Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डॉक्टर सांगतात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणंही आरोग्यासाठी खूप घातक! त्याऐवजी 'याचा' करा वापर

डॉक्टर सांगतात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणंही आरोग्यासाठी खूप घातक! त्याऐवजी 'याचा' करा वापर

Health Tips: तुम्हीही लाकडी चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर ते आरोग्यासाठी कसं घातक ठरू शकतं याविषयी डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला एकदा वाचायलाच हवा..(expert suggests stop using wooden chopping board immediately)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 13:13 IST2025-02-13T13:12:49+5:302025-02-13T13:13:36+5:30

Health Tips: तुम्हीही लाकडी चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर ते आरोग्यासाठी कसं घातक ठरू शकतं याविषयी डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला एकदा वाचायलाच हवा..(expert suggests stop using wooden chopping board immediately)

expert suggests stop using wooden chopping board immediately, side effects of using Wooden Cutting Board | डॉक्टर सांगतात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणंही आरोग्यासाठी खूप घातक! त्याऐवजी 'याचा' करा वापर

डॉक्टर सांगतात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणंही आरोग्यासाठी खूप घातक! त्याऐवजी 'याचा' करा वापर

Highlightsयामुळे अन्न तर दुषित होतेच पण त्यासोबतच आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात.

भाज्या चिरण्यासाठी पुर्वी विळीचा वापर केला जायचा. पण आता काही अपवाद सोडले तर जवळपास सगळ्याच घरांमधून विळी हद्दपार झाली आहे आणि त्याची जागा चॉपिंग बोर्डने घेतली आहे. प्लास्टिकचे किंवा लाकडाचे चॉपिंग बोर्ड हल्ली घराघरांमध्ये दिसतात. कारण सुरी घेऊन त्यांच्यावर भाजी चिरणं अगदी सोपं जातं आणि शिवाय भाजी चिरण्याचं कामही खूप पटापट होतं. पण ज्याप्रमाणे प्लास्टिकच्या बहुतांश वस्तू वापरणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्याचप्रमाणे प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरणंही घातक आहे. त्यामुळे त्याचा वापर टाळायला हवा हे आपल्याला माहिती आहे. त्याला पर्याय म्हणून मग अनेकजणी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरतात. पण आता तर लाकडी चॉपिंग बोर्डमुळेही आपण अनेक आजारांना आमंत्रण देत आहोत (expert suggests stop using wooden chopping board immediately) म्हणून त्याचा वापरही टाळायला हवा, असं डॉक्टर सांगत आहेत..(side effects of using Wooden Cutting Board)

 

लाकडी चॉपिंग बोर्ड वापरण्याचे दुष्परिणाम

तुम्हीही भाज्या चिरण्यासाठी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर एकदा डॉक्टरांनी दिलेली ही माहिती जरूर वाचा. डॉ. वर्षा गोर यांनी याविषयी दिलेली माहिती न्यूज१८ ने प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉक्टर सांगत आहेत की जसा जसा वापर लाकडी चॉपिंग बोर्ड वापरू लागतो तसे तसे त्यावर स्क्रॅचेस येऊ लागतात.

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:चं आणि कुटूंबाचं आरोग्य येऊ शकतं धोक्यात 

या बारीक स्क्रॅचेसमध्ये मग चिरलेल्या भाज्यांचा ओलसरपणा किंवा काही कण अडकून राहतात. आपण जेव्हा साबण लावून हे बोर्ड साफ करतो तेव्हा तो अगदी स्वच्छ होतोच असे नाही. अशावेळी मग भाज्यांचे कण, साबण आणि लाकूड यांची रिॲक्शन होते आणि त्यातून सॅलमोनेला (Salmonella), ई कोली (E. coli), लिस्टेरिया (Listeria) असे घातक सुक्ष्मजीव तयार होतात आणि वाढत जातात.

 

वरवर जरी तो चॉपिंग बोर्ड डोळ्यांना स्वच्छ दिसत असला तरी त्यावर वरील प्रकारचे असंख्य जिवाणू असू शकतात. त्याच्यावरच जेव्हा आपण पुन्हा भाज्या चिरतो तेव्हा ते आपल्या अन्नात मिसळले जातात.

गालांवर खूप ओपन पोअर्स असल्याने चेहरा थोराड दिसतो? ५ टिप्स- त्वचा होईल नितळ- स्वच्छ

यामुळे अन्न तर दुषित होतेच पण त्यासोबतच पोटाचे विकार, वारंवार आजारी पडणे, वारंवार ताप येणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा आरोग्याच्या अनेक समस्याही निर्माण होतात. त्यामुळे लाकडी चॉपिंग बोर्डऐवजी बांबूचा बोर्ड, काचेचा किंवा ॲक्रेलिकचा चॉपिंग बोर्ड किंवा मग स्टीलचा चॉपिंग बोर्ड वापरा असा सल्ला डॉक्टर देतात. 

 

Web Title: expert suggests stop using wooden chopping board immediately, side effects of using Wooden Cutting Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.