lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू

गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू

Krishna Janmashtami 2023 : हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात रूचकर लाडू बनून तयार होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:06 AM2023-09-06T09:06:00+5:302023-09-06T09:46:18+5:30

Krishna Janmashtami 2023 : हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात रूचकर लाडू बनून तयार होतील.

Krishna Janmashtami 2023 : How to make mawa ladoo for janmashtmi naivedya | गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू

गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू

गोकुळाष्टमीच्या (Janmashtami) प्रसादासाठी तुम्ही घरच्याघरी उत्तम लाडू बनवू शकता. दही-दूधाचे बरेच पदार्थ गोकुळ अष्टमीच्या प्रसादासाठी बनवले जातात. (Naivedya for Krishna Janmashtami) याचबरोबर तुम्ही हे लाडू सुद्धा नैवेद्यासाठी दाखवू शकता. हे लाडू करण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात स्वादीष्ट लाडू बनून तयार होतील. लाडू बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to make mawa ladoo) मावा लाडू बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Mawa Ladoo Recipe)

साहित्य

1) रवा- २ वाटी

2) खवा - १ किलो

3) वेलची पावडर- २ ते ३ चमचे

4) ड्रायफ्रुट्स-  २ वाटी

5) पिठीसाखर-  २ वाट्या

6) तूप- लाडू वळण्यासाठी

कृती

१) मावा लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढई गरम करून त्यात तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात रवा घाला. रवा खरपूस भाजून घ्या. रवा भाजताना आच उच्च ठेवू नका. रवा गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्या. रवा भाजल्यानंतर  एका भांड्यात काढून घ्या. 

गोकुळाष्टमी विशेष : विकतसारखं घट्ट दही आता करा घरीच, दही विरजताना घाला १ सिक्रेट गोष्ट

२) त्यानंतर कढईमध्ये  खवा घाला आणि खवा चांगला भाजल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. रवा आणि खवा व्यवस्थित थंड करून घ्या. त्यानंतर हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या.  त्यात पिठीसाखर घाला. पिठीसाखर खव्यात घालण्यापूर्वी व्यवस्थित चाळून घ्या म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत.

३) त्यात वाटीभर चिरलेले ड्रायफ्रुट्स, वेलची पूड  घाला. हे जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्या. तूपाची गरज पडल्यास  थोडं तूप घालून एकजीव करा. तुपाने गोळा व्यवस्थित मळून घ्या.

साबुदाणा वडे करताना पीठात १ पदार्थ घाला, वडे फुटणार नाहीत -तेलही पिणार नाहीत

4) त्यानंतर याचे गोळे करून लाडू बांधून घ्या. त्यानंतर बेदाणे लाडूंवर लावा. याचप्रकारे बाकीचे लाडू सुद्धा वळून घ्या.  तयार आहेत माव्याचे लाडू

Web Title: Krishna Janmashtami 2023 : How to make mawa ladoo for janmashtmi naivedya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.