lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Anemia > रक्त कमी झालंय-सतत थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल-चेहऱ्यावर येईल तेज

रक्त कमी झालंय-सतत थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल-चेहऱ्यावर येईल तेज

How to Increase Your Red Blood Cell Count (Rakt vadhvnyasathi kay khave) :शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यास किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. हिरव्या भाज्या, फळं, सुका मेवा या पदार्थांचा आहारात समावेश करून रक्ताची कमतरता भरून काढू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 03:55 PM2023-11-18T15:55:57+5:302023-11-19T11:53:03+5:30

How to Increase Your Red Blood Cell Count (Rakt vadhvnyasathi kay khave) :शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यास किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. हिरव्या भाज्या, फळं, सुका मेवा या पदार्थांचा आहारात समावेश करून रक्ताची कमतरता भरून काढू शकता.

How to Increase Your Red Blood Cell Count : Best Foods to Increase Blood Flow Circulation | रक्त कमी झालंय-सतत थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल-चेहऱ्यावर येईल तेज

रक्त कमी झालंय-सतत थकवा येतो? ८ पदार्थ खा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल-चेहऱ्यावर येईल तेज

शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात. यामुळे शरीर कमकुवत होते. या स्थितीला एनिमिया  (Anemia)असं म्हणतात. शरीरात आयर्न फोलिक एसिड आणि व्हिटामीन बी च्या कमतरेमुळे हिमोग्लोबिन लेव्हल कमी होते. (How to Grow Hemoglobin level quickly)  ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. (Rakt Vadhvnyasathi Upay) शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यास किडनीच्या समस्या उद्भवू शकतात. हिरव्या भाज्या, फळं, सुका मेवा या पदार्थांचा आहारात समावेश करून रक्ताची कमतरता भरून काढू शकता. यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. (Best Foods to Increase Blood Flow Circulation)

बीट

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. याशिवाय बिटाची पानं खाल्ल्याने आयर्न वाढते. बीटाच्या तुलनेत बियाच्या पानांमध्ये अधिक आयर्न असते. 

डाळिंब

डाळिंबात मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटामीन सी, के व्यतिरिक्त आयर्नचे प्रमाण भरपूर असते. एक ग्लास कोमट दूधात  २ चमचे डाळिंब  घालून प्यायल्याने हिमोग्लोबिन वाढवता येतं. 

सफरचंद

रोज एकतरी सफरचंद खायला हवं. एनिमिया सारखे आजार दूर करण्यासाठी सफरचंद फायदेशीर ठरते. याच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबीन वाढवता येते.

पालक

पालकाची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही पराठा, स्मूदी मध्ये याचे सेवन करू शकता पालकात आयर्नचे प्रमाण चांगले असते. पालकाच्या भाजीचे सेवन केल्यास रक्ताची  कमतरता भरून निघते. 

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

मनुके

रक्त वाढवण्यासाठी व्हिटामीन बी कॉम्प्लेक्सची आवश्यकता असते. याची कमतरता मनुक्यांच्या सेवनाने पूर्ण करता येते. आयर्नयुक्त सुके मनुके खाल्ल्याने  हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. 

अंजिर

अंजिरमध्ये व्हिटामीन ए, बी-१, बी१२, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरेस, मॅग्नेनीज, सोडियम, पोटॅशिमय, क्लोरीन असते. २ अंजीर रात्री पाण्यात भिजवून सकाळी खा. हे पाणी प्यायल्याने हिमोग्लोबीन लेव्हल वाढवण्यास मदत होते. 

मोड आलेली कडधान्य

सकाळी उठल्यानंतर मोड आलेली कडधान्ये मूग, चणे, गहू असे पदार्थ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा जाणवत नाही.

थंडीत रोज खा डिंकाचे पौष्टीक लाडू; पाहा सोपी रेसिपी-मिश्रण कोरडे न होता बनतील परफेक्ट लाडू

अक्रोड

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. अक्रोडमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर्स, व्हिटामीन- बी, योग्य प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करता येते. 

Web Title: How to Increase Your Red Blood Cell Count : Best Foods to Increase Blood Flow Circulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.