lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

5 Non Dairy Calcium Rich Foods : टोफू सोयाबीन आणि फोर्टिफाईड कॅल्शियमपासून तयार होते. अर्धा कप टोफूमध्ये जवळपास  २५३ मिलीग्राम कॅल्शियम असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 01:01 PM2024-02-23T13:01:56+5:302024-02-23T13:06:23+5:30

5 Non Dairy Calcium Rich Foods : टोफू सोयाबीन आणि फोर्टिफाईड कॅल्शियमपासून तयार होते. अर्धा कप टोफूमध्ये जवळपास  २५३ मिलीग्राम कॅल्शियम असते.

5 Non Dairy Calcium Rich Foods : Top 5 Non Dairy Sources Of Calcium Cheap Foods For Calcium | दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

दूध-पनीरपेक्षा जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ; रोज खा, कॅल्शियम मिळेल-पोलादी होईल शरीर

हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियम हा असा पदार्थ आहे ज्याच्या अभावामुळे ऑस्टिओपॅरोसिस किंवा आर्थरायटिस हा आजार होऊ  शकतो.  दूध प्यायल्याने कॅल्शियम मिळतं किंवा दूध प्यायले नाही तर कॅल्शियम कसे मिळणार हा अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. (Non Dairy Sources Of Calcium) दुधाऐवजी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला कॅल्शियम भरभरून मिळेल ते पाहूया. कॅल्शियम हाडांच्या वाढीसाठी महत्वाचे असते.  ज्यामुळे गंभीर आजारांपासूही बचाव होतो. (Calcium Foods)

कॅल्शिमच्या अभावाने हाडं दुखणं, झिणझिण्या येणं, सांधेदुखी, गुडघेदुखी,  सूज येणं, स्नायू  कमकुवत होणं अशा समस्या उद्भवू  शकतात.  चांगला आहार कॅल्शियमच्या कमतरतेचा धोका टाळण्यासाठी फायदेशीर ठरते. (Ref) 99 टक्के कॅल्शियम  बोन्समध्ये आणि दातांमध्ये दिसून येते.  ज्यामुळे शरीराला  चांगली स्ट्रेंथ मिळते.  ज्यामुळे नर्व्हस सिस्टीम चांगली राहते आणि ब्रेन फंक्शनही चांगले राहते.

१) हिरव्या भाज्या

आपल्या रोजच्या जेवणात भाज्या असतातच. केल, कोलार्ड ग्रीन्स, टरनीप ग्रीन्स अशा भाज्यांचा आहारात समावेश करा. एक कप शिजवलेल्या कोलार्ड ग्रीन्समध्ये जवळपास २६६ मिलीग्राम कॅल्शियम असते. 

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

२) टोफू

टोफू सोयाबीन आणि फोर्टिफाईड कॅल्शियमपासून तयार होते. अर्धा कप टोफूमध्ये जवळपास  २५३ मिलीग्राम कॅल्शियम असते. टोफूमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे  हाडांना पुरेपूर कॅल्शियम मिळते. 

३) बदाम

बदाम खायला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते. बदाम खाल्ल्याने शरीराला बरीच पोषक तत्व मिळतात. बदाम खाल्ल्याने अनेक विकारांसापून  बचाव होतो. बदामाच्या सेवनाने फक्त फॅट मिळत नाही तर कॅल्शियमसुद्धा मोठ्या प्रमाणात मिळते.

कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

४) चिया सिड्स

चिया सिड्स न्युट्रिएंट्सचा पॉवरहाऊस आहे. २ टेबलस्पून चिया सिड्समध्ये १७९ मिलीग्रॅम कॅल्शियम मिळते. यातून  १७९ मिलिग्राम कॅल्शियम मिळते. तुम्ही नाश्त्याला चिया सिड्सचा समावेश करू शकता. 

५) पांढरे तिळ

३६ ग्राम तिळात जवळपास २०० कॅलरीज असतात.  रोज २ ते ४ चमचे  तिळाच्या बीया खाऊन तुम्ही कॅल्शियम मिळवू शकता. तीळ शरीराला गरम ठेवण्याबरोबरच हाडं मजबूत राहतात.  थंडीच्या दिवसांत तीळ खाल्ल्याने शरीराच्या तक्रारी दूर होतात.

Web Title: 5 Non Dairy Calcium Rich Foods : Top 5 Non Dairy Sources Of Calcium Cheap Foods For Calcium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.