lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तारूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला

तारूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला

5 High Vitamin B-12 : अमेरीकेतील प्रसिद्ध लेखक डॉ. जोसेफ मेरकोल यांनी व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी किती आवश्यक आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 11:42 AM2024-03-01T11:42:33+5:302024-03-02T01:34:05+5:30

5 High Vitamin B-12 : अमेरीकेतील प्रसिद्ध लेखक डॉ. जोसेफ मेरकोल यांनी व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी किती आवश्यक आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

American Dr Mercola Told 5 High Vitamin B-12 : Top Foods For Vitamin B-12 For Muscles And Strong Bones | तारूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला

तारूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं, अमेरिकन डॉक्टरांचा सल्ला

हाडांच्या विकासासाठी प्रोटीन कॅल्शियमप्रमाणेच आयर्न आणि व्हिटामीन बी-१२ ( Vitamin B-12) सारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. ज्यामुळे रक्त वाहिन्या चांगल्या राहतात. याशिवाय शरीरात डिएनएसुद्धा तयार होते. व्हिटामीन बी-१२ एक प्रमुख बी-कॉम्पलेक्स आहे. (American Dr Mercola Told 5 High Vitamin B-12) हे व्हिटामीन शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते. यामुळे रक्ताच्या पेशी चांगल्या रितीने कार्य करतात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. नसा देखिल चांगल्या राहतात. (Top Foods For Vitamin B-12 For Muscles And Strong Bones)

शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. (Vegetarian Foods For Vitamin B-12) अमेरीकेतील प्रसिद्ध लेखक डॉ. जोसेफ मेरकोल यांनी व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी किती आवश्यक आहे आणि व्हिटामीन बी १२ च्या कमतरतेसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

व्हिटामीन बी-१२ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय खावे? (Foods For Vitamin B-12)

नॅशनल  इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार गव्हाची चपाती, दूध, केळी, स्ट्रॉबेरी, पालक, दही, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचे मुख्य कारण आहे मेगालोब्लास्टिक एनिमिया. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे न्युरोलोजिकल समस्या उद्भवू शकतात.

ज्यामुळे स्मृती कमकुवत होणं, मेंदूचा विकास न होणं अशा समस्या उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता न्युरोपेथीचे कारण ठरते. ज्यामुळे हात, पायांमध्ये वेदना जाणवतात.  मानसिक समस्याही उद्भवतात. व्हिटामीन बी-१२ च्या  कमतरतेमुळे  मानसिक समस्या उद्भवू शकतात  जसं की डिप्रेशन, चिंता आणि ताण-तणाव.

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेची लक्षणं (Vitamin B-12 Deficiency Symptoms)

व्हिटामीन  बी च्या कमतरतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणं अशी लक्षणं दिसून येतात. पचनाच्यासंबंधित समस्या जसं की गॅस, अपचन व्हिटामीन बी-१२ नसल्यामुळे उद्भवते. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे जिभेला सूज येणं आणि इतर वेदनाही उद्भवतात.  हातापायांना सूज  येणं हे व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेचे लक्षण आहे. यामुळे मानसिक समस्याही उद्भवतात.

रोज किती व्हिटामीन  बी-१२ आवश्यक असतं? (Daily Need Of  Vitamin B-12 Food)

व्हिटामीन बी-१२ चे प्रमाण वय, लिंग आणि अन्य स्थितीवर अवलंबून असते.  वयस्कर लोकांना रोज जवळपास  २.४ मायक्रोग्राम व्हिटामीन बी-१२ ची आवश्यकता असते. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी रोज जवळपास  २.६ मायक्रोग्राम व्हिटामीन बी-१२ ची आवश्यकता असते.  गॅस्टोइटेस्टायल प्रोब्लेम्स असलेल्या लोकांना या व्हिटामीन्सची आवश्यकता जास्त असते. 

Web Title: American Dr Mercola Told 5 High Vitamin B-12 : Top Foods For Vitamin B-12 For Muscles And Strong Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.