lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का?

कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का?

Movies in 2021: एक स्त्री, तिचा संघर्ष आणि त्यातून मार्ग काढत तिने गाठलेलं तिचं ध्येय.. याची कहाणी सांगणारे २०२१ या वर्षातले बॉलीवूडचे हे ५ स्त्री केंद्रित चित्रपट खरोखरंच अनेक जणींसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 05:19 PM2021-12-21T17:19:21+5:302021-12-21T17:27:28+5:30

Movies in 2021: एक स्त्री, तिचा संघर्ष आणि त्यातून मार्ग काढत तिने गाठलेलं तिचं ध्येय.. याची कहाणी सांगणारे २०२१ या वर्षातले बॉलीवूडचे हे ५ स्त्री केंद्रित चित्रपट खरोखरंच अनेक जणींसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. 

Women centric movies of Bollywood in the year 2021  | कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का?

कभी पगलैट, कभी शेरनी, कभी बने थलैवी; 2021मध्ये स्त्रियांनी गाजवलेले 5 भन्नाट सिनेमे, पाहिले का?

Highlightsवर्षअखेर काही तरी मोटीव्हेशनल बघून नव्या वर्षाची सुरूवात उत्साहात करण्याचा विचार असेल तर हे काही चित्रपट पाहण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.

२०२१ हे वर्ष आलं आणि म्हणता म्हणता आता सरतही आलं. कोरोनाची दाहक दुसरी लाट या वर्षाने अनुभवली. कधी लॉकडाऊन तर कधी थोडे सैलसर झालेले नियम, यामध्ये हे वर्ष सरलं आणि वर्षअखेर दोन- तीन महिन्यांपुर्वी चित्रपटगृहे सुरू झाली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दणकून चित्रपट पाहता येत असले, तरी खऱ्या चित्रपट शौकिनांना मात्र टॉकिजमध्ये जाऊन चित्रपट पाहिल्याशिवाय चैन पडत नाही.

 

असंच काहीसं तुमचंही असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमचे हे चित्रपट पाहणं राहून गेलं असेल, तर या वर्षीचा राहिलेला हा चित्रपटांचा कोटा लवकर पुर्ण करून टाका. कारण या वर्षी असे काही चित्रपट आले, जे पुर्णपणे स्त्री आणि तिचा संघर्ष यावर केंद्रित होते. त्यामुळे निश्चितच ते अनेक जणींसाठी प्रेरणादायी ठरले. वर्षअखेर काही तरी मोटीव्हेशनल बघून नव्या वर्षाची सुरूवात उत्साहात करण्याचा विचार असेल तर हे काही चित्रपट पाहण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.

 

१. पगलैट Pagglait
एका तरूण विधवा मुलीची ही कहाणी.. तिला तिच्या पायावर उभं रहायचं आहे, पैसे कमवायचे आहेत, तिचं आयुष्य, तिची स्वप्ने जगायची आहेत.. पण या सगळ्यामध्ये अडथळा येत आहे तो तिच्या कुटूंबियांनी तिच्याकडे धरलेल्या हट्टाचा. दुसरं लग्न कर आणि पुन्हा आयुष्य नव्याने सुरू कर, असं तिला सतत सांगण्यात येतं.. सान्या मल्होत्रा या अभिनेत्रीने संध्याची ही भूमिका अतिशय उत्तमपणे साकारली आहे. प्रत्येक प्रसंगी होणारा भावनांचा, वेदनांचा आणि विचारांचा कल्लोळ दाखविण्यात ती यशस्वी झाली आहे. पती गेला तरी सून म्हणून तिच्याकडून  असणाऱ्या समाजाच्या अपेक्षा त्यातून  वाट काढत तिचा सुरू  असलेला प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

 

२. त्रिभंग Tribhanga
मुख्य भूमिकेत ३ अभिनेत्री असलेल्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा झाली होती. तन्वी आझमी, काजोल आणि मिथीला पालकर या मुलगी, आई आणि आजीच्या भुमिकेत असलेल्या तिघी जणी. तिघींचाही आयुष्याकडे बघण्याचा आणि आयुष्य जगण्याचा दृष्टीकोन अतिशय वेगवेगळा आणि स्वतंत्र. रेणूका शहाणे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका. चित्रपटातली काजोलची मुलगी माशा जुनाट विचार असलेल्या कुटूंबात लग्न करते. तिचे कुटूंब तिच्या स्वतंत्र विचारांच्या आईला, आजीला समजून घेतात, पण त्याचवेळी मात्र तिच्या पोटी मुलगाच व्हावा, ही अपेक्षा करतात. तिघींचे तीन टप्प्यांमधले संघर्ष बघितलेच पाहिजेत, असे आहेत. 

 

३. थलैवी Thalaivi
जय ललिता यांच्या जीवन कहानीने प्रेरीत होऊन तयार झालेला हा चित्रपट प्रत्येकाला काही ना काही तरी नक्कीच प्रेरणादायी, सकारात्मक असं काहीसं देऊन जातो. कंगणा राणावत ने यात निभावलेली अम्माची भूमिका अफलातून आहे. जयललिता यांचा राजकीय प्रवास सगळ्यांनाच माहिती आहे. पण या चित्रपटात हा प्रवास सुरू करण्यापुर्वीच्या त्या अधिक ठळकपणे दाखविण्यात आल्या आहेत. जयललिता यांच्या जीवनातले अनेक पैलू, अनेक कंगोरे जे आजवर लोकांसमोर आले नाहीत ते जाणून घ्यायचे असतील तर एकदा थलैवी बघायला हरकत नाही. 

 

४. शेरनी Sherani
शेरनी ही एका महिला वन अधिकाऱ्याची गोष्टी. महिला वन अधिकारी म्हणजे केवळ एक नामधारी पद. तिला यातलं काही कळत नाही असं समजण्याची तिथल्या लोकांची वृत्ती. पण विद्या बालनने भुमिका साकारलेली ही शेरनी मात्र या सगळ्या प्रतिमांना तडा देणारी आहे. लोकांच्या मनात असलेले हे समज खोडून काढण्यापासून ते एक सरकारी अधिकारी म्हणून तिचं अस्तित्व सिद्ध करण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास अनेक कठीण वळणांवरून जाणारा ठरतो. नोकरी, कुटूंब आणि आपलं निसर्गप्रेम यांच्यात वारंवार येणारी वादळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दाखविली आहेत. 

 

५. रश्मी रॉकेट Rashmi Rocket
गुजरातच्या एका लहानशा खेड्यातल्या मुलीची ही गोष्ट. एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती भाग घेते आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकते तेव्हा देश की बेटी म्हणून तिला गौरविल्या जातं. पण तरीही तिच्याविषयी लहानपणापासून येणारा प्रश्न मात्र काही केल्या थांबत नाही. हा प्रश्न म्हणजे "छोरी है के छोरा है?" तिच्या धावण्याची स्पीड पाहून तिला वारंवार या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. क्रिडा क्षेत्रातील लिंग चाचणीवर प्रकाश टाकणारा हा एक संवेदनशील चित्रपट. तापसी पन्नूचा या चित्रपटातला अभिनय अतिशय प्रगल्भ आहे. विषय आणि त्याचा टोकदारपणा समजून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा बघावाच.

 

Web Title: Women centric movies of Bollywood in the year 2021 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.