lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चष्मा नको पण चष्म्याशिवाय दिसत नाही? दूधात ३ पदार्थ मिसळून प्या-चष्म्याचा नंबर होईल कमी

चष्मा नको पण चष्म्याशिवाय दिसत नाही? दूधात ३ पदार्थ मिसळून प्या-चष्म्याचा नंबर होईल कमी

How to Get Rid of Spectacles : नजर चांगली राहण्यासाठी आणि डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:35 PM2024-03-22T15:35:04+5:302024-03-22T17:30:45+5:30

How to Get Rid of Spectacles : नजर चांगली राहण्यासाठी आणि डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता.

How to Get Rid of Spectacles : According To Ayurved Dr Add These 3 Foods In Your Milk To Improve Vision | चष्मा नको पण चष्म्याशिवाय दिसत नाही? दूधात ३ पदार्थ मिसळून प्या-चष्म्याचा नंबर होईल कमी

चष्मा नको पण चष्म्याशिवाय दिसत नाही? दूधात ३ पदार्थ मिसळून प्या-चष्म्याचा नंबर होईल कमी

घरात दीर्घकाळ काम केल्यामुळे किंवा स्क्रिनसमोर जास्तवेळ बसल्यामुळे डोळे कमकुवत होतात. अनेकांना लहानपणापासूनच डोळ्यांना चष्मा लागतो. (How to Improve Eyesight) मोतिबिंदू किंवा ग्लुकोमा यांसारख्या समस्या टाळण्यासाठी वेळीच लक्ष द्यायला हवं.  नजर चांगली राहण्यासाठी आणि डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता. (How to Get Rid of Spectacles)

डॉक्टर कपिल त्यागी यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार  झोपताना या मिश्रणाचे पाणी प्यायल्याने झोप चांगली  येते आणि मूड स्विंग्स चांगले राहण्यासही मदत होते. डिप्रेशनच्या सुरूवातीची लक्षणंही कमी होतात. फक्त ३ पदार्थ वापरून हा उपाय केल्यास डोळे चांगले राहण्यास मदत होईल. याशिवाय डोळ्यांचे इतर विकारही उद्भवणार नाहीत. (According To Ayurved Dr Add These 3 Foods In Your Milk To Improve Vision)

कोणते तीन पदार्थ दुधासोबत घेतल्याने डोळे चांगले राहतात.

एक ग्लास दूध, अर्धा चमचा बडीशेप,   ४ ते ५ बदाम, अर्धा चमचा खडीसाखर हे मिश्रण तुम्हाला  लागेल. एक्सपर्ट्सच्यामते बडिशेप, बदाम आणि खडीसारखेचे मिश्रण डोळ्यांना नैसर्गिकरित्या चांगले ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे डोळ्यांची शक्ती चांगली राहते.  हे मिश्रण नियमित दुधासोबत घेतल्याने डोळे चांगले राहतात आणि चश्म्याचा नंबर कमी होण्यासही मदत होते. 

व्हिटामीन्सचा खजिना

बदाम व्हिटामीन ई आणि ओमेगा ३ फॅटी एसिड्सचे परिपूर्ण असतात. ज्यामुळे फक्त डोळे चांगले राहत नाही तर इम्यूनिटीसुद्धा चांगली राहते. बडिशेपेच्या बिया बदाम आणि खडी-साखरेत मिसळल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. यातील औषधी गुणधर्म मोतीबिंदू, ग्लुकोमा यांसारख्या आजारांचा धोका रोखतात.

सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

एंटी ऑक्सिडेंट्सचा पॉवरहाऊस

आयुर्वेद एक्सपर्ट्स सांगतात की बडिशेपेच्या बियांना नेत्रज्योती असेही म्हटले जाते. यात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि डोळ्यांचे आरोग्यही यामुळे चांगले राहते. याची पावडर बनवण्यासाठी बडिशेप, बदाम आणि खडीसाखर सामन प्रमाणात घ्या.

१ कप बडिशेप, १ कप बदाम, १ कप खडीसाखर वाटून एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. हे पेय बनवण्यासाठी एक मोठा चमचा गरम दूधात मिसळा. रात्री झोपताना किंवा सकाळी नाश्त्याला याचे सेवन करा. ज्यामुळे तब्येतीलाही अनेक फायदे मिळतील.

Web Title: How to Get Rid of Spectacles : According To Ayurved Dr Add These 3 Foods In Your Milk To Improve Vision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.