lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

How Many Steps Should People Take Per Day : एका अभ्यासानुसार वाढत्या वयात पायी चालल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात फक्त चालण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 04:42 PM2024-03-21T16:42:38+5:302024-03-21T16:52:06+5:30

How Many Steps Should People Take Per Day : एका अभ्यासानुसार वाढत्या वयात पायी चालल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात फक्त चालण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी. 

How Many Steps Should People Take Per Day : Right Way to Walk According to Experts | सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

निरोगी राहण्याासठी शारीरिकदृष्या एक्टिव्ह राहणं फार गरजेचं असतं. यात रेग्युलर व्यायाम करणं फार महत्वाचे आहे. तुम्ही रोज चालून स्वत:ला फिजिकली आणि मेंटली फिट ठेवू शकतात. जास्तीत जास्त लोकांना फिरायला खूप आवडतं. काही लोक चालताना स्टेप्ससुद्धा काऊंट करतात. (Right Way to Walk According to Experts) एका अभ्यासानुसार वाढत्या वयात पायी चालल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात फक्त चालण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी.  (How Many Steps To Take Everyday Ways to Walk to Be Fit And Live Longer Walking Benefits)

रोज किती पाऊलं चालणं फायदेशीर ठरतं?

न्युयॉर्क टाईम्समध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार  ब्रिटिश जर्नल ऑफ  स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित  झाले आहे की कमीत  कमी २ हजार २०० पाऊल चाललल्याने हृदय रोग आणि डायबिटीस यांसारख्या आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच रोज ९ हजार पाऊलं  चालणं प्रभावी मानलं जातं. तुम्ही रोज २ हजार २०० पाऊल चाला किंवा हजार पाऊलं चाला. चालण्याच्या पद्धतीवर फोकस करायला हवा. रोज जास्तीत जास्त चालल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

 

चालण्याची सुरूवात

मॅसाचुसेट्स एमहर्स्ट विद्यापीठाच्या कायन्ससोलॉजी प्रोफेसर अमांड पालुच  सांगतात की, ज्यांना चालण्याची सवयच नाहीये त्यांनी हळूहळू चालायला हवं. आपल्या घरात फिरण्याची  सुरूवात तुम्ही करू शकता.  २००० पाऊलं चाला. कोणत्याही वेगाने चालणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

जर तुम्ही रोज हजार ते आठ हजार पाऊलं चालत असाल तर चालण्याच्या गतीकडे लक्ष देणंसुद्धा तितकंच महत्वाचे आहे. ज्यामुळे हार्ट हेल्थ चांगली राहते.  श्वास घ्यायला त्रास होत नाही. हृदयाची प्रणाली मजबूत राहते. नेचर जर्नल २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार वेगाने चालल्यामुळे स्लिप एप्निया, एसिड रिफ्लेक्स, डायबिटी आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. ३० सेकंद किंवा १ मिनिटं वेगाने चाला.

सद्गुरुंवर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी-डोक्याला होती सूज, मेंदूचे विकार का होतात, लक्षणं-उपाय पाहा

जर तुम्ही घरीच काम करत असाल फार बाहेर जाण्याची संबंध येत  नसेल तर रोज थोडं बाहेर जाऊन फिरण्याची सवय ठेवा. निसर्गासह वेळ घालवा. कारण यामुळे मानसिक आरोग्याला बरेच फायदे मिळतात. नॉर्थ वेस्टर्न मेडिसिनमध्ये हृदय रोग तज्ज्ञ आणि अमेरिकन हार्ट असोशिएशनचे स्वयंसेवक डॉ. खान सांगतात की पायी चालल्याने फिटनेस मेंटेन राहतो. मध्यम गतीने चालण्याऐवजी  वेगाने चालण्याचा रुटीनमध्ये समावेश करा.

जॉगिंग  करा

धावल्याने तुम्हाला लॉन्ग टर्म फायदे मिळतील. तुम्ही ३० सेकंद किंवा एक मिनिटं धावायला सुरूवात करा.  हळूहळू सवय झाल्यानंतर हा वेळ वाढवत राहा. ज्यामुळे हाडं, मांसपेशी, हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. मानसिक आरोग्यही चांगले राहील.

Web Title: How Many Steps Should People Take Per Day : Right Way to Walk According to Experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.