lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पावसाळी कुंद हवेत लहान मुलांसाठी करा रताळ्याची खीर, ताकद देणारी पारंपरिक गोड रेसिपी...

पावसाळी कुंद हवेत लहान मुलांसाठी करा रताळ्याची खीर, ताकद देणारी पारंपरिक गोड रेसिपी...

Sweet Potato Kheer Recipe : लहान मुलांना सतत वेगळं काय द्यायचं असा प्रश्न असेल तर पाहा हा सोपा पण पौष्टीक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2023 03:20 PM2023-07-03T15:20:22+5:302023-08-02T10:22:45+5:30

Sweet Potato Kheer Recipe : लहान मुलांना सतत वेगळं काय द्यायचं असा प्रश्न असेल तर पाहा हा सोपा पण पौष्टीक पदार्थ

Sweet Potato Kheer Recipe : Sweet potato pudding for kids in rainy weather, a traditional recipe that gives strength... | पावसाळी कुंद हवेत लहान मुलांसाठी करा रताळ्याची खीर, ताकद देणारी पारंपरिक गोड रेसिपी...

पावसाळी कुंद हवेत लहान मुलांसाठी करा रताळ्याची खीर, ताकद देणारी पारंपरिक गोड रेसिपी...

पावसाळी हवा पडली की पचायला हलकं, ताजं असं खावं म्हणतात. सतत असे पदार्थ काय करायचे हे आपल्याला अनेकदा सुचत नाही. पावसाळ्यात पालेभाज्या, फळं, वातूळ पदार्थ, मसालेदार, तेलकट असं पचायला जड असलेलं जास्त खाऊ नये असं सांगितलं जातं. मात्र या काळात थोडी गार आणि आल्हाददायी हवा असल्याने आपल्याला मात्र सतत चमचमीत काहीतरी खायची इच्छा होते. मात्र या काळात अग्नी क्षीण झालेला असल्याने हलकं आणि पोटाला सहज पचेल असं अन्न आहारात घ्यायला हवं. लहान मुलांना पावसाळी हवेमुळे पचनाचा त्रास होऊ नये आणि तरी अंगातील ताकद टिकून राहावी यासाठी झटपट करता येतील अशा काही पारंपरिक रेसिपी आपल्या आई-आजी आपल्याला आवर्जून सांगत असतात. आज अशीच रताळ्याच्या खिरीची एक सोपी रेसिपी आपण पाहणार आहोत (Sweet Potato Kheer Recipe). 

१. एका पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवायचं. त्यावर एक जाळी ठेवून त्यामध्ये रताळी स्वच्छ धुवून ठेवायची. वरुन झाकण ठेवले किंवा नाही ठेवले तरी चालेल. 

२. अगदी ५ मिनीटांत ही रताळी मस्त शिजतात. काटा चमच्याने त्यााल टोचे देऊन शिजली की नाही हे तपासायचे. मग काही वेळ ती गार होऊ द्यायची आणि त्याची साले काढायची. 

३. किसणीने ही रताळी चांगली किसून घ्यायची आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये हा किस घालायचा. 

४. रताळ्याच्या या किसामध्ये चमचाभर तूप आणि अगदी चवीला थोडासा गूळ घालायचा. 

५. कढईमध्ये हे सगळे चांगले एकजीव करुन घ्यायचे आणि मग त्यामध्ये थोडेसे दूध घालून ते शिजवायचे. 

६. सगळ्यात शेवटी त्यामध्ये जायफळ पूड किंवा वेलची पूड आवडीप्रमाणे घालायची. 

७. ही गरमागरम खीर लहान मुलं अतिशय आवडीने खातात आणि त्यांना ताकद यायलाही या कंदमुळाची चांगली मदत होते. 

रताळं खाण्याचे फायदे 

१. रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट साफ होण्यासाठी आणि एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी फायदेशीर असतात.

२. सकाळच्या वेळी रताळी खाणं फायदेशीर असतं. त्यामुळे रात्रभर खर्च झालेली ऊर्जा भरुन येण्यास मदत होते. 

३. रताळ्यामुळे रुक्ष झालेल्या त्वचेचा पोत चांगला होण्यासही मदत होते. वयानुसार त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांपासून तुम्ही काही काळ दूर राहू शकता. त्यामुळे तुम्ही तरुण दिसण्यास मदत होते.

४. रताळे कंदमूळ असल्याने त्यामध्ये खनिजांचे प्रमाण जास्त असते. ही खनिजे आणि व्हिटॅमिन बी यामुळे अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. 

५. रताळ्यातील व्हिटॅमिन डी हृदय, दात आणि हाडांसाठी फायदेशीर असते. तसेच ज्यांना थायरॉईडची समस्या आहे त्यांच्यासाठीही रताळे अतिशय चांगले. 


  


 

Web Title: Sweet Potato Kheer Recipe : Sweet potato pudding for kids in rainy weather, a traditional recipe that gives strength...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.