कायम आनंदी राहणं ही काही मोठी किंवा अवघड गोष्ट नाही, पण त्यासाठी छोट्या सवयींमध्ये सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः महिलांसाठी, ज्या घर, काम आणि नातेसंबंध यांचा समतोल सांभाळतात, त्यांच्यासाठी स्वतःचा आनंद जपणं अधिक गरजेचं ठरतं. (5 tips to stay happy no matter What , mental health tips for women , must know these things )थोडासा वेळ स्वतःसाठी काढला आणि काही साध्या गोष्टी अंगीकारल्या, तर मन नेहमी हलकं आणि आनंदी राहू शकतं.
१. सर्वात आधी, स्वतःसाठी वेळ देणं शिकणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभर सगळ्यांची काळजी घेताना स्वतःला विसरण्याची सवय अनेक महिलांना असते. पण रोज काही वेळ आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी दिला, जसं वाचन, संगीत ऐकणं किंवा फिरायला जाणं, तर मन ताजंतवानं राहतं. हा छोटासा मी-टाईम तुमच्या आनंदाचा मोठा आधार ठरतो.
२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भावनांना दाबून न ठेवणं. अनेकदा स्त्रिया सगळं मनात साठवून ठेवतात, पण त्यामुळे ताण वाढतो. जवळच्या व्यक्तींशी मन मोकळं बोलणं, भावना व्यक्त करणं हे मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. रडावंसं वाटलं तर रडणं, हसावसं वाटलं की हसणं मन हलकं करतं.
३. तिसरी गोष्ट म्हणजे शरीराची काळजी घेणं. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप यामुळे फक्त शरीरच नाही तर मनही निरोगी राहतं. थोडंसं चालणं, योगा किंवा साधे स्ट्रेचिंग यामुळेही शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मूड सुधारतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. मला काय होणार आहे हा दृष्टिकोन बदला.
४. चौथी सवय म्हणजे 'नाही' म्हणायला शिकणं. प्रत्येक गोष्टीसाठी होकार देणं आणि स्वतःवर जास्त जबाबदाऱ्या लादून घेणं हे थकवा आणि चिडचिड वाढवू शकतं. आपल्या मर्यादा ओळखून योग्य वेळी 'नाही' म्हणणं हे स्वतःच्या आनंदासाठी खूप आवश्यक आहे.
५. आणि शेवटचं, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. रोजच्या आयुष्यातल्या साध्या क्षणांमध्ये अगदी चहा पिण्यातही आनंद आहे. घरात मिळणारी शांतता, मुलांच्या हसण्यातला आनंद, एखाद्या सुंदर संध्याकाळी फेरफटका मारायला जाणे , यामध्ये आनंद शोधला, तर जीवन अधिक सुंदर वाटू लागतं.
