निवडणूक ड्युटीवर असताना आपल्या लहान मुलाला पाठीवर बांधलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचा फोटो आसामपोलिसांनीसोशल मीडियावर शेअर केला होता. पोलिसांनी तिच्या "कर्तव्य आणि निष्ठेचं" कौतुक केलं असले तरी या फोटोमुळे इंटरनेटवर उलटसुलट चर्चा सुरू झाली असून पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे.
मामोनी तेरॉन असे या महिला कॉन्स्टेबलचं नाव असून त्या गुवाहाटीच्या सीमेवर असलेल्या सोनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. असाम पोलिसांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये, गणवेशातील तेरॉन यांनी आपल्या बाळाला पारंपारिक आसामी 'गमोछा'ने (रुमाल/कापड) पाठीवर बांधलं आहे आणि त्या कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसत आहेत.
असाम पोलिसांनी 'X' वर पोस्ट करताना म्हटलं की, "सोनापूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल (WPC) मामोनी तेरॉन यांनी कर्तव्य आणि समर्पण म्हणजे काय असतं हे दाखवून दिलं आहे. निवडणुकीच्या कामाचा प्रचंड ताण असतानाही, त्या आपल्या मुलाला पाठीशी बांधून सेवा बजावत आहेत. या वीर मातेला आणि गणवेशातील प्रत्येक अदृश्य त्यागाला आमचा सलाम!"
हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी तेरॉन यांच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं, मात्र त्याच वेळी नेटकऱ्यांनी गणवेशात काम करणाऱ्या महिलांच्या, विशेषतः मातांच्या कामाच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका युजरने "मामोनी टेरॉन यांना आमचा सलाम. पण आसाम पोलिसांनी आता पाळणाघराची सोय करावी आणि पुढच्या वेळी त्याचे फोटो पोस्ट करावेत" असं म्हटलं आहे.
Web Summary : A photo of an Assam police constable, Mamoni Teron, performing election duty with her child strapped to her back has gone viral. While praised for her dedication, the image sparked debate about working conditions for mothers in uniform, with calls for better childcare support.
Web Summary : असम पुलिस कांस्टेबल मामोनी तेरोन की बच्चे को पीठ पर बांधकर चुनाव ड्यूटी करने की तस्वीर वायरल हुई। समर्पण के लिए सराहना के साथ, वर्दी में माताओं के लिए काम करने की स्थिति पर बहस छिड़ गई, बेहतर चाइल्डकैअर समर्थन की मांग उठी।