lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोपताना १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ मिसळून प्या; ५ मिनिटांत ढाराढूर व्हाल, शांत झोप येईल

रात्री झोपताना १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ मिसळून प्या; ५ मिनिटांत ढाराढूर व्हाल, शांत झोप येईल

Good Sleep Drink These Things Before Go to Bed : रात्री झोपण्याआधी दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 12:34 PM2024-04-21T12:34:17+5:302024-04-21T12:49:27+5:30

Good Sleep Drink These Things Before Go to Bed : रात्री झोपण्याआधी दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होईल.

Good Sleep Drink These Things Before Go to Bed : Drinks Before Bed That Will Help You Sleep | रात्री झोपताना १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ मिसळून प्या; ५ मिनिटांत ढाराढूर व्हाल, शांत झोप येईल

रात्री झोपताना १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ मिसळून प्या; ५ मिनिटांत ढाराढूर व्हाल, शांत झोप येईल

हेल्दी राहण्यासाठी रात्री चांगली झोप घेणं फार महत्वाचे असते. (Health Tips) आजकालच्या ताण-तणावपूर्ण जीवनशैलीमुळे लोकांना झोप न येण्याची समस्या उद्भवते. (Best Drinks For Sleep) रात्रीच्यावेळी व्यवस्थित झोप न झाल्याने शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. याशिवाय मेंटल हेल्थवरही परिणाम होतो. झोपण्याआधी दूधाचे सेवन तब्येतीसाठी बरेच फायदेशीर ठरते. (Good Sleep Drink These Things Before Go to Bed)

दूधात ट्राइप्टोफॅन नावाचे अमिनो एसिड असते. ज्यामुळे झोप चांगली लागण्यास मदत होते.  रात्री झोपण्याआधी दूधात काही पदार्थ मिसळून प्यायल्याने झोप चांगली येते. रात्री झोपण्याआधी दूधात दालचिनी मिसळून प्यायल्याने चांगली झोप येण्यास मदत होईल. यासाठी एक ग्लास कोमट दूधात अर्धा चमचा दालचिनी पावडर मिसळून प्या. (The Best Drink Before Bedtime)

जर तुम्हाला व्यवस्थित झोप  येत नसेल तर दूधात अश्वगंधा पावडर मिसळून पिऊ शकता. यासाठी एक ग्लास दूधात कोमट दूधात एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळून याचे सेवन करा. ज्यामुळे ताण-तणाव दूर होण्यास मदत होईल आणि चांगली झोप येण्यास मदत होईल. रात्री झोपण्याच्या आधी हळदीचे दूध पिणं फायदेशीर ठरतं. यामुळे शरीराचा थकवा, ताण-तणाव दूर होण्यास मदत होते. ज्यामुळे चांगली झोप येण्यास मदत होते. नियमित रूप सेवन केल्याने अनिद्रेचे समस्या दूर होण्यास मदत होते. 

गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल

दूधात जायफळ मिसळून प्या

झोपण्याच्या आधी गरम दूधात जायफळ मिसळून प्यायल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते आणि चांगली झोप येते. यामुळे शरीराला थकवा जाणवत नाही. एक ग्लास कोमट दूधात चुटकीभर जायफळ पावडर मिसळून प्या. याच्या नियमित सेवनाने अनिद्रा आणि एंग्जायटीची समस्या दूर होण्यास मदत होते. 

दूध शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. जास्तीत जास्त घरांमध्ये मुलांना रात्री दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे चांगली झोप येते असा सर्वांचा समज असतो. रिसर्चनुसार रात्री दूध प्यायल्याने माईंड आणि बॉडी रिलॅक्स राहण्यास मदत होते. चांगली, शांत झोप येते. दूध आणि डेअरी उत्पादनांमध्ये ट्रिप्टोफॅन असते जे एक अमिनो एसिड आहे.

Web Title: Good Sleep Drink These Things Before Go to Bed : Drinks Before Bed That Will Help You Sleep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.