What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

Published:May 11, 2022 03:02 PM2022-05-11T15:02:51+5:302022-05-11T15:48:16+5:30

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : जरा अन्नाचे कण पडलेले दिसले की मुंग्या लगेच त्यावर तुटून पडतात आणि लांबलचक रांगच लावतात. (How to Get Rid of Ants)

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

उन्हाळ्याच्या दिवसात घरात मुंग्या होण्याचं प्रमाण खूप वाढतं. जरा अन्नाचे कण पडलेले दिसले की मुंग्या लगेच त्यावर तुटून पडतात आणि लांबलचक रांगच लावतात. (How to Get Rid of Ants) मुंग्या लागल्यानंतर अन्नपदार्थ खायची इच्छासुद्धा होत नाही. ऐनवेळी घरात मुंग्या नष्ट करण्याचा खडू नसेल तर काय करावं सुचत नाही. मुंग्या अंगाला चावल्यानंतर खाज, पुरळ येतात तो त्रास वेगळाच. (How To Get Rid Of Ants in Your Home) या लेखात मुंग्यांना घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत कोणत्याही खर्च न करतात घरीच उपलब्ध असलेले काही पदार्थ मुग्यांना घरापासून लांब ठेवू शकतात. (5 Best Home Remedies to Get Rid of Ants)

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

पीठ पाहून मुंग्या पळून जातात, प्रत्येक घरात पीठ सहज उपलब्ध होते. घरात जिथे मुंग्यांची रांग दिसेल तिथे पीठ शिंपडा. असे केल्याने तुम्हाला त्या ठिकाणी एकही मुंगी दिसणार नाही.

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

मुंग्यांना दालचिनीचा वास आवडत नाही. दालचिनीच्या तेलाचा एक चतुर्थांश भाग एक कप पाण्यात मिसळा आणि त्या पाण्यात थोडा कापूस भिजवा, मुंग्या घरात जिथे असतात ती जागा स्वच्छ करा. त्या ठिकाणी त्याची पावडर शिंपडा. जिथे दालचिनी असेल तिथे मुंग्या येणार नाहीत.

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

मुंग्या दूर करण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळून स्वयंपाकघराच्या ज्या कोपऱ्यात आणि मुंग्या येतात अशा ठिकाणी ठेवा. मुंग्यांना व्हिनेगरचा वास सहन होत नाही, म्हणून त्या त्यापासून दूर पळतात.

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

मुंग्यांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही पेपरमिंट तेल वापरू शकता. कापसाच्या बॉलवर पेपरमिंट तेलाचे काही थेंब टाका आणि मुंग्या जिथून येतात त्या ठिकाणी ठेवा. याशिवाय मुंग्यांच्या मार्गावर तुम्ही पेपरमिंट तेल पाण्यात मिसळून फवारणी करू शकता.

What Is The Fastest Way To Get Rid Of Ants : घरात लाल मुंग्यांनी धुमाकूळ घातलाय; फक्त ५ उपाय, मुंग्यांची रांग होईल कमी

जर तुम्ही संत्रा, लिंबू, या फळांचे सेवन करत असाल तर त्यांची साले फेकू नका. अशा सर्व लिंबूवर्गीय फळांची साल मुंग्या दिसणाऱ्या ठिकाणी ठेवा.