lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > वाटीभर रव्याचा करा सॉफ्ट-जाळीदार पांढरा ढोकळा; सोपी रेसिपी, होईल विकतसारखा परफेक्ट ढोकळा

वाटीभर रव्याचा करा सॉफ्ट-जाळीदार पांढरा ढोकळा; सोपी रेसिपी, होईल विकतसारखा परफेक्ट ढोकळा

Instant Sooji Dhokla Recipe : हा ढोकळा करण्यासाठी दही, तांदूळ आणि काळ्या चण्यांचा वापर तुम्हाला करावा लागेल. १ तासात ही सोपी डिश बनून तयार होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:10 PM2024-01-24T12:10:14+5:302024-01-24T15:46:57+5:30

Instant Sooji Dhokla Recipe : हा ढोकळा करण्यासाठी दही, तांदूळ आणि काळ्या चण्यांचा वापर तुम्हाला करावा लागेल. १ तासात ही सोपी डिश बनून तयार होईल.

Instant Sooji Dhokla Recipe : How to Make Rawa Dhokla Recipe Suji Dhokla Recipe In Marathi | वाटीभर रव्याचा करा सॉफ्ट-जाळीदार पांढरा ढोकळा; सोपी रेसिपी, होईल विकतसारखा परफेक्ट ढोकळा

वाटीभर रव्याचा करा सॉफ्ट-जाळीदार पांढरा ढोकळा; सोपी रेसिपी, होईल विकतसारखा परफेक्ट ढोकळा

सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत (Best Instant Sooji Dhokla) भूक लागल्यानंतर खाण्यासाठी पांढरा ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. पांढरा ढोकळा चवीला आंबट आणि तिखट असतो हा ढोकळा  बेसनाच्या ढोकळ्यापेक्षा जास्त सॉफ्ट असतो आणि चवही कमालीची असते. (White Rava Dhokla Recipe) हा ढोकळा करण्यासाठी दही, तांदूळ आणि काळ्या चण्यांचा वापर तुम्हाला करावा लागेल. १ तासात ही सोपी डिश बनून तयार होईल. (Instant Sooji Dhokla Recipe) नमकिन किंवा स्नॅक्स खाण्याचे शौकिन असलेल्यांना ही रेसिपी खूप आवडेल. (White Rava Dhokala Recipe)

पांढरा ढोकळा करण्याची सोपी कृती (How to Make Rawa Dhokla)

1) वाटीभर रवा घ्या, त्यात एक वाटी दही आणि चमचाभर तेल, पाणी आणि मीठ घालून व्यवस्थित ढवळून घ्या. १० मिनिटांनीत त्यांनी त्यात इनो घालून पुन्हा एकदा ढवळून घ्या. एका भांड्याला तेलाने ग्रीस करून त्यात ढोकळ्याचे मिश्रण घाला. त्यावर चिमूटभर चटणी घालून ढोकळा वाफवून घ्या.

2) १० ते १५ मिनिटं वाफवल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर एका फोडणी पात्रात तेल गरम करून  तेल मोहोरी, जिरं, कढीपत्ता, मिरच्या घालून फोडणी तयार करून घ्या. ही फोडणी ढोकळ्यावर घाला आणि ढोकळ्यांचे काप करून घ्या तयार आहे खमन ढोकळा. हा ढोकळा तुम्ही  हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता.

पांढरा ढोकळा करण्याची दुसरी पद्धत

पांढऱ्या रंगामुळे हा ढोकळा केक किंवा इडलीप्रमाणे दिसतो. हा ढोकळा कढीपत्ता चटणी किंवा गोड चटणीबरोबर चांगला लागतो. पांढरा ढोकळा बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळीचे मिश्रण एकत्र तयार करून घ्या. त्यात मोहोरी, कढीपत्ता आणि हिंग घाला जेणेकरून  चव जास्त वाढेल. 

डाळ-तांदूळाचा पांढरा ढोकळा करण्याची रेसिपी (Rava Dhokla Recipe)

1) ही स्वादीष्ट स्नॅक्स रेसिपी तयार करण्यासठी अर्धा कप तांदूळ आणि धुतलेली उडीदाची डाळ जवळपास ४ तासांसाठी पाण्यात भिजवायला ठेवा. तांदूळ धुवून पाण्यात काहीवेळासाठी भिजवायला ठेवा. एका ग्राईंडर जारमध्ये भिजवलेले तांदूळ आणि धुतलेली उडीदाची डाळ आणि अर्धा कप पाणी एकत्र घालून व्यवस्थित दळून घ्या. हे बॅटर बाऊलमध्ये काढून घ्या. 

200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं

2) त्यानंतर या बॅटरमध्ये दही  मिसळा आणि व्यवस्थित फेटून घ्या.   या बॅटरमध्ये बेकींग सोडा, आलं-हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ घालू बॅटर व्यवस्थित एकजीव करा. चमच्याच्या साहाय्याने तेल घाला त्यानंतर पुन्हा मिसळा.

दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

3) स्टिमरमध्ये पाणी घालून ढोकळा वाफेवर व्यवस्थित शिजवून घ्या. प्लेट स्टिमरमध्ये अत्यंत सावधगिरीने ठेवा. ८ ते १० मिनिटं वाफेवर शिजवा त्यानंतर स्टिमरमधून वाफ काढून दुसऱ्या बाजूला ठेवा. नंतर त्यावर फोडणीचे मिश्रण घालून तयार ढोकळ्याचा आस्वाद घ्या. 

Web Title: Instant Sooji Dhokla Recipe : How to Make Rawa Dhokla Recipe Suji Dhokla Recipe In Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.