lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > रोज फक्त १ लाडू खा, वयाच्या तिशीनंतरही हाडं मजबूत राहतील, सुरकुत्याही येणार नाही

रोज फक्त १ लाडू खा, वयाच्या तिशीनंतरही हाडं मजबूत राहतील, सुरकुत्याही येणार नाही

Laddu For Good Health : खाण्यापिण्यात काही छोटे बदल केले तर तुमची केस, त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 05:23 PM2024-03-07T17:23:31+5:302024-03-07T20:11:20+5:30

Laddu For Good Health : खाण्यापिण्यात काही छोटे बदल केले तर तुमची केस, त्वचा चांगली राहण्यास मदत होईल.

Laddu For Good Health : Nutritionist Recommends Above 30 Years Should Add These Healthy Amaranath | रोज फक्त १ लाडू खा, वयाच्या तिशीनंतरही हाडं मजबूत राहतील, सुरकुत्याही येणार नाही

रोज फक्त १ लाडू खा, वयाच्या तिशीनंतरही हाडं मजबूत राहतील, सुरकुत्याही येणार नाही

महिला या गृहिणी असोत किंवा ऑफिसमध्ये ९ ते ५ काम करणाऱ्या असतो. महिलांना स्वतचे आरोग्य आणि  खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. वय कमी असताना म्हणजे तिशी, चाळीशीच्या वयातच तब्येतीची योग्य काळजी घेतली तर वाढत्या वयात विकार उद्भवत नाहीत. (Women's Health Tips)

खाण्यापिण्यात काही छोटे बदल केले तर तुमची केस, त्वचा चांगली राहण्यास मदत होईल. शरीराला योग्य पोषण मिळाले नाही तर शरीरात रक्ताची कमतरता उद्भवणं, हॉर्मोन्ल इम्बँलेंस, डोळे कमकुवत होणं,  थकवा येणं अशा समस्या उद्भवतात.(Nutritionist Juhi Kapoor Recommends Above 30 Years Should Add These Healthy Amaranath Til Ladoo)

ट्रु मेडच्या रिपोर्टनुसार १ कप राजगिऱ्यात २.१ मिलीग्रॅम मॅग्ननीध, १६० मिलीग्रॅम मॅग्नेशियम, ३६४ मिलीग्रॅम फॉस्फरेस असते. आयर्न ५.२ मिलीग्रॅम असते (Ref). याची न्युट्रिशनल वॅल्यू जास्त असून यात व्हिटामीन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ग्लुटेन फ्री असल्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर याचा आहारात समावेश  करू शकता. 

मधल्या भुकेच्यावेळी  आपण बिस्कीट, चिप्स, फरसाण असे पदार्थ खातो ज्यामुळे शरीराता पुरेसं पोषण मिळत नाही. न्युट्रिशनिस्ट जुही कपूर यांनी इंस्टाग्रामवर एक हेल्दी रेसिपी शेअर केली आहे. ज्याचा रोजच्या आहारात समावेश करून तुम्ही गंभीर आजारांपासून स्वत:चा बचाव करू शकता ज्यातून तुम्हाला पुरेपूर पोषण मिळेल.
अमरंथ काय आहे, याच्या सेवनाने कोणते फायदे मिळतात.

अमरंथला भारतात राजगिरा किंवा रामदाना असंही म्हणतात. हा एक प्राचीन पदार्थ आहे. अलिकडेच  तो खूपच लोकप्रिय झाला आहे. राजगिरा अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो.  राजगिऱ्याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. भारतात मुख्यत: नवरात्रीच्या उपवासाला राजगिरा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. हा बहुउपयोगी असून  ग्लुटेन फ्री, प्रोटीन्युक्त, फायबर्सयुक्त  असल्यामुळे एंटी ऑक्सिडेंट्सनी परिपूर्ण असतो.

एनर्जी बुस्टर लाडू करण्याची सोपी पद्धत कोणती?

४ मोठे चमचे भाजलेला राजगिरा, ४ चमचे भाजून बारीक कापलेले बदाम, २ मोठे चमचे भाजलेले तीळ, १ चमचा कोको पावडर घ्या .१५ ते २० बिया काढलेले खजरू घ्या. खजूर मिक्सरच्या भांड्यात वरील सर्व जिन्नस  घट्टसर फिरवून घ्या. या पेस्टमध्ये बाकीचे पदार्थ मिसळा. व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर याचे लहान लहान लाडू बनवा. रोज १ लाडू खाल्ला तर शरीरात एनर्जी मेंटेन राहील.

राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे

१) राजगिऱ्याचे सेवन महिलांसाठी फायदेशीर मानलले जाते. कारण  यामुळे शरीरातील हॉर्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. यातील उच्च पोषक तत्वांमुळे गर्भावस्थेतही फायदेशीर ठरते. यातील व्हिटामीन के, ई मुळे त्वचा आणि केस चांगले राहतात.

महाशिवरात्र विशेष : महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे, काय खाऊ नये? ५ नियम; पुरेपूर होईल फायदा

२) राजगिरा  प्रोटीन्स आणि आयर्न  असल्यामुळे उर्जेचा स्तर वाढतात, थकवा कमी होतो. यात पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते.  प्रोटीन्स, फायबर्सही असतात.   ज्यात कॅलरीज अगदी कमी असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

महाशिवरात्र स्पेशल : पाहा १० सुंदर आकर्षक रांगोळ्या - चटकन काढता येतील अशा झटपट डिझाइन्स

३) राजगिऱ्याच्या क्विनोआच्या तुलनेत प्रोटीन्स आणि फायबर्स जास्तप्रमाणात असतात. हा एक प्राचिन पदार्थ असून पौष्टीक असते.  राजगिरा एक प्रोटीनयुक्त पदार्थ आहे ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात.  राजगिऱ्याची पानं, राजगिऱ्याचे पीठ  याचा वापरही तुम्ही करू शकता. 

Web Title: Laddu For Good Health : Nutritionist Recommends Above 30 Years Should Add These Healthy Amaranath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.