lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या एकत्रच ठेवता? तसं करणं चूकच- १ महत्त्वाचं कारण लक्षात ठेवाच..

फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या एकत्रच ठेवता? तसं करणं चूकच- १ महत्त्वाचं कारण लक्षात ठेवाच..

Why you should not keep fruits and vegetables together in fridge : फळं-भाज्या एकत्र ठेवल्याने नेमके काय होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2024 03:43 PM2024-03-04T15:43:41+5:302024-03-04T16:09:59+5:30

Why you should not keep fruits and vegetables together in fridge : फळं-भाज्या एकत्र ठेवल्याने नेमके काय होते?

Why you should not keep fruits and vegetables together in fridge : Fruits and vegetables should be kept separately in the fridge, 1 important reason... | फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या एकत्रच ठेवता? तसं करणं चूकच- १ महत्त्वाचं कारण लक्षात ठेवाच..

फ्रिजमध्ये फळं आणि भाज्या एकत्रच ठेवता? तसं करणं चूकच- १ महत्त्वाचं कारण लक्षात ठेवाच..

आपल्या फ्रिजमध्ये वेगवगेळ्या गोष्टी स्टोअर करण्यासाठी वेगवेगळे कप्पे असतात. मसाले, पीठं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांसोबतच आपण फ्रिजमध्ये भाजीपाला आणि फळंही साठवतो. बाजारातून फळं, भाज्या आणल्या की त्या लगेच वाळून जाण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर या गोष्टी जास्तच लवकर वाळतात. म्हणून आपण त्या घाईने फ्रिजमध्ये ठेवतो. काही वेळा घाईघाईत आपण फारसे लक्ष न देता फळं आणि भाज्या एकत्रच फ्रिजमध्ये ठेवतो (Why you should not keep fruits and vegetables together in fridge).

पण फ्रिजमध्ये यामध्ये प्रामुख्याने फळं आणि भाज्या ठेवण्यासाठी वेगळी सोय दिलेली असते. यामागेही १ महत्त्वाचे कारण असते. ते म्हणजे फळं आणि भाज्या एकत्र न ठेवता वेगळीच ठेवायला हवीत. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या सोबत ठेवल्यास त्या खराब होण्याची शक्यता असते. यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे फळांमधून एकप्रकारच्या नैसर्गिक अशा इथायलिन गॅसची निर्मिती होते, फळं नैसर्गिकरित्या पिकावीत यासाठी हा गॅस आवश्यक असतो. त्यामुळे फळं पिकतातही.  

फळं आणि भाज्या एकत्र ठेवल्याने काय होते? 

केळी, सफरचंद यांसारख्या काही फळांतून इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात गॅसची निर्मिती होते त्यामुळे ते जास्त लवकर पिकतात. फळांतून निर्माण होत असलेल्या गॅसमुळे भाज्या खराब होतात. हे दोन्ही एकत्र ठेवल्यास भाज्यांचा फ्लेवर आणि टेक्श्चर बदलते आणि त्याची मूळ चव जायला लागते. काकडी पिवळी होणे, पालेभाज्यांचा ताजेपणा कमी होऊन त्या मऊ पडणे, फळभाज्या लवकर पिकणे असे होते. म्हणूनच फळं आणि भाज्या फ्रिजमध्ये एकत्र ठेवू नयेत.

Web Title: Why you should not keep fruits and vegetables together in fridge : Fruits and vegetables should be kept separately in the fridge, 1 important reason...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.