Lokmat Sakhi >Food > भेंडीची भाजी करताना लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स, भाजी कधी चिकट-बुळबुळीत होणारच नाही

भेंडीची भाजी करताना लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स, भाजी कधी चिकट-बुळबुळीत होणारच नाही

4 Clever Tips To Prevent Bhindi From Turning Sticky : परफेक्ट भेंडी बनविण्यासाठी काही कुकिंग हॅक्स; भेंडीचा रंग बदलणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 03:12 PM2024-05-24T15:12:41+5:302024-05-24T15:13:58+5:30

4 Clever Tips To Prevent Bhindi From Turning Sticky : परफेक्ट भेंडी बनविण्यासाठी काही कुकिंग हॅक्स; भेंडीचा रंग बदलणार नाही..

4 Clever Tips To Prevent Bhindi From Turning Sticky | भेंडीची भाजी करताना लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स, भाजी कधी चिकट-बुळबुळीत होणारच नाही

भेंडीची भाजी करताना लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स, भाजी कधी चिकट-बुळबुळीत होणारच नाही

भेंडीची भाजी कोणाला आवडत नाही (Bhendi). भेंडीची भाजी खाण्याचा खवय्यावर्ग फार मोठा आहे. पण प्रत्येकाच्या घरात भेंडी बनविण्याची पद्धत वेगळी आहे (Cooking Tips). भेंडी केवळ स्वादिष्टच नसून, यातून शरीराला मिळणारे फायदेही अनेक आहेत (Kitchen Tips). भेंडीचे अनेक प्रकार केले जातात. काही जण भेंडीची भाजी तयार करतात. तर काही जण कुरकुरीत भेंडी किंवा भेंडी करी तयार करतात. पण भेंडी कशीही बनवा, ती चिरताना चिकट आणि खाताना बुळबुळीत लागतेच.

अशावेळी भेंडी कुरकुरीत आणि भेंडीचा मूळ रंग बदलू नये यासाठी काय करावं? भेंडी खाताना बुळबुळीत लागू नये म्हणून कोणती टीप उपयुक्त पडेल? असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी आपण ४ टिप्स फॉलो करू शकता. भेंडीची भाजी चविष्ट आणि कुरकुरीत लागेल(4 Clever Tips To Prevent Bhindi From Turning Sticky).

भेंडीची भाजी चिकट का असते?

भेंडीमध्ये म्युसिलेज नावाचा पदार्थ असतो. हा पदार्थ इतर अनेक वनस्पतींमध्येही आढळतो. ज्यामुळे भेंडी चिरताना हाताला चिकट लागते. कोरफडीमध्येही हा पदार्थ आढळतो. हा पदार्थ वनस्पतीला अन्न आणि पाणी साठवण्यास मदत करते. कोणत्याही वनस्पतीच्या वाढीसाठी या दोन घटक आवश्यक असतात.

चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ

भेंडीचा चिकटपणा दूर करणारे उपाय

धुवून नीट वाळवा

काही जण भेंडी पाण्यात धुवून चिरतात. पण त्यात असलेला पदार्थ पाण्यात मिसळल्यानंतर अधिक चिकट होतो. म्हणून, जेव्हाही भेंडी चिरायला घ्याल, तेव्हा धुवून नंतर पंख्याखाली वाळवा, आणि मग चिरून घ्या. यामुळे भेंडी चिरताना हाताला चिकटपणा लागणार नाही.

मोठे तुकडे करा

भेंडी वाळवून झाल्यानंतर त्याचे मोठे तुकडे करा. नंतर भेंडी तव्यावर भाजून घ्या. भाजल्यामुळे भेंडीचा चिकटपणा ५ ते १० मिनिटात निघून जाईल.

भेंडी शिजताना त्यात मीठ घालणं टाळा

भेंडी शिजताना मीठ घालणं योग्य नाही. मीठ आधीच घातल्यास, भेंडीची भाजी चिकट होते. त्यामुळे भेंडीची भाजी शिजल्यानंतर त्यात मीठ घालावे. जेणेकरून भेंडीची भाजी चिकट होणार नाही. शिवाय सुटसुटीत तयार होईल.

खमण ढोकळा फुलतच नाही? त्यात घाला चमचाभर 'हा' सिक्रेट पदार्थ; विकतच्या ढोकळापेक्षा बनेल भारी

भेंडीचा रंग तसाच ठेवण्यासाठी उपाय

भेंडीचा हिरवा रंग तसाच ठेवायचा असेल तर, भेंडीची भाजी करताना अजिबात त्यावर झाकण ठेऊ नका. वाफेवर भाजी शिजवू नका. असं केल्याने नक्कीच भेंडी शिजायला थोडा वेळ लागेल. मात्र, भेंडीचा रंग तसाच हिरवा राहील बदलणार नाही.

Web Title: 4 Clever Tips To Prevent Bhindi From Turning Sticky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.