Lokmat Sakhi >Gardening > तुमचाच मनीप्लांट सारखा सुकतो, पानं जळतात-काळी पडतात? कुंडीत घाला ४ गोष्टी-मनीप्लांट वाढेल जोमात

तुमचाच मनीप्लांट सारखा सुकतो, पानं जळतात-काळी पडतात? कुंडीत घाला ४ गोष्टी-मनीप्लांट वाढेल जोमात

How to grow money plant faster: Money plant care tips at home: Why money plant leaves turn yellow: मनी प्लांटची पाने पिवळी पडत असतील, सुकत असतील किंवा जळत असतील तर हे ४ सोपे उपाय करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2025 16:59 IST2025-06-05T16:38:49+5:302025-06-05T16:59:53+5:30

How to grow money plant faster: Money plant care tips at home: Why money plant leaves turn yellow: मनी प्लांटची पाने पिवळी पडत असतील, सुकत असतील किंवा जळत असतील तर हे ४ सोपे उपाय करुन पाहा.

gardening tips how to grow money plant fast why leaves turn in yellow add some 4 best fertilizer add in soil money plant will grow | तुमचाच मनीप्लांट सारखा सुकतो, पानं जळतात-काळी पडतात? कुंडीत घाला ४ गोष्टी-मनीप्लांट वाढेल जोमात

तुमचाच मनीप्लांट सारखा सुकतो, पानं जळतात-काळी पडतात? कुंडीत घाला ४ गोष्टी-मनीप्लांट वाढेल जोमात

आपल्या घराच्या बाल्कनीत आपण अनेक छोटी झाडे लावतो. त्याची भरपूर काळजी देखील घेतो.(How to grow money plant faster) त्यांना पुरेसे ऊन आणि सूर्यप्रकाश मिळणं देखील महत्त्वाचं असतं.(Money plant care tips at home) परंतु, आपल्यापैकी अनेक लोक झाड लावल्यानंतर त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत.(Common problems in money plant care) त्यामुळे अनेकदा रोपाची पाने पिवळी पडतात, सुकतात किंवा ती गळू लागतात. अशावेळी झाड मरते किंवा कोमजते. (Why money plant leaves turn yellow)
मनी प्लांटचे रोप आपल्यापैकी अनेकांच्या दारात असेल. प्लास्टिक किंवा काचेच्या बाटलीत लावून आपण त्याची वेल घराच्या दाराला शोभेल अशी पसरवतो.(How to fix yellow leaves on money plant) किंवा खिडकीजवळ ठेवून तिला अधिक सुंदर बनवतो.(Best fertilizer for money plant growth) परंतु, अनेकदा त्याला पुरेशा प्रमाणात पाणी आणि खत मिळाले नाही त्याची पाने पिवळी पडतात किंवा रोप हळूहळू जळते.(Soil mix for healthy money plant) मनी प्लांटची पाने पिवळी पडत असतील, सुकत असतील किंवा जळत असतील तर हे ४ सोपे उपाय करुन पाहा.(Money plant fertilizer for fast growth)

बदलत्या ऋतुमुळे मोगऱ्याला बहर नाही? २ रुपयांची वस्तू देते कुंडीतल्या रोपाला ताकद-मोगरा बहरेल फुलांनी

1. मनी प्लांटचे रोप सारखे जळत असेल तर आपल्याला त्याची जागा बदलायला हवी. त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी आपण ठेवायला हवे. तसेच सूर्याचा प्रकाश रोपावर येणाऱ्या नाही याची काळजी घ्या. त्यामुळे रोप जळू शकते. मनी प्लांटला खूप कमी     प्रकाशाची गरज असते. तसेच पाने लहान असली तरी त्याची वाढ ही हळूहळू होते. 

2. आपल्या मनी प्लांटची देठ लांबपणे वाढताय पण त्याला पानेच येत नसतील तर देठ तो़डून टाका. पानांशिवाय हे रोप चांगले दिसत नाही. याचे देठ तोडून आपण दुसऱ्या कुंडीत लावू शकतो. ज्यामुळे त्याला बहर येईल. 


 

3. मनी प्लांटची वाढ होत नसेल तर काळजी करु नका. चहाची पाने पाण्यात मिसळून द्रव खत तयार करा. हे पाणी मातीत घाला. यामुळे रोपाची वाढ लवकर होण्यास मदत होते. 

4. मनी प्लांटच्या पानांवर पांढऱ्या कापसासारख्या कीटकांचा प्रभाव असेल तर कडुलिंबाचा वापर करा. यासाठी आपण कडुलिंबाची पाने     पाण्यात भिजवून ती उकळवा. दर २ ते ३ दिवसांनी हे पाणी रोपावर फवारा. यामुळे झाडावरील कीटकांपासून मुक्त होण्यास मदत होईल. 

 

Web Title: gardening tips how to grow money plant fast why leaves turn in yellow add some 4 best fertilizer add in soil money plant will grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.