Lokmat Sakhi >Food > शिळ्या चपातीचा करा १० मिनिटात चमचमीत चिवडा, उरलेल्या पोळ्यांचं करु काय? -प्रश्नच विसरा..

शिळ्या चपातीचा करा १० मिनिटात चमचमीत चिवडा, उरलेल्या पोळ्यांचं करु काय? -प्रश्नच विसरा..

Leftover chapati recipe - How to make Chapaticha Chivda : शिळ्या चपात्यांचा कुस्करा करण्याची सोपी - कुरकुरीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2024 09:00 AM2024-05-25T09:00:00+5:302024-05-25T09:00:02+5:30

Leftover chapati recipe - How to make Chapaticha Chivda : शिळ्या चपात्यांचा कुस्करा करण्याची सोपी - कुरकुरीत रेसिपी

Leftover chapati recipe - How to make Chapaticha Chivda | शिळ्या चपातीचा करा १० मिनिटात चमचमीत चिवडा, उरलेल्या पोळ्यांचं करु काय? -प्रश्नच विसरा..

शिळ्या चपातीचा करा १० मिनिटात चमचमीत चिवडा, उरलेल्या पोळ्यांचं करु काय? -प्रश्नच विसरा..

जेवणाच्या थाळीमध्ये आपल्याला चपाती भाजी हवीच असते (Chapati). चपाती भाजी शिवाय आपलं पोट भरत नाही. घरातील गृहिणी नेहमी एक्स्ट्रा चपात्या करते. जेणेकरून कोणाची जास्त भूक असेल तर, तो व्यक्ती चपाती खाऊ शकेल (Food). पण मग बऱ्याचदा चपाती कोणी खात नाही (Cooking Tips). ती उरते आणि मग शिळी होऊन कडक होते. अशावेळी उरलेली चपाती कोणी खायला मागत नाही.

जर आपल्याही घरात शिळी चपाती उरली असेल आणि कुणी खात नसेल तर, उरलेल्या चपातीचा चटपटीत चिवडा करून खा. चटपटीत चपातीचा चिवडा करताना त्याला कांद्याची फोडणी दिली की, चिवडा भन्नाट लागतो. शिवाय कमी वेळात तयारही होतो. जर आपल्याला झटपट काय करायचं सुचत नसेल तर, नाश्त्याला आपण चपातीचा चिवडा तयार करून मुलांना देऊ शकता. मुलं आवडीनं खातील(Leftover chapati recipe - How to make Chapaticha Chivda).

चपातीचा चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य(Chapaticha Chivda Recipe in Marathi)

उरलेली चपाती

तेल

कांदा

मोहरी

भेंडीची भाजी करताना लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स, भाजी कधी चिकट-बुळबुळीत होणारच नाही

जिरे

शेंगदाणे

हळद

धणे पूड

लाल तिखट

गरम मसाला

मीठ

कोथिंबीर

अशा पद्धतीने करा चटपटीत चपातीचा चिवडा

चटपटीत चपातीचा चिवडा करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात चपातीचे तुकडे घाला. त्यात चपातीचा जाडसर चुरा तयार करा. चपातीचा चुरा एका प्लेटमध्ये काढून ठेवा.

आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी आणि जिरे घाला. नंतर त्यात कडीपत्ता घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात मुठभर शेंगदाणे घाला. शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर त्यात एक कप बारीक चिरलेला कांदा घाला.

मराठी माणूस इन कराची; वडापाव विकत मराठी बोलणाऱ्या कराचीच्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल

कांदा लालसर झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धणे पूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

नंतर त्यात चपातीचा चुरा घालून साहित्य एकजीव करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरा. मध्यम आचेवर २ मिनिटांसाठी चपातीचा चिवडा परतवून घ्या. अशा प्रकारे चपातीचा चटपटीत चिवडा खाण्यासाठी रेडी.

Web Title: Leftover chapati recipe - How to make Chapaticha Chivda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.