lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Cholesterol Control Tips : शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतात हे ५ स्वस्त, प्रभावी उपाय; हृदयाच्या आजारांपासूनही लांब राहाल

Cholesterol Control Tips : शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतात हे ५ स्वस्त, प्रभावी उपाय; हृदयाच्या आजारांपासूनही लांब राहाल

Cholesterol Control Tips : उच्च कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जीवनशैलीत काही बदल करून खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:42 AM2022-05-12T11:42:17+5:302022-05-12T11:43:03+5:30

Cholesterol Control Tips : उच्च कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जीवनशैलीत काही बदल करून खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते.

Cholesterol Control Tips : According to nutritionist anjali mukerjee share 5 easy ways to reduce bad cholesterol fast | Cholesterol Control Tips : शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतात हे ५ स्वस्त, प्रभावी उपाय; हृदयाच्या आजारांपासूनही लांब राहाल

Cholesterol Control Tips : शरीरातलं घातक कोलेस्टेरॉल बाहेर काढतात हे ५ स्वस्त, प्रभावी उपाय; हृदयाच्या आजारांपासूनही लांब राहाल

कोलेस्टेरॉल शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. रक्तामध्ये आढळणारा हा मेणयुक्त पदार्थ निरोगी पेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असतो. मात्र, शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाला मर्यादा असते आणि ती ओलांडल्यास शरीराचे अनेक नुकसान होऊ शकते. (How to reduce cholesterol) उच्च कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जीवनशैलीत काही बदल करून खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते. (Indias famous nutritionist anjali mukerjee share 5 easy ways to reduce bad cholesterol fast)

न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी दररोज त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर आरोग्याशी संबंधित टिप्स आणि युक्त्या शेअर करत असतात.  अलीकडेच त्यांनी वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याचे काही उपाय सांगितले आहेत. अंजलीने लिहिले की, चांगले खाणे तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यापासून आराम मिळण्यासाठी काही गोष्टींचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात करू शकता.

पॉलिअन्सॅच्यूरेडेट फॅटी एसिड्स टाळा

पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असलेले तेल टाळण्याचा सल्ला दिला जातो. कॉर्न ऑइल आणि सनफ्लॉवर ऑइल यासारख्या तेलांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् जसे की ऑलिव्ह ऑईल, फ्लेक्ससीड ऑइल इत्यादींचे सेवन करावे.

कार्ब्सचे सेवन कमी करा

अंजली यांनी कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करावे असे सुचवले. खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी एकूणच कार्बचे सेवन कमी केले पाहिजे.

डाएटरी फायबर्स

खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायबरचे सेवन आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात ओट्स, धान्य आणि सर्व प्रकारच्या डाळी आणि बीन्सचा समावेश करा. या सर्व गोष्टी फायबरचा चांगला स्रोत आहेत.

घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

व्हिटामीन ई

शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटॅमिन ई सप्लिमेंट घेऊ शकता.

लैंगिक संबंधात रसच नाही; आपल्यात ‘ताकद’च नाही असं वाटण्याचे काय कारण? तज्ज्ञ सांगतात..

सॅच्यूरेटेड फॅट्सवर लक्ष द्या

जेव्हा सॅच्युरेटेड फॅट्सचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते तेव्हा त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.  पनीर, लाल मांस आणि तूप यांसारख्या सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन करता तेव्हा तुम्ही प्रमाणावर लक्ष ठेवावे.
 

Web Title: Cholesterol Control Tips : According to nutritionist anjali mukerjee share 5 easy ways to reduce bad cholesterol fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.