Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात जेवणच जात नाही? करा खमंग लसणाची चटणी; लज्जतदार अशी की तोंडाला चवच येईल

उन्हाळ्यात जेवणच जात नाही? करा खमंग लसणाची चटणी; लज्जतदार अशी की तोंडाला चवच येईल

How To Make Garlic Chutney At Home : सगळ्यात आधी कढई  गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या.  शेगंदाणे अर्धवट भाजले की त्यात सालवाले लसूण घाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 04:39 PM2024-05-24T16:39:44+5:302024-05-24T16:57:36+5:30

How To Make Garlic Chutney At Home : सगळ्यात आधी कढई  गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या.  शेगंदाणे अर्धवट भाजले की त्यात सालवाले लसूण घाला.

How To Make Garlic Chutney At Home : Garlic Chutney Recipe Easy Garlic Chutney | उन्हाळ्यात जेवणच जात नाही? करा खमंग लसणाची चटणी; लज्जतदार अशी की तोंडाला चवच येईल

उन्हाळ्यात जेवणच जात नाही? करा खमंग लसणाची चटणी; लज्जतदार अशी की तोंडाला चवच येईल

रोजच्या जेवणात तेच तेच पदार्थ खाऊन प्रत्येकालाच कंटाळा येतो. जेवणाला काहीतरी वेगळं असावं अशी प्रत्येकाचीत इच्छा असते. (Garlic Chutney) चपाती किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी तुम्ही लसणाची चटणी ट्राय करू शकता. ही चटणी चवीला उत्तम लागते. रोजच्या जेवणात या चटणीचे सेवन केल्यास तुम्हाला नेहमीपेक्षा दोन घास जास्त जेवण जाईल. (How To Make Garlic Chutney At Home)

लसूण प्रत्येकाच्याचघरी स्वंयपाकासाठी वापरला जातो. भाजीत लसूण घातल्याशिवाय भाजीला चव येत नाही. लसणामुळे भाजीला तिखटपणा येतो आणि तोंडाला चवही येते. फक्त भाजी वापरण्यापेक्षा लसूण  घालून तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता. चटणीसाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. (Garlic Chutney Recipe)

लसणाची चटणी कशी करतात?

सगळ्यात आधी कढई  गरम करून त्यात शेंगदाणे भाजून घ्या.  शेगंदाणे अर्धवट भाजले की त्यात सालवाले लसूण घाला. त्यात चण्याची डाळ घाला, १ वाटी किसलेलं खोबरं, १ छोटी वाटी तीळ घाला, १ वाटी जीरं घाला, १ ते २ लाल मिरच्या हाताने तोडून घाला. हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात सर्व साहित्य घाला, मीठ, हळ,लाल तिखट घाला.  हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून एक व्यवस्थित फिरवून घ्या. तयार आहे खमंग चटणी.

लसणाची ओली चटणी कशी करतात.

लसणाची ओली चटणी करण्यासाठी  लाल मिरचीचा वापर करावा लागेल. लाल मिरच्या वाटून त्याची बारीक पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट सोललेल्या लसणात घालून जिऱ्याची आणि कढीपत्ताच्या फोडणी द्या. ज्यामुळे तोंडाला अधिक चव येईल आणि रोजच्या बोअरिंग जेवणाची चवही वाढेल. 

Web Title: How To Make Garlic Chutney At Home : Garlic Chutney Recipe Easy Garlic Chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.