Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उष्णतेचा त्रास, वाढती डोकेदुखी कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय, कपाळाला लावा ४ प्रकारचे लेप - मिळवा थंडगार अनुभव ..

उष्णतेचा त्रास, वाढती डोकेदुखी कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय, कपाळाला लावा ४ प्रकारचे लेप - मिळवा थंडगार अनुभव ..

Summer care remedies - forehead masks for health care, deal with heatwaves like this : उष्णतेचा त्रास कमी करतील हे घरगुती लेप.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 13:27 IST2026-05-18T13:26:09+5:302026-05-18T13:27:45+5:30

Summer care remedies - forehead masks for health care, deal with heatwaves like this : उष्णतेचा त्रास कमी करतील हे घरगुती लेप.

Summer care remedies - forehead masks for health care, deal with heatwaves like this | उष्णतेचा त्रास, वाढती डोकेदुखी कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय, कपाळाला लावा ४ प्रकारचे लेप - मिळवा थंडगार अनुभव ..

उष्णतेचा त्रास, वाढती डोकेदुखी कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय, कपाळाला लावा ४ प्रकारचे लेप - मिळवा थंडगार अनुभव ..

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढली की डोकं गरम होणं, कपाळ जड वाटणं, डोळ्यांची जळजळ होणं किंवा अस्वस्थता जाणवणं असे अनेक त्रास एकदाच व्हायला लागतात. अशावेळी काही घरगुती थंड गुणधर्म असलेले लेप शरीराला आराम देण्यास मदत करतात. (Summer care remedies - forehead masks for health care, deal with heatwaves like this )पूर्वीपासून घरांमध्ये उष्णता कमी करण्यासाठी चंदन, मुलतानी माती, पुदिना किंवा कोरफड यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. हे लेप शरीराला थंडावा देतात आणि उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत करतात.

चंदनाचा लेप हा उष्णता कमी करण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारा उपाय आहे. चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून कपाळावर लावल्यास छान गारवा मिळतो. उन्हामुळे होणारी डोकेदुखी, कपाळाची आग किंवा थकवा कमी होतो. त्याचप्रमाणे मुल्तानी मातीचाही लेप शरीरातील अतिरिक्त उष्णता ओढून घेण्यास मदत करतो. ही माती पाण्यात भिजवून कपाळावर किंवा मानेवर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो. शिवाय त्वचा सुंदरही होते. लेप भिजवून काही तासांसाठी गार करत ठेवला आणि मग लावला तर अजून आराम मिळतो.  

कोरफडीचा गरही उष्णतेच्या त्रासात उपयोगी ठरतो. कोरफडीमध्ये नैसर्गिक थंड गुणधर्म असतात. त्यात थोडी हळद मिसळून हलका लेप तयार केल्यास त्वचेला शांतता मिळते. उन्हातून आल्यानंतर हा उपाय केल्यास त्वचेवरील जळजळ कमी होण्यास मदत होते. काकडीचा गर किंवा रसही उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी मानला जातो. काकडी किसून कपाळावर किंवा डोळ्यांभोवती लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो. उन्हामुळे वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी हा सोपा उपाय फायदेशीर ठरतो. शिवाय काकडीचा रस साठवून नंतर तो घट्ट करुन लावला तरी फायद्याचा ठरतो.

घरगुती लेप वापरताना ते अतिशय थंड किंवा जास्त वेळ ठेवू नयेत. त्वचेवर खाज किंवा जळजळ वाटल्यास लगेच धुवून टाकावे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी पिणे, ताक, फळे आणि हलका आहार घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शरीर सतत गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी किंवा चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Web Title : गर्मी और सिरदर्द के लिए ठंडी माथे की परत: प्राकृतिक उपचार।

Web Summary : गर्मी से राहत पाने के लिए ठंडी माथे की परतें आजमाएं। चंदन, मुल्तानी मिट्टी, एलोवेरा और खीरा जैसे पारंपरिक उपचार सिरदर्द, जलन और बेचैनी से राहत दिलाते हैं। सुखदायक और ताज़ा अनुभव के लिए इन प्राकृतिक लेपों को लगाएं।

Web Title : Cooling forehead masks: Natural remedies for summer heat and headaches.

Web Summary : Combat summer heat with cooling forehead masks. Traditional remedies like sandalwood, multani mitti, aloe vera, and cucumber provide relief from headaches, burning sensations, and discomfort. Apply these natural pastes for a soothing and refreshing experience.