lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

Protein Rich Vegetarian Foods Add Your Diet : जे लोक वर्कआऊट करतात त्यांना साधारण व्यक्तीच्या तुलनेत प्रोटीन्सची जास्त आवश्यकता असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:10 PM2024-02-22T12:10:23+5:302024-02-22T12:37:36+5:30

Protein Rich Vegetarian Foods Add Your Diet : जे लोक वर्कआऊट करतात त्यांना साधारण व्यक्तीच्या तुलनेत प्रोटीन्सची जास्त आवश्यकता असते.

Protein Rich Vegetarian Foods Add Your Diet : Best 5 Protein Sources For Vegans And Vegetarians | कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

प्रत्येकाच्याच शरीरासाठी प्रोटीन हा एक महत्वाचा न्युट्रिएंड आहे ज्याची आपल्या सर्वांनाच आवश्यकता असते. मांसपेशीं तयार करण्याबरोबरच हाडं मजबूत ठेवण्यासाठी, हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असते.  (Best 5 Protein Sources For Vegetarians) जे लोक वर्कआऊट करतात ज्यांना साधारण व्यक्तीच्या तुलनेत प्रोटीन्सची जास्त आवश्यकता असते. अनेकांना  असा गैरसमज असतो की व्हेज जेवणात अगदी नगण्य प्रोटीन असते. (Protein Rich Vegetarian Foods Add Your Diet)

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य  वाटेल की व्हेज जेवणात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. डॉ. हंसाजी योगेंद्र यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.  ज्यात त्यांनी व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन्सचे उत्तम सोर्स कोणते असू शकतात ते सांगितले आहेत. (List Of Protein Rich Food For Vegetarians)

प्रोटीनचे प्रमाण किती असायला हवे?

प्रोटीनचे व्हेजिटेरियन सोर्स जाणून घेण्याआधी व्यक्तीने दिवसाला किती प्रोटीन घेतलं पाहिजे  ते समजून घ्यायला हवं. डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात की शरीराच्या वजनानुसार १ ग्राम प्रति किलो प्रोटीन घ्यायला हवं जर व्यक्तीचे वजन  ६० किलो असेल तर दिवसभरात  ६० ग्राम प्रोटीन घेण्याची आवश्यकता असते. काही व्हेजिटेरियन पदार्थ असे आहेत ज्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते.

ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल

मोड आलेली कडधान्ये

स्प्राऊट्स तयार करण्यासाठी कडधान्ये, डाळींना मोड आणून घ्या. हा प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत मानला जातो. एक कप मोड आलेल्या कडधान्यांमध्ये जवळपास  १४.२ ग्राम प्रोटीन असते. याला पोषक तत्वांचे पॉवर हाऊस असते. मूग डाळ, काळे जणे, चवळी याचे तुम्ही सॅलेड बनवू शकता.

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

हम्मस

हम्मस बनवणं खूपच सोपं असते. हा प्रोटीचा चांगला स्त्रोत आहे. यातील ब्रेकफास्ट, लंच, डिनरमध्ये समावेश करू शकता. काबूली चण्यांपासून हा पदार्थ बनवला जातो. मिक्सरच्या एका भांड्यात उकळलेले काबुली चणे घ्या. २ ते ३ लसणाच्या दोन पाकळ्या, २ चमचा लिंबाचा रस, १ चमचा एक्स्ट्रा वर्जिन  ऑलिव्ह ऑईल वाटून पेस्ट तयार करून घ्या.  त्यानंतर हम्मस तयार करा. ब्रेडला लावून हे खाऊ  शकता.

पनीर

पनीर प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. पनीर पचवणं कठीण असतं. फ्रेश पनीर कट  करून रोस्ट करा आणि पनीरला तुम्ही डाएटचा भाग बनवू शकता. यात व्हेजिटेबल्स मिक्स करूनही याचे सेवन करू शकता. 

नट्स

नट्स प्रोटीन्स, एंटी ऑक्सिडेंट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे. यातुम्ही आपल्या आहारात बदाम,  काजू, पिस्ता, अखरोट, पीनट बटर यांचा समावेश करू शकता.  ओव्हर नाईट भिजवून नट्सचे सेवन केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. 

Web Title: Protein Rich Vegetarian Foods Add Your Diet : Best 5 Protein Sources For Vegans And Vegetarians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.