lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Diabetes Tips : शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय; झटक्यात कमी होईल

Diabetes Tips : शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय; झटक्यात कमी होईल

Diabetes Tips : हायपरग्लाइसीमिया म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असल्यास डायबिटीसची समस्या वाढते आणि वेळीच काळजी न घेतल्यास शरीराच्या नसा आणि वाहिन्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:31 PM2021-10-04T18:31:05+5:302021-10-05T14:34:44+5:30

Diabetes Tips : हायपरग्लाइसीमिया म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असल्यास डायबिटीसची समस्या वाढते आणि वेळीच काळजी न घेतल्यास शरीराच्या नसा आणि वाहिन्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.

Diabetes Tips : Type2 diabetes prevention harvard medical experts share 5 simple steps to beat blood sugar or insulin spike | Diabetes Tips : शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय; झटक्यात कमी होईल

Diabetes Tips : शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितले ५ उपाय; झटक्यात कमी होईल

Highlightsडायबिटीस टाळण्यासाठी, हॉवर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रक्तातील साखरेवर मात करण्यासाठी 5 अत्यंत सोपे मार्ग सुचवले आहेत जे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये वापरल्यास निरोगी राहण्यास मदत होईल.

डायबिटीस हा एक क्रोनिक आजार आहे जो स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करण्यात अपयशी ठरते किंवा जेव्हा शरीर स्वतः तयार केलेल्या इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही अशावेळी उद्भवतो. हायपरग्लाइसीमिया म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असल्यास डायबिटीसची समस्या वाढते आणि वेळीच काळजी न घेतल्यास शरीराच्या नसा आणि वाहिन्यांना गंभीर नुकसान होऊ शकते.

WHO च्या मते, डायबिटीस हा एक गंभीर आजार आहे. जो जगभरात वेगाने पसरत आहे. तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीत बदल करून टाइप 2 डायबिटीस मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. यामुळे हृदयरोग आणि कर्करोग होण्याची शक्यता कमी होईल. डायबिटीस टाळण्यासाठी, हॉवर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रक्तातील साखरेवर मात करण्यासाठी 5 अत्यंत सोपे मार्ग सुचवले आहेत जे आपण आपल्या जीवनशैलीमध्ये वापरल्यास निरोगी राहण्यास मदत होईल.

जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे व्यक्तीला टाइप -२ डायबिटीसचा जास्त असतो. Diadetes.co.uk च्या अनुसार, अनेक अभ्यास दर्शवतात की पोटातील चरबी प्रो-इंफ्लेमेट्री केमिकल्स सोडते, ज्यामुळे शरीर इन्सुलिनप्रती कमी संवेदनशील बनू शकते. याला इन्सुलिन रेजिस्टंट म्हणतात. 

आहारात बदल करा

हॉवर्डचा अहवाल म्हणतो की आपली आहारशैली सुधारल्याने टाइप 2 डायबिटीसचा धोका टळू शकतो. यासाठी तुम्हाला कोणतेही गोड पेय सोडून कॉफी किंवा चहाचा पर्याय निवडावा लागेल. आहारात हेल्दी फॅट्सचा समावेश करा. लाल मांसाचे सेवन टाळा आणि प्रक्रिया केलेले मांस टाळा. त्याऐवजी शेंगदाणे, बीन्स, धान्य, चिकन किंवा मासे खा.

एक्टिव्ह राहा

बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा. ही क्रिया टाईप 2 डायबिटीसला प्रोत्साहन देते. हे लक्षात ठेवा की स्नायूंची जास्त हालचाल इंसुलिन वापरण्याची आणि ग्लुकोज शोषण्याची त्यांची क्षमता सुधारते. यामुळे तुमच्या इन्सुलिन निर्माण करणाऱ्या पेशींवर कमी ताण पडतो. ऑस्ट्रेलियन संशोधनाने असा दावा केला आहे की बराच वेळ एकाच खुर्चीवर किंवा बेंचवर बसणे टाईप 2 डायबिटीसच्या वाढत्या जोखमीशी संबंधित आहे.

धुम्रपान सोडा

धूम्रपानाशी संबंधित आरोग्य समस्यांमध्ये टाइप 2 डायबिटीस प्रथम येतो. धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा धूम्रपान करणाऱ्यांना डायबिटीस होण्याची शक्यता 50 टक्के जास्त असते. जास्त धूम्रपान करणाऱ्यांमध्ये त्याचा धोका अधिक धोकादायक आहे.

यूएसएफडीएच्या मते, धूम्रपान केल्याने डायबिटीससारख्या रोगाचे व्यवस्थापन करणे आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करणे अधिक कठीण होऊ शकते. खरं तर, निकोटीनची उच्च पातळी इंसुलिनचा प्रभाव कमी करते, ज्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अधिक इंसुलिनची आवश्यकता असते.

मद्यपान नियंत्रणात असावं

सामान्यतः असे मानले जाते की हृदयासाठी जे चांगले आहे ते एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेसाठी देखील चांगले आहे. काही अभ्यास सुचवतात की अल्कोहोल टाइप 2 डायबिटीसच्या कमी जोखमीशी संबंधित आहे. अधिक अल्कोहोलच्या सेवनाने जोखीम वाढण्याची शक्यता जास्त असते. अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या मते, अल्कोहोलचे सेवन कसे करावे यासाठी कोणतेही विशिष्ट नियम नाहीत.

त्यामुळे तुमच्या मद्यपानाच्या सवयींबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. हॉवर्ड वेबसाइटनुसार जर तुम्ही आधीच अल्कोहोल घेत असाल तर ते कमी केले पाहिजे. जर तुम्ही मद्यपान केले नाही, तर सुरू करण्याची गरज नाही. वजन कमी करून, व्यायाम करून आणि खाण्याच्या पद्धती बदलून तुम्ही जवळपास सारखेच फायदे मिळवू  शकता.

Web Title: Diabetes Tips : Type2 diabetes prevention harvard medical experts share 5 simple steps to beat blood sugar or insulin spike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.