lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...

5 wonderful benefits of having buttermilk post meals : ताकातील पौष्टीक घटक आरोग्याला मिळावे, यासाठी 'या' वेळेत न चुकता ताक प्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 04:38 PM2024-03-10T16:38:59+5:302024-03-10T16:50:20+5:30

5 wonderful benefits of having buttermilk post meals : ताकातील पौष्टीक घटक आरोग्याला मिळावे, यासाठी 'या' वेळेत न चुकता ताक प्या..

5 wonderful benefits of having buttermilk post meals | जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...

जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमके कधी प्यावे? ताक प्यायल्याने वजन तर घटतेच; आणि...

उन्हाळा सुरु झाला की, ताक पिण्याची तीव्र इच्छा प्रत्येकाला होते. सध्या काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे. उष्णतेच्या लाटांमुळे देशभरातील नागरिक घामाघूम झाले आहेत, आणि या उष्णतेच्या त्रासेपासून सुटका मिळवण्यासाठी लोकं थंड पेयाचा आधार घेतात. जर आपल्याला साखरयुक्त पेय टाळायचे असेल तर, उन्हाळ्यात ताक प्या. पण बरेच जण तिन्ही वेळ किंवा कोणत्याही वेळेत ताक पितात (Health Care).

ताक पिण्याचे फायदे अनेक आहेत. पण शरीराला ताकातून पौष्टीक घटक मिळावे, यासाठी कधी प्यावे? ताक, छांज, मठ्ठा अशा रुपात ताकाचे सेवन करण्यात येते(Buttermilk Benefits). पण ताक पिण्याची योग्य पद्धत कोणती?(5 wonderful benefits of having buttermilk post meals).

ताक पिण्याच्या योग्य वेळेबद्दल पोषणतज्ज्ञ आयुषी यादव सांगतात, 'उन्हाळ्यात शरीराला पोषण यासह गारवा मिळावा, यासाठी ताक पिणे गरजेचं आहे. लंच टाईममध्ये नियमित ताक प्यायल्याने आरोग्याला फायदेच-फायदे मिळतात. शिवाय शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतात.'

रोबोटने म्हणे महिला पत्रकारसोबत केलं आक्षेपार्ह कृत्य? नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले..

दुपारी ताक पिण्याचे फायदे

पौष्टीक्तेने परिपूर्ण

ताक हे एक मिल्क ड्रिंक आहे. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. दुपारी ताक प्यायल्याने शरीराला न्यूट्रीशनल पॉवर मिळते. ज्यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटू लागते. शिवाय बराच काळ भूकही लागत नाही.

पचनक्रिया सुधारते

ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जसे की लैक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरिया, जे पचन सुधारण्यास मदत करतात. हे चांगले बॅक्टेरिया आपल्या आतड्यातील वाईट बॅक्टेरिया नष्ट करतात आणि पचनक्रिया सुधारतात. अशा स्थितीत गॅस, बद्धकोष्ठता आणि इतर पोटाच्या विकारांपासून आराम मिळतो. शिवाय वजन कमी करण्यासही मदत होते.

बॉडी हायड्रेट राहते

ताकामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते. दुपारी ताक प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. यासह उन्हाळ्यात डिहायड्रेट होण्यापासून बचाव होतो.

फ्रेश आणि ताजेतवाने

ताक प्यायल्यानंतर शांतता आणि ताजेपणा जाणवतो. त्याचे थंड आणि आरामदायी गुणधर्म शरीराला शांत करते. जेव्हा मन निरोगी राहते, तेव्हा आपण दैनंदिन जीवनातील सामान्य कामे आनंदाने करतो.

शिदोरीत बांधून दिलेली गावरान कांद्याची चटणी, चमचमीत इतकी की मळ्यातल्या जेवणाची येईल आठवण..

जीवनसत्त्वे आणि खनिजांचा साठा

ताकामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी यांसारख्या जीवनसत्त्वे आणि खनिजजे आढळतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. हे घटक आपल्याला निरोगी आणि मजबूत बनवतात. यासह विविध शारीरिक प्रक्रियांमध्ये मदत करतात. त्यामुळे जेवणाआधी किंवा जेवल्यानंतर ताक जरूर प्यावे.

Web Title: 5 wonderful benefits of having buttermilk post meals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.