lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

Benefits Of Magnesium Rich Of Foods Suggested By Dieticians : गव्हाचा ब्रेड, पोळी मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:51 PM2024-02-22T19:51:04+5:302024-02-22T20:20:40+5:30

Benefits Of Magnesium Rich Of Foods Suggested By Dieticians : गव्हाचा ब्रेड, पोळी मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे.

Benefits Of Magnesium Rich Of Foods Suggested By Dieticians Foods For Magnesium | थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

मॅग्नेशियम शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांपैकी एक आहे. मॅग्नेशियम शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही महत्वाचे असते. (Magnesium Rich Of Foods) ज्यामुळे शरीरात न्युट्रिएंटची कमतरता भासते ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या  उद्भवतात. आहारतज्ज्ञ आयुषी  यादव  यांनी दिलेल्या माहितीनुसार मॅग्नेशियम रिच फुड्स खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात.  (Benefits Of Magnesium Rich Of Foods Suggested By Dieticians) 

नॅशलन इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार १ ते ३ वर्षांच्या मुलांना ८० मिलीग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. ४ ते ८ वर्षांच्या मुलांना १३० मिलीग्रॅम मॅग्नेशियमची आवश्यकता असते, ९ ते १३ वर्षांच्या मुलांमध्ये  २४० मिलीग्राम मॅग्नेशियमची आवश्यकता असते. १४ ते १८ वर्षांच्या   ४१० मिलीग्राम मॅग्नेशियमची आवश्यकता असते.  १९ ते ३० वयोगटातील लोकांना ३१० मिलीग्राम मॅग्नेशियमची आवश्यकता असते.  गव्हाचा ब्रेड, पोळी मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय पालक, क्विनोआ, काजू, बदाम, डार्क चॉकलेट, टोफू, एवाकाडो,  कल्चर्ड योगर्ट, व्हिटामीन सी युक्त फळं-भाज्या यात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. 

हाडांचे आरोग्य चांगले राहते

मॅग्नेशियम  हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. कॅल्शियम सिंथेसिस आणि स्टोरेज महत्वाचे असते. मॅग्नेशियमयुक्त रिच फूड्स  हाडांच्या मजबूतीसाठी चांगले आहे. ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या जोखिम कमी होते.

कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

ताण-तणावाची कमतरता

मॅग्नेशियम  पोषक तत्व ताण कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे ब्रेन न्युरोट्रांसमिटर्स संतुलित करतात आणि मानसिक स्थिती   सुधारते. मॅग्नेशियमच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत  होईल.  ब्लड प्रेशर नियंत्रित होते. हार्ट डिसिसची रिस्क कमी होते. 

तल्लख बुद्धीसाठी मुलांना रोज खायला द्या ५ पदार्थ; शार्प मेंदू होईल-तब्येतही चांगली राहील

ब्लड प्रेशर

मॅग्नेशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.  ज्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि ब्लड प्रेशर नॉर्मल राहण्यास मदत होते. मॅग्नेशियम रिस फूड्स खाल्ल्याने रक्ताची कमतरता उद्भवत नाही. 

ब्रेन फंक्शन

मॅग्नेशियमने संतुलित स्तर कमी होणं मेंदूची क्रियाशिलता वाढते असते.  स्मरणशक्ती वाढते. ज्यामुळे  ब्रेन डेव्हलमेंटमध्ये मदत होते आणि मेंदूचा विकास  होतो. 

इम्यूनिटी बुस्टर

मॅग्नेशियमचे सेवन केल्याने रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते. मॅग्नेशियम संतुलित राहण्यास मदत होते आणि आजारांचा धोका कमी होतो. 

Web Title: Benefits Of Magnesium Rich Of Foods Suggested By Dieticians Foods For Magnesium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.