा नकळतपणे पतीच्या किंवा पत्नीच्या पाकीटातून पैसे घेतले जातात.

लग्न एक असं नातं असतं ज्यात प्रामाणिकपणा आणि खरं बोलण्याला फार महत्व असतं.  या दोन गोष्टींवर संपूर्ण रिलेशनशिप टिकतं. पण कधी कधी खोटं बोल्ल्यानं काहीच फरक पडत नाही असंही तुम्ही पाहिलं असेल. जोपर्यंत तुमच्या वागण्यामुळे कोणालाही त्रास होत नाही तोपर्यंत सर्वकाही व्यवस्थित असतं.  अनेकदा पैश्यांच्या बाबतीत अनेक घरांमध्ये खोटं बोललं जातं किंवा नकळतपणे पतीच्या किंवा पत्नीच्या पाकीटातून पैसे घेतले जातात.

एका अभ्यासानुसार आर्थिक व्याभिचार हा सेक्यूअल व्याभिचाराइतकाच धोकादायक असतो, असं दिसून आलं आहे.  म्हणजेच पैश्यांच्या बाबतीत खोटं बोल्ल्यानं अनेक कुटुंबातील शांती आणि सुख नष्ट होऊ शकतं. कोरोनाकाळात अनेकांचे जॉब गेल्यानं अशा घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. घरातील एकच व्यक्ती कमावती असल्यामुळ पैसे मागणं किवा नकळतपणे घेणं, त्याच्या किंवा तिच्या कार्डवरून शॉपिंग या प्रकारांमध्ये वाढ झाली. त्यामुळे आर्थिक व्याभिचार म्हणजे नक्की काय हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. 

काय आहे 'आर्थिक व्याभिचार' 

शारीरिक आणि भावनिक व्यभिचार ओळखणे सोपे आहे, परंतु आर्थिक व्यभिचार कसे ओळखावे? नवीन वस्तू, बँक खाते आणि पगार घेण्याबाबत किंवा त्यासंबंधित माहिती या वर्गात येते का? काही काळापूर्वी ग्राहक संशोधन जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित झाला होता, त्यानुसार आर्थिक व्याभिचार अशा गोष्टींना म्हटलं जातं जिथं पैशांची निगडीत क्रिया असतात. 'आपल्या पार्टनरला हे आवडणार नाही,' याबाबत चूक करत असलेल्या व्यक्तीला याची चांगलीच कल्पना असते.  त्यामुळे ही गोष्ट पार्टनरसमोर खुलेपणानं बोलली जात नाही. 

नात्यासाठी ठरू शकतं जीवघेणं

या अभ्यासाचे लेखक जेनी ऑलसन जे आईयू केली स्कूल ऑफ बिजनसमध्ये असिस्टेंट प्रफेसर आहेत. त्यांच्यामते आर्थिक व्याभिचार कोणतंही नात टिकण्यात बाधा निर्माण करू शकतो. नातेसंबंधातील व्याभिचाराप्रमाणेच आर्थिक बाबीसुद्धा तितक्याच समस्या निर्माण करू शकतात. अनेकदा पैश्यांशी निगडीत व्यवहार लपवणं किंवा खोटं बोलण्यामुळे घटस्फोट होण्याचीही शक्यता असते. नात्यात पैसे महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे लोकांना आर्थिक व्याभिचाराबाबत केव्हाही माहिती असायलाच  हवी.

आर्थिक व्याभिचार लपून छपून खर्च केलेल्या पैश्यांपेक्षा आणि माहिती लपवण्यापेक्षा थोडा वेगळा असतो. उदा, बँक अकाऊंटमध्ये गुप्तपणे केलेली बचत निगेटिव्ह नाही तर 'पॉजिटिव अॅक्शन' मध्ये गणली जाते. अभ्सासानुसार आर्थिक व्याभिचाराबाबत फाइनेंशनल सर्विस उपलब्ध करत असलेल्या कंपन्या आणि क्लिनिकल थेरेपीस्ट, रिलेशिप काऊंसलर्सकडून माहित करून घेणं फायदेशीर ठरतं. जेणेकरून नातं नात्यातील वादविवाद कमी होतील.

वागण्यात बदल

संशोधकांनी यावर भर दिला की आर्थिक व्याभिचार नातेसंबंध आणि प्रभावी इफेक्टिव प्लानिंगसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अभ्यासानुसार, आर्थिक व्याभिचारात  लोकांना गुप्तपणे वस्तू खरेदी करण्यात जास्त रस असतो आणि त्यानुसार त्यांच्या कृतीसुद्धा असतात.' जसं की जॉईंट कार्डच्या जागी पर्सनल क्रेडिट कार्डचा वापर करणं किंवा कॅश वापरणं.

याशिवाय, वारंवार पापण्यांची उघड-झाप करणे, डोके रगडणे, ओठ चाटणे आणि व्यवस्थित न बसणेही काही संकेत असू शकतात. आपल्या पार्टनरच्या या बॉडी लँग्वेज ओळखा आणि आपले नाते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा आणि नाते व्यवस्थित होत नाही, असे वाटत असेल, तर स्वतःलाही ब्रेकअपसाठी तयार करा.

दबावात काही लोक स्वतःला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करतात. जसे, कुठल्याही गोष्टींशी खेळणे. स्वतःच्या चेहऱ्याला वारंवार स्पर्ष करणे. याशिवाय आपले ओठ अणि नखे कुरतडणेही एक संकेत आहे. याशिवाय आपण डोळ्यांच्या माध्यमानेदेखील हे जाणून घेऊ शकता, की आपला पार्टनर काहीतरी खोटं बोलत आहे.' आपले नाते आता संपुष्टात येऊ शकते, हा व्यक्ती बदलातील पहिला संकेत आहे असेही तज्ज्ञ सांगतात.

Web Title: What is Financial infidelity? : Financial infidelity is as harmful as sexual infidelity as per the study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.