lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

How Legs up The Wall Can Help You Lose Weight (Ghari krta yetil ase vyayam) : कमीत कमी वेळेत फिट राहण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 02:10 PM2023-11-18T14:10:43+5:302023-11-18T14:29:16+5:30

How Legs up The Wall Can Help You Lose Weight (Ghari krta yetil ase vyayam) : कमीत कमी वेळेत फिट राहण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता.

How Legs up The Wall Can Help You Lose Weight : Benefits Of Holding Legs Up on The Wall Five Min Daily | पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

फिट राहण्यासाठी योगा, व्यायाम, वॉकिंग यांसारख्या शारीरिक क्रियांचा डेली रुटीनमध्ये समावेश करतात. पण सध्याच्या  व्यस्त शेड्यूसध्ये लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. (Legs up the wall weight loss) कमीत कमी वेळेत फिट राहण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता. भितींला पाय  लावून झोपल्याने तुम्हाला बरेच फायदे मिळतील. नॅचरल.न्युट्रिशन्स या  वेब पोर्टलवर या सोप्या व्यायामाबद्दल अधिक माहिती दिली आहे. (Health Benefits Of Holding Legs Up on The Wall Five Min Daily)

रोज ५ मिनिटं भिंतीला पाय लावून झोपण्याचे फायदे

१) रोज ५ मिनिटं भितींला पाय लावून  झोपल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. कोर्टिसोल हॉर्मोन्सचा स्तर नियंत्रणात राहतो आणि शरीर, मेंदूचे कार्य सुरळीत राहते. चिंता आणि ताण-तणाव कमी होतो. यामुळे चांगली झोपसुद्धा येते.

२) या स्थितीत झोपल्याने डिटॉक्सिफिकेशन करणाऱ्या द्रव प्रवाह वाढवून पाणी बाहेर काढण्यास मदत होते. हे अविषारी पदार्थांना हटवण्याचे काम करते. यामुळे शरीराची सफाई होण्यास मदत होते.

नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल

३) रोज ५ मिनिटांपर्यंत भितींला टेकून राहिल्याने ब्लड सर्क्युलेशन  सुधारण्यास मदत होते. यामुळे ताण-तणाव कमी होतो आणि डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे रक्ताभिसारण चांगले राहते. डोकेदुखीच्या वेदना कमी होतात आणि ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. ताण-तणाव कमी होऊन डोकेदुखी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४) शारीरिक सूज,  थकवा दूर होतो.  यामुळे पोटदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो.  पचन आणि आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर टरते. पोटाची सूज कमी करण्यासाठी  ब्लड सर्क्युलेशन चांगले असणं गरजेचं असते. यामुळे पचनाच्या समस्या नियंत्रणात राहतात.

५) रोज फक्त ५ मिनिटं हा व्यायाम केल्याने पेल्विक एरियात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहून प्रजनन संस्था चांगली राहते. मासिक पाळीत जाणवणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो. 

पोटाच्या टायर्समुळे अख्खं शरीर बेढब झालंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, आपोआप सपाट होईल पोट

६) रोज ५ मिनिटं भिंतीला टेकून राहिल्याने शरीरातील सूज, वेदना कमी होतात. यामुळे शरीराच्या  खालच्या अवयवांवर दबाव येतो आणि थकवा दूर होतो आणि पायांच्या वेदनांपासून आराम मिळतो. 

Web Title: How Legs up The Wall Can Help You Lose Weight : Benefits Of Holding Legs Up on The Wall Five Min Daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.