Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases >  How to stop sweating : दिवसभरात खूप घाम येतो? चिपचीपे अंग, दुर्गंधानं हैराण असाल तर या टिप्स वापरा, घाम येणं होईल कमी

 How to stop sweating : दिवसभरात खूप घाम येतो? चिपचीपे अंग, दुर्गंधानं हैराण असाल तर या टिप्स वापरा, घाम येणं होईल कमी

How to stop sweating too much : जास्त घाम येण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे देखील जास्त घाम येऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:23 PM2022-03-10T16:23:29+5:302022-03-10T16:38:55+5:30

How to stop sweating too much : जास्त घाम येण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे देखील जास्त घाम येऊ शकतो.

How to stop sweating too much : Health why excessive sweating in summer know its cause and treatment |  How to stop sweating : दिवसभरात खूप घाम येतो? चिपचीपे अंग, दुर्गंधानं हैराण असाल तर या टिप्स वापरा, घाम येणं होईल कमी

 How to stop sweating : दिवसभरात खूप घाम येतो? चिपचीपे अंग, दुर्गंधानं हैराण असाल तर या टिप्स वापरा, घाम येणं होईल कमी

सामान्यतः घाम येणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. उन्हात जेव्हा आपण काम करतो किंवा वर्कआउट करतो तेव्हा घाम येणे सामान्य आहे, परंतु काही लोकांना काम न करता, एखाद्या जागी शांत बसलेले असतानाही जास्त घाम येतो. (Sweating skin care) जास्त घाम येणे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. जास्त घाम येणे याला हायपरहाइड्रोसिस म्हणतात. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये जास्त घाम येतो. (Health why excessive sweating in summer know its cause and treatment) या लेखात अतिरिक्त घाम येण्यापासून स्वत:चा बचाव कसा करायचा, दुर्गंधी कशी टाळायची याबाबत टिप्स शेअर करणार आहोत. 

जास्त घाम येण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे देखील जास्त घाम येऊ शकतो. यामध्ये हृदयाच्या झडपाची जळजळ, हाडांशी संबंधित संसर्ग तसेच एचआयव्ही संसर्ग देखील होऊ शकतो. कोणतेही काम आणि व्यायाम न करता सामान्यपेक्षा जास्त घाम येणे हे हृदयाच्या समस्येचे लक्षण असू शकते. तणाव, चिंता आणि भीतीमुळे देखील जास्त घाम येऊ शकतो. जाणून घ्या जास्त घाम येण्याचे कारण आणि ते थांबवण्यासाठी घरगुती उपाय. (Summer care for skin)

जास्त घाम येण्याची कारणं

हायपरहाइड्रोसिस असलेल्या लोकांमध्ये घाम ग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे जास्त घाम येणे सुरू होते, शरीरात काही जीवाणूंचा संसर्ग होतो. हाडांचे संक्रमण किंवा इतर कोणताही आजार असू शकतो, जास्त वजनामुळे देखील जास्त घाम येतो, धुम्रपान, घट्ट कपडे घालणं, गर्भधारणेमुळे, कॅफिनयुक्त पदार्थांचा अति प्रमाणात सेवन, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने जास्त घाम येतो.

उपाय

१) जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर तुमच्या आहारात मीठ आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. 

२) गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल आणि जास्त घाम येणे उद्भवते. त्यानंतर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

३) टोमॅटोचे सूप, हिरवा चहा आणि  ज्वारीची भाकरी आहारात घ्या, जास्त घाम आल्यावर आराम मिळतो.

४) उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. यामुळे घामाला दुर्गंधी येण्याची समस्या होणार नाही.

५) आपल्या आहारातून तेलकट पदार्थ काढून टाका.

६) उन्हाळ्यात फक्त सुती कपडे घाला जेणेकरून घाम कपड्यांमधून सहज शोषला जाईल.

७) लिंबूपाणी नियमित प्या. जेणेकरून शरीरात मीठाची कमतरता भासू नये.

८) शरीराच्या ज्या भागाला जास्त घाम येतो. त्या जागेवर बटाट्याचे तुकडे चोळा.

९) रोज एक कप ग्रीन टी प्या. दुपारच्यावेळी  जेवणासोबत ताक घ्या

१०) तुमच्या आहारात द्राक्षे, बदाम आणि स्ट्रॉबेरीचा समावेश करा. 

Web Title: How to stop sweating too much : Health why excessive sweating in summer know its cause and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.