सकाळच्या धावपळीत नाश्ता, डबा आणि घरातील इतर कामं सांभाळताना चपात्यांसाठी कणिक मळणे अनेक गृहिणींना सर्वात कंटाळवाणं काम वाटतं. चपात्यांसाठीची कणिक मळणे म्हणजे वेळखाऊ आणि तितकंच किचकट काम... चांगली मऊसूत कणिक मळण्यासाठी हात पिठात भरुन व्यवस्थित मळून घ्यावी लागते. हात पिठाने माखतात आणि तरीही चपात्या हव्या तशा मऊ होतीलच याची खात्री नसते...इतकंच नाही तर तेल आणि पाण्याचं योग्य प्रमाण देखील पाहावं लागतं नाहीतर कणिक बिघडते आणि चपात्या व्यवस्थित होत नाही... अशी सगळी तारेवरची कसरत सांभाळून सकाळच्या घाई गडबडीत अगदी सेकंदात कणिक मळून व्हावी, असं प्रत्येकीला वाटतं... कमी मेहनतीत झटपट आणि परफेक्ट कणिक मळण्याची एखादी सोपी ट्रिक मिळाली तर... अवघड, वेळखाऊ, किचकट काम चुटकीसरशी होईल(spoon trick for kneading dough).
चपात्या कापसासारख्या मऊ आणि टम्म फुगलेल्या (how to make soft chapati dough easily) हव्या असतील, तर कणिक उत्तम तिंबलेली असणं खूप गरजेचं असतं. पण जोर लावून पीठ मळण्याचा कंटाळा येतो अशावेळी, पिठात हात न घालता आणि हात न भरवता तुम्ही चपात्यांसाठी मऊसूत कणिक मळू शकता, ती ही फक्त एका चमच्याने...फक्त एका चमच्याच्या (easy roti dough making hack) मदतीने काही सेकंदात परफेक्ट कणिक कशी मळायची, याची भन्नाट ट्रिक पाहा...
फक्त एका चमच्याने कणिक मळण्याची सोपी पद्धत...
फक्त एका चमच्याच्या मदतीने अगदी झटपट कणिक मळण्याची सोपी ट्रिक इंस्टाग्रामवरील swad_ka_vardaan या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. सर्वात आधी एका पसरट परातीत किंवा बाऊलमध्ये तुमच्या गरजेनुसार गव्हाचे पीठ घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडे तेल टाका. आता एक मोठा आणि थोडा जाड चमचा घ्या. पिठाच्या मध्यभागी थोडी जागा करून त्यात थोडे थोडे कोमट पाणी टाका. आता हाताने पीठ न मळता चमच्याने ते पाणी आणि पीठ गोल फिरवत एकजीव करा.
अधिक मास विशेष : वाणाचे अनारसे जमतील परफेक्ट लक्षात ठेवा ५ टिप्स, खुसखुशीत अनारसे करा घरीच...
एकदम पाणी न टाकता गरजेनुसार थोडे थोडे पाणी टाकत चमच्याने पीठ फिरवत राहा. काही सेकंदातच पिठाचा गोळा तयार होऊ लागेल. चमच्याच्या दाबामुळे पिठातील गुठळ्याही सहज मोडल्या जातात. जेव्हा पीठ पूर्णपणे गोळा होईल, तेव्हा चमच्याच्या मागील बाजूने त्याला २ ते ३ वेळा दाब देत कणिक चांगली मऊसूत मळून घ्या. शेवटी फक्त अर्धा चमचा तेल लावून एकदा फिरवून घ्या. तुमचे हात न भरता मऊसूत कणिक मळून चपात्या करण्यासाठी तयार आहे.
साय साठवा-घुसळा ताक ही झंझटच नको, करा दह्याचं लोणी झटपट-पाहा भन्नाट ट्रिक...
इतरही खास टिप्स लक्षात ठेवा...
१. कणिक मळताना थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर केल्यास चपात्या अधिक मऊ होतात.
२. पीठ मळल्यानंतर किमान १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा, यामुळे पिठातील लवचिकता वाढते आणि चपाती छान फुगते.
३. पीठ मळून झाल्यावर वरून थोडे तेल लावल्याने पिठावर पापपुद्रे धरत नाहीत आणि कणिक ताजी राहते.
या साध्यासोप्या ट्रिक्सचे फायदे काय आहेत ?
१. चमच्याने कणिक मळल्यामुळे हातभर पीठ चिकटत नाही.
२. ही ट्रिक वापरल्यास काही मिनिटांत कणिक तयार होते.
३. कोमट पाणी आणि योग्य मिक्सिंगमुळे कणिक छान तिंबली जाते.
४. मऊ कणकेमुळे चपात्या नरम आणि टम्म फुगतात.
ही सोपी ट्रिक वापरून सकाळची किचनमधील धावपळ थोडी कमी होऊ शकते आणि कमी मेहनतीत मऊसूत चपात्याही तयार करता येऊ शकतात. याचबरोबर, वेळ तर वाचेलच पण पीठ मळण्याचा कंटाळाही दूर होईल आणि घाईच्या वेळी ही 'चमचा ट्रिक' नक्की वापरून पहा!
Web Summary : Kneading dough becomes easy with a spoon! This simple trick avoids sticky hands and delivers soft, fluffy rotis. Use lukewarm water, rest the dough, and add oil for perfect results every time. Save time and effort with this kitchen hack.
Web Summary : चम्मच से आटा गूंधना हुआ आसान! यह सरल तरीका चिपचिपे हाथों से बचाता है और नरम, फूली हुई रोटियां देता है। गुनगुना पानी इस्तेमाल करें, आटे को आराम दें, और हर बार सही परिणाम के लिए तेल डालें। इस किचन हैक से समय और प्रयास बचाएं।